Tuesday, December 3, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयी गप्पा - २७ - शोभनाताई

पार्किन्सन्सविषयी गप्पा – २७ – शोभनाताई

अंजली महाजनच्या घरी मी प्रथम गेले. त्यावेळी ती शाळेत मुख्याध्यापिकेची नोकरी करत होती.तिचे पती केशवराव स्वत:ची काळजी घेऊ शकत होते तिच्या सासूबाईही चांगल्या परिस्थितीत होत्या.ती घरी नसली तरी केशवराव आनंदी राहतील याची योजना तिने करून ठेवली होती.गच्चीतली छोटी बाग केली होती,देवपूजेचे,वर्तमानपत्रे लावून ठेवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते.त्यांच्या आवडीच्या महमद रफीच्या गाण्याच्या सीडी आणून ठेवल्या होत्या.दुपारी अडीच तीन पर्यंत ती घरी येई.पण जेंव्हा त्यांना नैराश्य येत आहे,त्यांचा आत्मविश्वास कमी होत आहे असे लक्षात आले तेंव्हा अंजलीने मुलीशी चर्चा करून स्वेच्छयानिवृत्ती घेतली.’माझ्या पत्नीने घेतली स्वेच्छयानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी वृत्ती ‘ असा लेख केशवरावांनी स्मरणिकेसाठी दिला होता. या लेखाची लिंक सोबत दिली आहे अवश्य वाचा.त्यांची अंजलीच्या उपस्थितीने असुरक्षितता संपली,दिवसभरातील प्रत्येक कृती आनंद देवू लागली. ‘केवळ पत्नीच्या उपस्थितीने माझा निम्मा आजार बरा झाला’ असे त्यांनी लिहिले आहे.

मी जितक्या वेळा तिच्या घरी गेले तितक्यावेळा तिने त्यांच्या पीडीच्या अवस्थेनुसार घराची रचना बदललेली दिसली.उदा तिसऱ्या.मजल्यावर घर असल्याने त्यांचे खाली जाणे कमी झाल्यावर तिने बाल्कनी आत घेतली,गज लावून ती बंद केली.त्यावर रुफ केले,झोपाळा लावला,तेथे बसून रस्त्यावर पाहण्यात केशवराव रमू लागले.ती स्वत:सासूबाई आणि पतीचे सर्व करता होती पण जेंव्हा हे अशक्य आहे हे लक्षात आले तेंव्हा तिने ब्युरोचा माणूस ठेवला.

या प्रत्येक निर्णयानंतर नातेवायिक,समजतील इतर यांच्याकडून टीका टिप्पणी होत राहिली.पण अंजली प्रत्येकवेळी निर्णयावर ठाम होती कारण तिने ते विचारपूर्वक घेतले होते.शुभराने आजार समजून घेतला.शुभार्थीचे सातत्याने निरीक्षण केले कि असे योग्य निर्णय घेता येतात.

या पीडीच्या अवस्था म्हणजे काय? आणि इतर काही शुभंकरांचे अनुभव पुढच्या गप्पात पाहू. केशव महाजन यांच्या लेखाची लिंक.

https://parkinsonsmitra.org/…/2015/08/SwecchaNivRuti201…

अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :

http://parkinson-diary.blogspot.in/

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Parkinson’s Mitramandal, Pune( https://www.youtube

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क