Home Blog

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which leads to various symptoms. The disease has been identified in world literature for over two centuries.

What are the symptoms of Parkinsons Disease?

The symptoms can be divided into those affecting your movement and those not. The cardinal symptoms of Parkinsons Disease can be like a general slowness in daily activities like turning sides in bed, getting out of bed, walking, eating, grooming etc. Patient may have a sense of tightness in his body. Most striking symptom of the disease may be shaking of hands and legs to a variable degree. Patient may lose balance and fall down at times. The patient and his relatives note a worsening as days go by.

Other group of symptoms may be those not affecting the movement commonest being constipation. Patient may have difficulty understanding things, may have hallucinations, decreased sens of smell and taste. Patient may have anxiety, depression or phobias. Patient may experience erectile dysfunction or light headedness. Sleep may be disturbed and patient may enact vivid dreams. Patient may experience non-specific pains and aches.

So, a variety of symptoms may help in diagnosing Parkinsons Disease.

How is it diagnosed?

The diagnosis of the disease is predominantly on the symptoms. However in certain cases a MRI- Brain may be necessary. The MRI helps us differentiate between various types of Parkinsons Disease. A newer modality of imaging is a  DAT Scan which specifically tries to see the cells that are affected in Parkinsons Disease.

What are the types of Parkinsons Disease?

Parkinsons Disease is a symptom complex as told earlier. But certain diseases may have similar symptoms such as Progressive Supranuclear Palsy, Multiple Systemic Atrophy, Levi Body Dementia may mimic Parkinsons Disease. But a careful clinical examination helps us in diagnosing the disease.

How is it treated?

Treatment of Parkinsons Disease is a team approach. Today various medicines are available to treat the disease at various stages of the disease. The patient should visit the Doctor regularly for appropriate management of disease. Regular doctor visits and modification in drugs ensure long term wellbeing of the patient.

A patient may need a Deep Brain Stimulation surgery where patient develops side effects to the medicines. However, the patient should be carefully selected.

Physiotherapy and Occupational Therapy is essential for the patient to train the patient to do his day to day activities. In later stages of the disease speech therapist may be required to help swallowing. Psychologist and Psychiatrist may be essential in treating cerian symptoms of the disease. Social support groups help coping up with the disease. Palliative and end of life care may be required.

The disease cannot be cured, but controlled.

Can it be inherited?

Yes, mutation or defect certain genes may cause the disease. But all patients of Parkinsons Disease may not be genetic.

What do I do if one of my relatives is developing symptoms?

First, don’t panic or be afraid of the disease. In most cases patient can live a near normal life with medicines and rehabilitation. Consult your Physician at the earliest and take proper treatment. Don’t neglect the patient, he has a good life ahead of him.

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   ‘झपूर्झा ‘ हे ठिकाण सहलीसाठी निश्चित केले. तारीख ठरली २० डिसेंबर २०२३. सहलीचे ठिकाण आणि तारीख व्हाॅट्सॲप गृपवर सर्वांना कळविण्यात आली.

यावर्षी सहलीसाठी शुभार्थींकडून कोणतीही वर्गणी न घेण्याचे ठरले. इतरांकडून रु. ७००/- घेण्याचे ठरले. सर्व सदस्यांचा उदंड प्रतिसाद पाहता एक मोठी बस, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार घेऊन जायचे ठरले.  

अखेर सहलीचा दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवारा येथे सगळे जमायला सुरुवात झाली. तिन्ही वाहनांमध्ये सर्व स्थानापन्न झाल्यावर ” गणपती बाप्पा मोरया ” म्हणत, एका वाहनापुढे नारळ वाढवून, सगळे झपूर्झाच्या दिशेने निघाले.  मग काय  उत्साहात  सगळे गाणी म्हणायला लागले. त्याचबरोबर खाऊवाटपही सुरू झाले. बघता बघता झपूर्झा कधी आले ते कळलेच नाही.

