पार्किन्सन्स मित्रमंडळ
पार्किन्सन मित्रमंडळ शुभंकर आणि शुभार्थी यांनी एकत्र येऊन चालवलेला स्वमदत गट आहे.याची मुहूर्तमेढ शरच्चंद्र पटवर्धन आणि मधुसूदन शेंडे या धडपड्या व्यक्तींनी रोवली.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या पत्नीला पार्किन्सन होता आणि मधुसूदन शेंडे स्वत: पार्किन्सनग्रस्त होते.
समस्याग्रस्तांपर्यंत माहिती पोचवावी, एकमेकांच्या सुखदु:खाची अनुभवाची माहितीची देवाणघेवाण व्हावी ही भावना तीव्र झाली आणि स्वमदतगट वाढत गेला.
स्वमदतगटात समान समस्याग्रस्त अनौपचारिकरित्या एकत्र येतात.विविध उपक्रमाद्वारे समस्या स्विकारण्याचे, निवारण्याचे प्रयत्न होतात.पार्किन्सन्स बाबत पुण्यातील पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदतगटाच्या संपर्कात आल्यावर अनेकांचा पिडीशी दोस्तीपर्यंतचा प्रवास सुकर झाला. पिडीसह आनंदी जगण्यासाठी ‘मदत घ्या मदत करा’ हे मित्रमंडळाचे ब्रीदवाक्य असल्याने इतर शुभार्थी शुभंकराना बोट धरुन दोस्तीच्या प्रक्रियेसाठी मदत करायची हे काहींचे मिशन बनले.सतत सक्रिय राहिल्याने आजाराचा विसर पडतो,समाधान तर मिळतेच.
मित्रमंडळात सहभागी सर्वानाच समदु:खी भेटल्याने दिलासा मिळतो.२०/२५ वर्षे पिडी असलेले शुभार्थीही उपक्रमात सह्भागी होत असलेले पाहून भीती कमी होते.एकटेपणाची भावना दूर होते.धैर्याने आजाराशी सामना करणारे शुभार्थी पाहून आत्मविश्वास वाढतो.सामाजिक भयगंड दूर होतो.विविध तज्ञांची व्याख्याने, मराठीतून तयार केलेले साहित्य यामुळे आजाराबद्दल आणि उपचाराबद्दल यथार्थ ज्ञान मिळते,गैरसमज दूर होतात, एकमेकांच्या अनुभवाच्या देवाणघेवाणीतून विविध लक्षणावर मात करण्यासाठी उपाय समजतात.कला, क्रिडा, सहली यामुळे सहकार्याची भावना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.स्पिच थेरपी, फिजिओथेरपी,ट्रेडमिल,योगा,प्राणायाम, संगितोपचार, नृत्योपचार, ड्रमथेरपी या आधारे प्रयोगही केले जात आहेत. या सर्वामुळे पीडी झाला, आता संपल सगळ असे म्हणत हतबल झालेल्या शुभंकर शुभार्थीचा आशावाद जागृत झाला. जगण्याची नवी प्रेरणा मिळाली.
उद्दिष्टे
१. पार्किन्सनग्रस्तांपर्यंत पार्कीन्सन्स मित्रमंडळाच्या कार्याची माहिती पोचविणे.
२.पार्किन्सन्स साक्षरता – .यासाठी लिखित साहित्य,प्रसारमाध्यमे,तज्ञांची व्याख्याने,वेबसाईट,युट्युब,झूम मिटिंग,फेसबुक,Whatsapp इ,चा वापर
३. पार्किन्सन्सच्या स्वीकारासाठी पार्किन्सन्सशी सामना करण्यासाठी शुभार्थी व शुभंकरांना सहकार्य करणे.
४.अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ पुरविणे.
५. सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणे.
६. शुभार्थीच्या जीवनशैलीचा स्तर उंचावण्यासाठी शारीरिक,मानसिक.सामाजिक कार्यप्रवणता वाढविण्यास प्रयत्न करणे.
पूर्तता
१.माहिती पोचविण्यासाठी,वृत्तपत्रे,नियतकालिके,आकाशवाणी यांचा वापर.पुण्यातील २८० आणि परगावचे ८० अशा ३६० शुभार्थी मित्रमंडळाचे सभासद आहेत.ही संख्या बदलती असते.
२.पार्कीन्सन्स साक्षरतेसाठी विविध तज्ञांची व्याख्याने,मराठीतून ३ पुस्तके,१३ स्मरणिका प्रकाशित.शिवाय फोन,वेबसाईट,युट्युब,झूम मिटिंग,फेसबुक,Whatsapp इ,चा वापर
३.सहली,सभा,फोन, घरभेटी याद्वारे गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी मदत.
भविष्य कालीन योजना
१.घरभेटीसाठी स्वयंसेवक तयार करणे.
२.इतर गावात स्वमदतगट तयार करण्यास मदत करणे.
३.शुभार्थीना सोयीच्या ठिकाणी छोट्या गटात सभा घेणे.
४.आयुर्वेद,होमिओपाथी,युनानी,पुष्पौषधी,संगीत नर्तन इत्यादी इतर उपचारपद्धतीचा पूरक म्हणून वापर करण्यासंबंधी विविध पाथीच्या तज्ञांनी एत्रितपणे संशोधन करण्यासाठी पाठपुरावा करणे.
५.Specialised Nurses Burea निर्माण करण्याचा प्रयत्न
६.वर्षातून दोनदा शिबीर घेऊन परगावच्या रुग्णांसह अल्पदरात तपासणी