अतुल ठाकूर यांनी महिन्याच्या नियमित सभेबरोबर आठवड्यातून एकदा अनौपचारिक सभा घ्यावी असे सुचवले.या सभेत शुभंकर,शुभार्थींच्या कलेचा परिचय, कथा, काव्य, साहित्य, कला, गप्पागोष्टी, यांची रेलचेल असेल. त्यांच्यातील तज्ज्ञ व्यक्तींचे वेगवेगळ्या विषयावर मनोगत असेल.शुभार्थी,शुभंकर यांच्यासाठी हा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत व्हावा अशी अपेक्षा होती..
त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम सुरु झाला.
रविवार २५ ऑक्टोबर २०२० – पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांच्याशी अनौपचारिक गप्पा झाल्या.त्याना खोकला येत होता तरीही त्यांनी मध्येच औषध घेऊन गप्पा रंगवल्या.त्यांच्या गप्पांचा व्हिडीओ मंडळाच्या यु ट्युबवर उपलब्ध आहे. शिवाय अतुल ठाकूर यांनी लिहिललेला लेख वेबसाईटवर आहे.
पहिल्या अनौपचारिक सभेच्या यशानंतर या गप्पाना नाव द्यावे असे ठरले. ‘भेटू आनंदे’ या नावाने हा कार्यक्रम सुरु झाला.ही सभा सोमवारी होणार असली तरी.अपवादात्मक परिस्थितीत,सणवार आले असल्यास किंवा वक्त्यांना तो दिवस सोयीचा नसल्यास आगाऊ कल्पना देऊन दिवस अथवा वेळ बदलली जाईल असेही ठरले.
सोमवार २ नोव्हेंबर २०२० – ‘भेटू आनंदे’ या नावाने पहिली अनौपचारिक सभा झाली.विजयालक्ष्मी रेवणकर यांनी शुभंकर म्हणून आलेले आपले अनुभव सांगितले.
सोमवार २३ नोव्हेंबर २०२० – दिवाळी नुकतीच होऊन गेली त्यानिमित्त प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचे सुपुत्र विजय कदम आणि स्नुषा प्रा.नीला कदम यांचा ‘राम कदम यांच्या आठवणी आणि गाणी हा सुरेल कार्यक्रम सादर झाला.मृदुला कर्णी यांनी ओळख करून दिली आणि आभार मानले.
सोमवार २१ डिसेंबर २०२० – सांगली येथील शुभार्थी गीता पुरंदरे या रोज नवनवीन पुष्परचना टाकत असतात.त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता.सर्वांना तो प्रेरणा आणि सकारात्मक उर्जा देवून गेला.
सोमवार २८ डिसेंबर २०२० – खास शुभंकरांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती.प्रतिसाद पाहून पुढे अशा कॉन्फरन्स आयोजित करायचे ठरले होते प्रतिसाद उत्तम मिळाला.
सोमवार १८ जानेवारी २०२१ – नागपूर येथील शुभार्थी अरविंद पाटणकर आणि शुभार्थी ज्योती पाटणकर यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.ज्योती पाटणकर यांनी त्यांनी केलेल्या विविध कलाकृती दाखवल्या.त्यांच्या डीबीएस सर्जरीबाबत अरविंद पाटणकर यांनी माहिती सांगितली.शुभंकर, शुभार्थी यांच्या सहकार्यातून पार्किन्सन्ससह कसे आनंदी राहता येते याचा वस्तुपाठ मिळाला.
सोमवार २५ जानेवारी २०२१ – बेळगावच्या आशा नाडकर्णी तसेच पुण्याच्या सरोजिनी कुर्तकोटी आणि विलास गिजरे या शुभंकरांनी आपले अनुभव सांगितले.विलास गीजरे यांच्या बरोबर शुभार्थी शुभदा गीजरे.स्नुषा, नात ही सामील झाल्या होत्या.कुटुंबाच्या एकत्र प्रयत्नातून शुभार्थीला कशी उभारी मिळते याचे दर्शन झाले.आशाताईनी अनेक अडचणींवर मात करत जाणीवपूर्वक शुभार्थी प्रदीप यांचा पार्किन्सन्स आटोक्यात ठेवला स्वत:लाही स्पेस दिली.सरोजिनीताईंनी स्वत:ला ज्युनिअर म्हटले तरी पतीचा पार्किन्सन्स व्यवस्थितपणे समजून घेऊन तो नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले.
