ऑनलाईन मासिक सभा

                           एप्रिल  २०२० ते  आक्टोबर  २०२० 

                           ४ एप्रिल २०२० रोजी  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता. करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मेळावा घेता आला नाही.                 

            लॉकडाऊनमुळे मासिक सभाही होणे शक्य नसल्याने अतुल ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सचा पर्याय सुचविला. त्याद्वारे नेहमीच्या मासिक सभेप्रमाणे दुसऱ्या सोमवारी व्याख्याने,शेअरिंग इत्यादी करायचे ठरले.पहिली ट्रायल मिटिंग   ८ एप्रिल २०२० झाली.

           यानंतर आणखी काही ट्रायल मिटिंग झाल्या आणि पुढे प्रत्येक महिन्यात खालीलप्रमाणे मासिक सभा झाल्या.सर्व सभांचे रेकॉर्डिंग युट्युब चॅनेलवर आहे. त्याची लिंक वेबसाईटवर दिलेली आहे.सर्व सभांचे होस्ट डॉक्टर अतुल ठाकूर होते. सभांचे फोटो काढण्याचे आणि रेकॉर्डिंगचे काम गिरीश कुलकर्णी यांनी केले. 

           ११ मे – डॉक्टर रेखा देशमुख – ‘आनंदी कसे राहावे’ या विषयावर व्याक्यान झाले.डॉक्टर शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           ८ जून – डॉक्टर अमित करकरे यांचे ‘शुभांकाराविषयी सर्व काही’ या विषयावर व्याख्यान झाले. शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.श्यामलाताई शेंडे यांनी आभार मानले.

           १३ जुलै – डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे ‘आला पावसाला तब्येत सांभाळा’ या विषयावर व्याख्यान झाले.त्यांच्या हस्ते स्मरणिका २०२० चे वेबसाईटवर ऑनलाईन प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           १० ऑगस्ट – नीलिमा बोरवणकर यांचे ‘आठवणीतील मुलाखती या विषयावर व्याख्यान झाले..मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           १४ सप्टेंबर – डॉक्टर विद्या रवींद्र जोशी यांचे ‘मनाचे श्लोक आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले. 

          १२ आक्टोबर – डायबिटीस आणि पार्किन्सन्स या सहचरांबरोबर गेली कित्येक वर्षे राहणारे डॉ.सतीश वळसंगकर पोटविकार सर्जन यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा असा कार्यक्रम होता..मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.  

           सभांचे फोटो काढण्याचे आणि रेकॉर्डिंगचे काम गिरीश कुलकर्णी यांनी केले.   

                 नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत

                 ९ नोव्हेंबर २०२० – औरंगाबादचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.मकरंद माणिकराव कांजाळकर यांचे ‘पार्किन्सन्स आणि अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान झाले.रमेश तिळवे यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.

                 रविवार १३ डिसेंबर २०२० – मानसोपचार तज्ज्ञ मानसी देशमुख यांचे  ‘Psychoneuroimmunology’ या विषयावर व्याख्यान झाले.विजयालक्ष्मी रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी समारोप केला आणि आभार  मानले.

                 ११ जानेवारी २०२१ – सुप्रसिद्ध एकपात्री कलाकर आणि हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांचे ‘हास्ययोगातून तणावमुक्ती’ या विषयावर व्य्ख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.

                 ८ फेब्रुवारी २०२१  – डॉक्टर पराग ठुसे यांचे पार्किन्सन्ससाठी प्राणायाम या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.आशा रेवणकर यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.शोभना तीर्थळी यांनी समारोप केला आणि आभार मानले.

                 ७ मार्च २०२१ – न्यूरॉलॉजिस्ट डॉ.हेमंत संत यांचे पार्किन्सन्ससह पडण्याची समस्या या विषयावर व्याख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी समारोप                                          केला आणि आभार मानले.