झपूर्झा हे कला आणि संस्कृती संग्रहालय खडकवासल्याच्या जवळ आहे. पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.  आपल्या संस्कृतीची आणि पारंपारिक कलांची ओळख व्हावी, त्यांची आवड निर्माण व्हावी, विशेषतः आताच्या नवीन पिढीला, हा त्यामागचा उद्देश. सात एकर जागेवर वसलेल्या या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात एकूण दहा कलादालने आहेत, ज्यातील कलाकृती नेहमी बदलत असतात. भारतातील राजा रविवर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, काही शिल्पकृती, परंपरागत पैठण्या यांसारखी वस्त्रे, सोन्या-चांदीचे असंख्य दागिने, जुन्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, अशा कितीतरी गोष्टी इथे आहेत. झपूर्झाच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला थोडी माहिती सांगितली. त्यानंतर चहा- बिस्किटे यांची व्यवस्था केली होती. तसेच तिथे पाच-सहा व्हील चेअर्सचीपण सोय केलेली होती. सगळीकडे फिरायला रॅम्प्स, लिफ्ट, प्रशस्त दालने, त्यामुळे शुभार्थींना तिथे फिरणे आणि कलाकृती बघणे खूपच सोयीस्कर झाले.  प्रत्येक दालनामध्ये तिथली माहिती द्यायला स्वयंसेवक होते. ठिकठिकाणी कलाकृतींबद्दलची माहिती लिहिलेली होती. सगळेजण गृप्स करून दालने पाहत असल्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. अगदी निवांतपणे सगळी दालने आणि त्यातील कलाकृती बघता आल्या. भरपूर फोटोही काढता आले. 

विशेष म्हणजे ज्यांनी या कलासंग्रहालयाची निर्मिती केली ते श्री. अजित गाडगीळ मुद्दाम वेळ काढून सर्वांना भेटायला आले होते. 

साधारण एक – दीडच्या सुमारास सगळेजण भोजनालयाकडे वळले. साध्या घरगुती बेताबरोबर उकडीचे मोदक हा एक सरप्राईज आयटम होता जेवणामध्ये. जेवल्यानंतर काहीजण आरामात गप्पा मारत बसले, काहीजण खडकवासला बॅकवॉटरच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढण्यात रमले. काहींनी अजून थोडा फेरफटका मारला जवळपास. तिथे जवळच एक शंकराचे छोटेसे देऊळ आहे. देवळाबाहेरील दीपमाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. आत गाभाऱ्यात खूप शांत वाटत होते.

थोड्या विश्रांतीनंतर चहापान झाले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. 

ही सहल इतर सहलींपेक्षा थोडी वेगळी होती. नेहमीप्रमाणे मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा विविध छोट्या स्पर्धा, खेळ यांचा समावेश जरी यामध्ये नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘ खूप काही छान बघायला मिळाले आज ‘ असाच भाव होता. सहलीनंतरचे काही दिवस तिथले फोटो, अरुण सुर्वेंनी तयार केलेले व्हिडिओज व्हाॅट्सॲप गृपवर सतत येत राहिले आणि प्रत्येकाला पुनःप्रत्ययाचा आनंद देत राहिले, हे मात्र खरे.

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ – विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले.शुभार्थीनीही भरभरून प्रतिसाद दिला.सविता बोर्डे औरंगाबादहून आणि फडणीस सर तळेगावहुन आले होते.सहभागींची नावे पुढे दिली आहेत.