सोमवार १५ फेब्रुवारी २०२१ – डॉ.शोभना तीर्थळी यांनी फ्लावर ‘ फ्लॉवर रेमेडीची तोंडओळख’ या विषयावर व्याख्यान दिले.व्याख्यानात फ्लॉवर रेमेडीचा जनक एडवर्ड बाख,.फ्लॉवर रेमेडीची वैशिष्ट्ये,पार्किन्सन्स शुभंकर ,शुभार्थीना भावनिक तणावात याचा होणारा उपयोग याबद्दल माहिती दिली.
सोमवार २२ फेब्रुवारी २०२१ – शुभंकर सुजाता फणसळकर आणि नलीन जोशी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम झाला.सुजाताताईनी संजय फणसाळकर यांच्या योग आणि अक्युप्रेषर बाबतीतील तज्ज्ञत्वाची आणि त्याचा उपचारासाठी केलेल्या वापराची माहिती सांगितली.नलीन यांनी पत्नी प्रज्ञाच्या आजारातील चढउतारात वेळोवेळी शास्त्रशुद्ध अभ्यास आणि निरीक्षणाच्या सहाय्याने प्रज्ञास आधार कसा दिला हे सांगितले.
सोमवार १५ मार्च २०२१ – बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश जावडेकर आणि त्वचारोगतज्ज्ञ सुषमा जावडेकर या पती पत्नींशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.पार्किन्सन्स आनंददायी कसा बनवला ते त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन हसतखेळत गप्पा मारत सांगितले.जावडेकर यांनी काढलेली पेंटिंग्ज दाखवली.
सोमवार 22 मार्च २०२१ – पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या हितचिंतक सई कोडोलीकर यांनी गो.नि.दांडेकर लिखित ‘दुर्गभ्रमणगाथा’ मधील काही भागाचे अभिवाचन केले.गोनिदांनी केलेल्या सुरस वर्णनाबरोबर त्या त्या ठिकाणचे फोटो टाकल्यामुळे अभिवाचन अधिक देखणे झाले.
रविवार २५ एप्रिल २०२१ – जागतिक पार्किन्सन्स दिन मेळावा २०२१ हा पहिलाच ओंनलाईन मेळावा होता.अनेक अडथळ्यांची सामना करत तो उत्तम रित्या पार पडला.’२०२१ जागतिक पार्किन्सन्स मेळावा Behind the curtain’ या विषयाद्वारे आयोजकांनी आपले याबाबतचे अनुभव सांगितले.
सोमवार ३ मे २०२१ – शुभार्थी किरण सरदेशपांडे आणि शुभंकर सीमा सरदेशपांडे यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.पार्किन्सन्सशी त्यांची मैत्री त्यांनी स्वत:वर विनोद करत सांगितली.त्यांनी स्वत: डिझाईन केलेल्या पत्त्यांनी त्यांची क्रिएटीव्हिटी दाखवली.शुभंकर शुभार्थीसाठी गप्पा प्रेरणादायी ठरल्या.
सोमवार २४ मे २०२१ – शुभार्थी उमेश सलगर या हरहुन्नरी व्यक्तीशी अनौपचारीक गप्पा झाल्या.त्यांनी दारात काढून दाखवली रांगोळी,स्वत: केलेल्या पदार्थांच्या कृती दाखवल्या.दिवंगत पत्नीच्या आठवणी जागवल्या.आणि पार्किन्सन्सबरोबर आनंदी राहण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सांगितली.सर्वजण भरून गेले होते.
सोमवार ३१ मे २०२१ – शुभंकर श्रीपाद कुलकर्णी यांनी आपल्या अनौपचारिक गप्पातून शुभंकर कसा असावा याचा वस्तुपाठ दिला पत्नी शिल्पा कुलकर्णीला पार्किन्सन्स होऊन २५ वर्षे उलटून गेली.विविध उपचार, सातत्याने व्यायाम यामुळे शिल्पा ताई यांचा पीडी आटोक्यात ठेवण्यात त्यांनी यश मिळवले आजही त्या स्वत:ची कामे स्वत: करतात.
सोमवार २१ जून २०२१ – लाईफस्पार्क टेक्नोलॉजीस – साईन आयआयटी मुंबईचे अमेय देसाई यांचे ‘Sensory cuing to improve gait and reduce falls’ यासाठी device करण्याच्या त्यांच्या प्रयोगाबद्दल बोलणे झाले.त्यांची माहिती शुभार्थी साठी आशेचा किरण दाखवणारी होती.प्रयोगात सहभागी होऊ इच्छिणार्यांना त्यांनी नावे देण्याची विनंती केली. ज्यांनी नावे दिली त्यांचा स्वतंत्र whats app group करण्यात आला.