                  एप्रिल २०२० पासून

  रविवार  ११ एप्रिल  २०२१ –  ११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन असतो यानिमित्त प्रथमच लॉकडाऊनमुळे ऑनलाईन मेळावा घेण्यात आला.संस्थेच्या अध्यक्षा श्यामला शेंडे यांनी स्वागत केले.मृदुला कर्णीनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.नागपूरच्या मीनल दशपुत्र यांनी म्हटलेल्या प्रार्थनेचा ऑडीओ आणि मुंबईच्या मोहन पोटे यांनी प्रत्यक्ष प्रार्थना म्हटली.संस्थेचे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर हृषीकेश पवार नृत्य सहभागींनी मनोगत व्यक्त केले.शुभार्थीच्या काल्कृती दाखविण्यात आल्या.त्याची माहिती शोभना तीर्थळी यांनी दिली..क्रिटिकलकेअर स्पेशालिस्ट डॉ.शिरीष प्रयागआणि कन्सल्टंट पॅथालॉजिस्ट डॉ.आरती प्रयाग यांनी ‘दोन ध्रुव’ (स्व.पु.ल.देशपांडेआणि स्व.विजय तेंडूलकर यांच्या प्रयाग हॉस्पिटलमधील उपचारा दरम्यानचे अनुभव) या विषयावर व्याख्यान झाले.वक्त्यांची ओळख अशा रेवणकर यांनी करून दिली.या प्रसंगी स्मरणिका २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षातील जोड स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी सूत्र संचालन केले.अतुल ठाकूर हे होस्ट तर गिरीश कुलकर्णी हे को होस्ट होते.

           १० मे २०२१ – न्युरोस्पीच पॅथालॉजीस्ट सोनाल चिटणीस यांचे ‘Cognitive Neurorehabilitation in movement disorder.निलेश कुरावळे  ; Things to understand and address’ या विषयावर व्याख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.अंजली महाजन यांनी समारोप केला.आणि आभार मानले.

            १४ जून २०२१ – न्यूरोसर्जन डॉ.निलेश कुरवाळे यांचे डीबीएस शस्त्रक्रिया समज गैरसमज या विषयावर व्याख्यान झाले.शैलजा कुलकर्णी यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी
समारोप केला.आणि आभार मानले.

                  .१२ जुलै  २०२१ – मोटीवेशनल स्पिकर आणि कार्पोरेट ट्रेनरसंदीप दांडेकर यांचे ‘मळभातला सुर्यप्रकाश’ या विषयावर व्याख्यान झाले.अमिता धर्माधिकारी यांनी ओळख करून दिली..मृदुला कर्णी यांनी समारोप केला.आणि आभार मानले.                   

९ ऑगस्ट २०२१ –  मराठी चित्रपट क्षेत्र,संगीत नाटके,वेब सेरीज,भाडिपाचे उपक्रम यामधे आपला वेगळा ठसा उमटवणारा गुणी कलाकार निपुण धर्माधिकारी. याच्याशी मृदुला कर्णी यांनी दिलखुलास बातचित केली.निपुण हा शुभार्थी डॉ. अविनाश धर्माधिकारी आणि शुभंकर डॉ.अमिता धर्माधिकारी यांचा सुपुत्र आहे.त्या दोघानाही गप्पात सामील करून घेतले होते.        

५ सप्टेंबर २०२१ – शेखर बर्वे यांच्या ‘पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ या पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशन दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.आशा रेवणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.आभार मानले.       

९ ऑक्टोबर २०२१ – सुप्रसिद्ध वैद्य आणि योगतज्ज्ञ डॉक्टर पराग ठुसे यांचे ‘Power in your hand’ या विषयावर व्याख्यान झाले.व्याख्यानात पार्किन्सन साठी उपयुक्त मुद्रांची त्यांनी माहिती दिली.विलास गिजरे यांनी ओळख करून दिली.शोभना तीर्थळी यांनी आभार मानले.        

