पार्किन्सन्सच्या आजारात भास होणे ( hallucinations ) हा एक काळजीचा व भीतीदायक प्रकार असतो.
पार्किन्सन्सचा आजार असणाऱ्या काही लोकाना भास का होतात?
साधारणत: पार्किन्सन्सचा आजार झाल्यानंतर काही वर्षानी काही रुग्णांना भास होतात. आजाराच्या सुरवातीच्या काळातही तरूण अथवा वयस्क लोकांना भास होऊ शकतात; पण बरेच दिवस हा आजार असणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. भास सुरवातीस झाल्यास पार्किन्सन्ससारख्या दुसऱ्या आजाराचाही विचार करावा लागतो. भास होणे हा औषधाचा दुष्परीणामही असू शकतो; परंतु प्रत्येकाला हा दूष्परीणाम होतोच असे नाही. ते औषधाचा प्रकार, त्याचा डोस व घेणाऱ्या व्यक्तीवर अवलबून असते. औषधाचा डोस जास्त असेल, तर भास होण्याचे प्रमाण अधिक असते.
भास म्हणजे काय?
भास म्हणजे प्रत्यक्षात नसताना काही पाहिल्या किवा ऐकल्यासारखे वाटणे, काही वास येणे किंवा काही चव लागणे. भास आपल्या पचेद्रीयापैकी कोणत्याही इंद्रियावर परिणाम करू शकतो. भासाचे खालीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत.
दृश्य भास – प्रत्यक्षात नसताना व्यक्ती, नातेवाईक, प्राणी, कीटक दिसणे. भासाचा हा सर्वात जास्त घडणारा प्रकार आहे. भास होणारी व्यक्ती त्याचे सविस्तर वर्णन करू शकते. भास थोड्या वेळासाठी ही होऊ शकतो.
ऐकण्यातले भास – दरवाज्याचा किवा घंटेचा आवाज नसताना ऐकू येणे किंवा बोलणे ऐकल्यासारखे वाटणे.
स्पर्शाचे भास – आपल्या जवळपास कोणी वावरल्यासारखे वाटणे.
वास व चवी भास – काही वास वा चव नसताना त्याची जाणीव होणे:
ह्या गोष्टी एखाद्या वेळेस घडल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करावे; पण हे वारंवार घडू लागले, तर डॉक्टराना वेळीच कल्पना देणे आवश्यक असते.
Illusions – नेहमीच्या गोष्टी वेगळ्या तर्हेने दिसणे. उदा. दरवाज्याला लावलेला कोट माणसाप्रमाणे दिसणे.
Delusions – Delusions म्हणजे वास्तवावर आधारित नसलेले विचार. असे विचार जरी अवास्तव असले, तरी या रुग्णांना ते अगदी खरे वाटतात. हे लक्षण स्वीकारणे रुग्णाला सर्वात जड जाते आणि हे अवास्तव विचार आपल्या career बद्दल किंवा जवळच्या माणसाबद्दल असले, ते स्वीकारणे, तर फारच अवघड जाते.
Delusions खालील प्रकार असू शकतात.
Paranoia – आपल्याविरूद्ध काही कट केला जातो आहे किंवा आपल्याला कोणी इजा करणार आहे, असे रूग्णाला वाटते.
Jealousy – मत्सराची भावना वाटणे. आपल्या जवळची व्यक्ती आपला विश्वासघात करणार आहे असे वाटते.
Extravagance – आपल्याजवळ काही विशेष शक्ती आहे असे वाटणे. परिणामी कधीकधी रुग्णाचे वागणे धोकादायक ठरू शकते.
Delusions चा रुग्णावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो?
जेव्हा delusions ची तीव्रता वाढते, तेव्हा वास्तव व अवास्तव वीचारामधील फरक रुग्णाला समजू शकत नाही. अशावेळी रुग्ण अतिशय चिंताग्रस्त व चिडखोर होऊ शकतो. काही वेळा रुग्णाला hallucinations, illusions व delusions या सर्वच गोष्टी होतात. त्यामुळे रुग्णाची मन:स्थिती गोधळलेली रहाते व त्यांचा देनंदिन जीवनावर परिणाम होतो. कधी रुग्णाला असेही वाटते, की औषध देणारी व्यक्ती विनाकारण खूप जास्त औषधे देते आहे. त्यामुळे रुग्ण औषध व्यवस्थित घेत नाही. यासाठी काय करता येईल?
