बाप्पा येण्या आधीच आनंदान भरून जात मन
बाप्पा येतो वाजत गाजत अन् बदलून जात वातावरण
घराघरात आणि मंडळांमधूनी
उत्साह असतो सर्वांना
लहान थोरांबरोबर उधाण येत भक्तांना
जास्वंदींच्या फुलांबरोबर मान मोठा दुर्वांना
नैवेद्यासाठी तितकाच मान असतो उकडीच्या मोदकांना
आरास करून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात
शब्द चुकतात पण घराघरातून
आरत्या मोठ्याने म्हणतात
खिरापत म्हणून गुळखोबर त्याला प्रसादाचा अर्थ
गणेशाच्या पुजेचं पाणी असते पवित्र तीर्थ
गावागावातील विविध माणसं सहभागी होतात उत्सवात
श्री गणेशाचेच नामस्मरण असते प्रत्येकाच्या स्वरात
पौराणिक, सामाजिक देखावे मंडळ फार सुरेख करतात
कितीही जागरण झाले तरी लोक रात्रभर पहातात
दहा दिवस झटपट जातात येतो निरोपाचा क्षण
ओल्या होतात पापण्या अन् दुःखी होते मन
बाप्पा येण्या आधी त्याची किती बघतो वाट
पण अनंत चतुदर्शीला नदीवरून आपला रिता येतो पाट
काही म्हणा बाप्पाच्या उत्सवाचा वेगळाच असतो थाट
म्हणून च पुढील वर्षी लवकर या असे म्हणतो आपण जोशात
गणपती बाप्पा मोरया
सौ अंजली महाजन
दि.03 सप्टेंबर 2019
खुप छान कविता.