८ नोव्हेंबर २०२१ – स्पीच थेरपिस्ट डॉ.नमिता जोशी यांचे ‘Role of Speech therapist in intervention of speech,voice,and swallowing in individuals with Parkinson’s Disease’ या विषयावर व्य्ख्यान झाले.व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे यातून गिळने,बोलणे,आवाज यासंबंधी अनेक शंकांचे निरसन झाले.डॉ.शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांचा परीचय करून दिला आणि आभार मानले.

१३ डिसेंबर २०२१ – आयुर्वेद सत्वावजय व सायकोथेरपिस्ट डॉक्टर यश वेलणकर यांचे ‘भावनिक सजकता’ या विषयावर व्याख्यान झाले.भावनांचे चार प्रकारात वर्गीकरण करून त्याना क्रमांक देत भावनिक सजकता कशी अंगीकारता येते हे सांगितले पार्किन्सनबाबत भावनिक सजकतेचे महत्व आणि त्यावर कृती हे उदाहरण देऊन सांगितले. अंजली महाजन यांनी ओळख करून दिली आणि आभार मानले


         १० जानेवारी २०२२ – संत साहित्याच्या अभ्यासिका, लेखिका डॉक्टर आरती दातार यांचे’ हे जगणे आनंदाचे’ या विषयावर व्याख्यान झाले.तरुण वयात दैवाच्या निर्घुण हल्ल्याशी  संघर्ष करत जगणे आनंदाचे कसे केले हा अनुभव सर्वाना भारावून टाकणारा होता.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली व आभार मानले.        

१४ फेब्रुवारी २०२२ – नेत्रविशारद वैशाली नाबर यांचे ‘Parkinson disease and Ophthalmic disorders’ या विषयावर व्याख्यान झाले.त्यांनी समर्पक आणि माहितीपूर्ण स्लाईडच्या माध्यमातून डोळे, दृष्टी आणि पार्किन्सनमुळे त्यावर होणारे परिणाम याचा विस्तृत आढावा घेतला.शंका निरसनही केले.त्यांचा परिचय आणि आभार मानण्याचे काम शोभना तीर्थळी यांनी केले.      

१४ मार्च २०२२ – सूक्ष्म जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि विपश्यनेचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र देवपूरकर यांनी ‘मनस्थिती, परिस्थिती आणि विपश्यना’ या विषयावर व्याख्यान झाले.आकृत्या,illustrations आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे यांच्या सहाय्याने मनस्थितीचे कामकाज आणि मनाने सजकपणे परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी विपश्यनेची भूमिका स्पष्ट केली.त्यातील अनापन तंत्राची ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली व आभार मानले.                              एप्रिल २०२२ पासून
       

१० एप्रिल २०२२ – ११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन असतो. यानिमित्त ऑनलाईन मेळावा घेण्यात आला.मृदुला कर्णीनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.सोलापूरच्या डॉ.सतीश वळसंगकर यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर .शुभार्थीच्या कलाकृती दाखविण्यात आल्या.त्याची माहिती शोभना तीर्थळी यांनी दिली.नृत्य गुरु हृषीकेश पवार यांनी २००९ पासूनचा नृत्य उपक्रमाचा आढावा विविध नृत्यफितीद्वारे घेतला.तांत्रिक अडचणीमुळे व्हिडीओचा काही भाग दिसला नाही. नंतर स्मरणिका  २०२२ चे  प्रकाशन मनोविकास तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. मृदुला कर्णी यांनी त्यांची ओळख करून दिली आणि ‘मजेत कसे जगायचे’ या विषयावर मुलाखत घेतली.अतुल ठाकूर हे होस्ट तर गिरीश कुलकर्णी हे को होस्ट होते.            

९ मे २०२२ – डॉ.अरुणा नार्वेकर यांचे ‘पार्किन्सन्सची कारणे आणि संभाव्य उपचार’ या विषयावर विविध स्लाइडस् दाखवत व्याख्यान झाले.डॉ.गौरी भोंडे यांनी डोपामाईनची पातळी मोजण्या संबंधात थोडक्यात माहिती सांगितली.डॉ,अमिता धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक, स्वागत,वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.