१. सविता बोर्डे –  नृत्य ….शिवपंचाक्षरी

२. सुरेश फडणीस – गाणे ….पुकारता चला हु मै

३. सुनील कर्वे – नकला

४. शुभदा गिजरे –  भजन …. पायोजी मैंने

५. उमेश सलगर –  कविता

६. अरुण सुर्वे –  नृत्य ….फ्युजन

७. जगदीश माहेश्वरी –  कविता

८. विजया मोघे – भजन ….राम नाम गा ले

९. मोहन देशमुख – गाणे …. फूलों के रंग से

१०. श्रद्धा भावे – विनोदी उखाणे

११. शैला भागवत आणि शशिकांत भागवत –  नृत्य …. मला सांगा

१२. किरण सरदेशपांडे –  नाट्यछटा …. ट्रॅफिक पोलीस

१३. प्रणिता नरवाडकर –  गाणे …. लग जा गले

१४. रेखा आचार्य –  नृत्य ….सूर निरागस हो

१५. सुधाकर माने –  नृत्य ….I am a disco dancer

डॉ.अविनाश बिनीवाले आणि अविनाश धर्माधिकारी यांना कार्यक्रम पाहून उत्साह आला आणि स्टेजवर येवून अचानक सादरीकरण केले.शेवटी सैराटमधील गाण्यावर उपस्थितातील जवळजवळ सर्वांनी डान्स केला.हे दृश्य अवर्णनीय होते.’पार्किन्सनसह आनंदाने जगूया’ हे ब्रीद प्रत्यक्षात उतरताना दिसत होते.

कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभाराचे काम अंजली महाजननी केले.वसू देसाईनी सूत्र संचालन केले.अंजली महाजननी केशवराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व सहभागींना भेटवस्तू दिली.गप्पा मारत

अल्पोपहार झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रत्यक्ष सभा – १३ ऑगस्ट २०२३

१३ ऑगस्ट २०२३ – ‘Lady with the magic hand’ नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट आहेत.निसर्गोपचार आणि मसाज थेरपी यांचा पारंपारिक वारसा त्यांच्याकडे असल्याने त्यांनी आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीची सांगड घालून स्वत:ची उपचार पद्धती विकसित केली आहे.या आधारे त्यांनी रीजीडीटी,कंप,भास,फ्रीजिंग अशा पार्किन्सनच्या लक्षणावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.अनेक शुभार्थी प्रात्यक्षिकासाठी मॉडेल म्हणून पुढे आले.आशा रेवणकर यांनी डॉ.सुरभी यांची ओळख करून दिली.उमेश सलगर यांनी आभार मानले.श्री.साठे यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग केले.कॉफी आणि बिस्किटे यांचा आस्वाद घेत गप्पा झाल्या.आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 

मेळावा – ९ एप्रिल २०२३

९ एप्रिल २०२३ – जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर एस.एम. जोशी हॉल येथे प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला.पुण्यातील तसेच परगावचे शुभंकर, शुभार्थीही आवर्जून हजर होते.सभागृह तुडुंब भरले होते.प्रवेश करताना ताक देऊन स्वागत करण्यात आले. शुभार्थीच्या कलाकृतींचे प्रदर्शन बाहेर मांडले होते ते पाहून सर्व जण आत येत होते.  सुप्रसिद्ध क्रीडावैद्यक तज्ज्ञ हिमांशू वझे हे प्रमुख पाहुणे होते.गौरी इनामदार यांनी सुरुवातीला निमंत्रितांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.अंजली भिडे यांनी मधुर आवाजात इशस्तवन म्हटले.आशा रेवणकर यांनी मंडळाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.संस्थेचे संस्थापकसदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.अतुल ठाकूर यांनी वेबसाईट आणि स्वमदतगटाचे महत्व विषद केले.यानंतर डॉ. शोभना तीर्थळी यांनी कलाकृती प्रदर्शनातील सहभागींची माहिती सांगितली.गौरी इनामदार यांनी ‘चला संवाद साधूया….’ या पुस्तकाबद्दल आणि रुपांतरकार रामचंद्र करमरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.यानंतर प्रमुख पाहुणे हिमांशू वझे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.वक्त्यांनी ‘स्वास्थ्य संयोजन’ या विषयावर श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले.