१) डॉक्टरांचा सल्ला घेणे.
Hallucination / Delusions चा अनुभव आल्यास किंवा त्याची तीव्रता वाढल्यास तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
२) इतर कारणामुळे लक्षणे नाहीत ना हे पाहणे.
Hallucination / Delusions ची Parkinson’s सोडून इतरही कारणे असू शकतात. उदा. अधू दृष्टी, अपुरा प्रकाश.
तज्ज्ञ डॉक्टराबरोबर या लक्षणाविषयी चर्चा कारणे आवश्यक आहे. रक्त/लघवीच्या तपासण्या करून infection मुळे ही लक्षणे नाहीत ना ते ठरवता येते.
Parkinson’s च्या रुग्णात Parkinson’s बरोबर स्मरणशक्तीचे विकार, झोपेचे विकार depression व स्मृतीभ्रश हे विकारही असले, तर hallucination / delusions ची तीव्रता वाढते.
३) कुटुंबातील व्यक्तीशी चर्चा करणे
यामुळे रुग्णाच्या आजाराच्या स्वरुपाबद्दल कुटंबातील इतराना कल्पना येते व रुग्णाला त्रास होत असताना त्यांची मदत होऊ शकते. यामुळे रुग्णालाही थोडी मानसिक स्वस्थता लाभू शकते.
४) औषधोपचारातील बद्दल
औषधाच्या dose मधील बदलामुळे किंवा औषधातील बदलामुळे hallucination / delusions चे प्रमाण कमी होऊ शकते. तरीही उपयोग न झाल्यास मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने काही औषधे देऊन ही लक्षणे आटोक्यात राहू शकतात.
५) पार्किन्सन्सच्या आजारात भास होणे हे जरी काळजीचे कारण असले, तरी बर्याच वेळा त्यावर उपाय होऊ शकतात. त्यामुळे या लक्षणाची सुरुवात होतात डॉक्टरांना कल्पना देऊन उपाय करणे आवश्यक आहे.
डॉक्टर हेमंत संत यांचा परिचय
डॉक्टर हेमंत संत DM न्युरॉलॉजी आहेत.
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये
न्युरॉलॉजी कन्सल्टंट म्हणून काम करतात.
न्युरॉलॉजीकल सोसायटी ऑफ पुणेचे ते अध्यक्ष आहेत.
Delusion आणि hallucination या मधील फरक सांगा सर
डॉक्टर संत येथे उत्तर देण्यासाठी उपलब्ध नाहीत.त्यांच्या लेखात हा पारक दिसतो.मला जे समजले त्यानुसार थोडे अधिक स्पष्ट करते.Hallucination म्हणजे पन्चेन्द्रिअयन कान,नाक,स्पर्श इ. पातळीवर वास्तव नसलेल्या गोष्टी आहेत असे वाटणे.Delusion म्हणजे विचाराच्या पातळीवर वास्तव नसलेल्या गोष्टी वाटणे.बाकी लेखात सविस्तर आहेच.
यावर उपाय काय आहे
माझ्या वडिलांना भास होत आहेत
सतत भीती दायक भास त्यांना होतात
गोळ्याचे डोसे वाढवले तर त्रास होत आहे
याची त्रीवता कशी कमी करता येईल
कृपया मार्गद्शन करावे
आपल्या न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा ते गोळ्या बदलून देतील किंवा कमी करतील.गोळ्या adjust होईपर्यंत थोडा धीर धरावा लागेल.घाबरून जाऊ नका.अनेक शुभार्थी यातून बाहेर आले आहेत.येथेच अनेकांचे भासावरील अनुभव सांगणारा एक लेख आहे.तुमचा whats app नंबर दिलात तर तेथे मी तो पाठवू शकेन.