सोमवार दि. ५ जुलै २०२१ – डीबीएस शस्त्रक्रिया झालेल्यांचे अनुभव कथन ठेवले होते. यात नागपुरच्या ज्योती पाटणकर,मीनल दशपुत्र,विजय जोशी,सुधीर वकील,पुण्याच्या सविता पाठक,नाशिकच्या पुष्पा नागले हे शुभार्थी आणि त्यांचे शुभंकर सहभागी झाले.प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले.चर्चा खूपच रंगली.शस्त्रक्रिया झालेल्यांना प्रत्यक्ष पाहून जे शस्त्रक्रिया करू इच्छितात त्यांना दिलासा मिळाला.
सोमवार २६ जुलै २०२१ सर्वात सीनीअर शुभार्थीच्या शुभंकर रेखा वकील, सर्वात सीनीअर शुभंकर जोत्सना सुभेदार आणि स्वतःच स्वतःच्या शुभंकर असलेल्या वनीता सोमण यांचे अनुभव कथन झाले.प्रत्येकाचे अनुभव ,समस्या वेगळ्या होत्या पण त्यांना जिद्दीने, आनंदाने,कल्पकतेने तोंड देण्याची वृत्ती सारखीच होती.शुभंकर शुभार्थीसाठी हे अनुभव प्रेरणादायी ठरले.
सोमवार दि. १६ आगस्ट २०२१ -कबीर बागेत काम केलेल्या योगशिक्षिकाशुभंकर मनीषा मनोहर लिमये यांचे ‘पार्किन्सन्ससाठी ‘अ’ ची बाराखडी’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.अष्टांग आयुर्वेद येथे झालेल्या सेमिनार मध्ये चंद्रकांत शहासने यांनी ही बाराखडी शिकविली.यात ओंकाराचे १२ भाग केलेले आहेत याचा प्रयोग पती मनोहर लिमये यांच्यावर केल्यावर त्यांना फायदे जाणवले.शुभंकर शुभार्थिनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
सोमवार दि. २० सप्टेंबर २०२१ – आपल्या फुलराणी शुभार्थी गीता पुरंदरे यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.प्रश्नोत्तरे स्वरूपाचा हा कार्यक्रम होता.त्यांचे यामागचे कष्ट,समरसता,सातत्य पाहून सर्व भारावून गेले..त्यांच्या विविध पुष्परचना यावेळी अतुल ठाकूर यांनी स्क्रीनवर शेअर केल्या.प्रत्यक्ष पुष्परचना करतानाचा व्हिडीओही दाखविला.
सोमवार दि. २७ सप्टेंबर २०२१ – पार्किन्सन मित्रमंडळाच्या कार्यवाह आणि शुभंकर अशा रेवणकर यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम झाला.शुभंकर म्हणून त्याना आलेल्या अडचणी आणि त्यांनी त्यातून धैर्याने काढलेले मार्ग,याचा त्यांनी घेतलेला आढावा सर्वांची मने हेलावून गेला.आपल्या अडचणी दु;खे यापुढे काहीच नाहीत ही सर्वांची भावना झाली.
मंगळवार दि. १९ ऑक्टोबर २०२१ – कोजागिरी निमित्त शुभार्थी उल्हास गोगटे यांची मुलाखत डॉ.शोभना तीर्थळी यांनी घेतली..उल्हास गोगटे म्हणजे बाबांची मानसकन्या आणि त्यांच्या आठवणीची पानगळ पुस्तकाची प्रकाशिका त्रिवेणी कुलकर्णी.आणि मुलगा अमर ही यावेळी उपस्थित होते.एक आदर्श शुभंकर आणि जिंदादिल बाबा ८९ व्या वर्षीही दु;खावर संकटांवर मत करून आनंदाने जगात आहेत .त्यांचा जीवनपट थक्क करणारा आणि प्रेरणादायी ठरला.त्यांच्या काही कविता त्रिवेणीनी वाचून दाखवल्या.त्यांच्या विविध छंदांचे फोटो योग्यवेळी अतुलनी टाकल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.
सोमवार दि. २२ नोव्हेंबर २०२१ -शुभंकर जोत्स्ना पुजारी यांनी आपले अनुभव सांगितले.बाराक्षाराबाद्द्ल माहिती सांगितली शुभार्थी दिनेश पुजारी यांच्यासाठी त्या वेळोवेळी बराक्षाराचा उपयोग करतात त्यांचा याबाबतचा अनुभव चांगला आहे.
सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ -भाषातज्ज्ञ,बहुभाषा अभ्यासक शुभार्थी अविनाश बिनीवाले डी.लिट. यांनी शब्द कोश या विषयावर व्याख्यान दिले.त्याना मुंबई विद्यापीठाने डी.लिट.दिली त्याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे मानपत्र देण्यात आले .मानपत्राचे लेखन प्रा. मृदुला कर्णी यांनी केले.
सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ – शुभार्थी विनोद भट्टे यांचे अनुभव कथन झाले.त्यांच्या पत्नीला अल्झायमर झाल्यावर त्यांनी शुभंकर म्हणून उत्तम साथ दिली.आता त्यांना पार्किन्सन्स झाल्यावर ते स्वत:च स्वत:चे शुभंकर आहेत.त्यांनी फोटोग्राफी,पेंटिंग,चारोळ्या लेखन असे छंद जोपासले आहेत.
सोमवार दि.१७ जानेवारी २०२२ – अनुश्री,ओंकार, हृशीकेश या भावंडानी शुभंकर म्हणून आपले अनुभव कथन केले.शुभार्थी अश्विनी दोडवाड या त्यांच्या मातुश्री आहेत.ओंकार इंग्लंडहून तर अनुष्का, हृशीकेश पुण्यातून बोलले.तिघांनी छान समन्वय साधत आपले अनुभव सांगितले.प्रत्यक्ष आपली शुभंकराची भूमिका बजावतानाही त्यांच्यात समन्वय आहे.
सोमवार दि.३१ जानेवारी २०२२ – शुभंकर अंजली महाजन यांचे त्यांच्या रक्तदानाच्या अनुभवावर व्य्ख्यान झाले.त्यांचा रक्तगट ओ आरएच निगेटिव्ह आहे हा दुर्मिळ आहे आणि ऐनवेळी रक्त द्यावे लागते.त्यांनी २२ वेळा बोलावणे आल्यावर हातातले काम टाकून रक्तदान केले.त्यांनी आपल्या अनुभवाबरोबर रक्तदाना विषयीही माहिती दिली.आशा रेवणकर यांनी त्यांची ओळख करून दिली.
सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ – समुपदेशक आणि शुभंकर अस्मिता कुलकर्णी यांनी ‘एक समुपदेशक शुभंकराच्या भूमिकेतून’ या विषयावर व्याख्यान दिले.आपल्या पतीचा पार्किन्सन हाताळताना समुपदेशक असल्याने आपल्या पतीचा पार्किन्सन हाताळणे आणि त्यांची मानसिक अवस्था सांभाळणे त्या चांगल्या प्रकारे करूशकतात.हे करताना शुभांकराने स्वत:चे स्वास्थ्य सांभाळणे आणि स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.मृदुला कर्णी यांनी त्यांची ओळख करून दिली.
सोमवार दि.२८मार्च २०२२ – माधुरी पेठे यांनी ‘बारा क्षाराची तोंडओळख’ या विषयावर व्याख्यान दिले.यामागचा सिद्धांत त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितला.विषय समजून घेतला तर घरच्याघरी विविध शरीरिक तक्रारीवर आणि जाराव्र आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो.
रविवार दि.२४ एप्रिल २०२२ – आपल्या सर्वांचे लाडके नृत्यगुरू हृषीकेश पवार यांची मुलाखत डॉ.शोभना तीर्थळी यांनी घेतली. त्यांचा स्वत:चा नृत्यप्रवास,पर्किन्सन्स मित्रमंडळाचे भेट, शुभार्थीना १२ वर्षे मोफत शिकवताना आलेले अनुभव,मिळालेला आनंद यावर सविस्तर उत्तरे दिली.अनेकाना मुलाखत ऐकून नृत्यवर्गास प्रवेश घ्यावा असे वाटले.
सोमवार दि.२ में २०२२ – शुभार्थी डॉ.अविनाश धर्माधिकारी आणि शुभंकर डॉ.अमिता धर्माधिकारी यांनी ‘तणाव कमी होण्याचा गर्भ संभवतेवर सुपरिणाम’ या विषयावर विविध आकडेवारीच्या ताक्त्यासह व्याख्यान दिले.धर्माधिकारी पती पत्नी लोणावळ्याच्या मन:शक्ती केंद्रातील या प्रकल्पातील सांखीकीय विश्लेषणासाठी मदत करतात,