श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.गौरी इनामदार यांनी गुरु ठाकूर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता केली.

सहल – १ डिसेंबर २०२२

१ डिसेंबर २०२२ – एक दिवशीय सहल आयोजित करण्यात आली.गेली दोन वर्षे होऊ शकला नाही तो सर्वांचा आवडता कार्यक्रम सहल.या वर्षीची सहल ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली’ येथे आयोजित केले होते.आमचे शुभार्थी देवराम गोरडे आण्णा हे या केंद्राचे सर्वे सर्वा.त्यांच्या उदार आदरातिथ्याचा प्रत्यय घेतला.निसर्गरम्य वातावरणातील मनोरंजनाची ठिकाणे,मासवडी,पिठले,ठेचा,लापशी असे ग्रामीण भोजन हुरडा पार्टी,शुभार्थी,शुभंकरांनी सादर केलेले विविध गुण दर्शन,या सर्वामुळे ही सहल सर्वाना सुखावून गेली.पुढचे कितीतरी दिवस सहलीच्या आठवणी व्हाटसअप ग्रुपवर चालू होत्या.त्या काळात सगळे सहभागी जणू पीडी विसरले यापेक्षा सहलीचे यश ते कोणते?

प्रत्यक्ष सभा – १७ ऑक्टोबर २०२२

कोजागिरी निमित्त नीलिमा बोरवणकर  यांचे सत्र झाले.त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले.या प्रसंगी शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत आणि समारोप गीत सादर केले.डॉ. शोभना तीर्थळी यांनी प्रास्ताविक केले.अंजली महाजन यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि सूत्र संचालन केले.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि मसाला दुध  यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.हा कार्यक्रम झूमवरून लाइव्ह दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यासाठी अतुल ठाकूर,गिरीश आणि शिरीष कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.

प्रत्यक्ष सभा – ११ सप्टेंबर २०२२

११ सप्टेंबर २०२२ – करोना नंतर पहिली प्रत्यक्ष सभा किरण सरदेशपांडे यांच्या मदतीमुळे ओक ट्रस्ट येथे झाली.औरंगाबादचे शुभंकर रमेश तिळवे पुण्यात येणार होते.त्यांनी काही लोक एकत्र भेटू अशी इच्छा व्यक्त केली.whats app वर सात तारखेला मेसेज टाकला ११ तारखेला ५५ शुभंकर, शुभार्थी हजर झाले.रमेश तिळवे यांची शुभंकर शुभार्थीना भेटण्याची प्रबळ इच्छा,सुंदर व्यवस्था असलेला ओक ट्रस्टचा हॉल,सरदेशपांडे यांनी sponsor केलेले स्वदिष्ट जेवण,सरदेशपांडे पती, पत्नी आणि टीमचे अगत्य.शरच्चंद्र पटवर्धन आणि रामचंद्र करमरकर या बुजुर्गांची उपस्थिती,शुभंकर,शुभार्थींचा अमाप उत्साह यामुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.

सविताताई मन:पूर्वक अभिनंदन

सविताताई मन:पूर्वक अभिनंदन
कालपासून पार्किन्सन मित्रमंडळाच्या Whatsapp ग्रुपवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.आमच्या शुभार्थी साविताताई बोर्डे LLM परीक्षेत ६८.५ टक्के गुण मिळवून A ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाल्या.पार्किन्सनमुळे उजवा हात काम करत नाही तरी रायटर घेऊन इप्सित साध्य केले.कौटुंबिक जाबादाऱ्यातून मोकळ्या झाल्यावर त्यांनी आपले पुढील शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे ठरवले. LLB च्या तिसऱ्या वर्षाला असतानाच त्यांना पीडीचे निदान झाले.पण त्यांनी न थांबता LLM ही केले.LLMच्या प्रकल्पासाठी त्यांचा ‘मुक्त जेल’ हा विषय होता.

त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. आणि त्यांच्या जिद्दीला सलाम.