Saturday, December 21, 2024
Homeक्षण भारावलेलेक्षण भारावलेले - ६ - डॉ. शोभना तीर्थळी

क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी

शुभार्थी उमेश सलगर दोन तीन सभांना आले नाहीत म्हणून मी फोने केला तर ते म्हणाले,’ ती तुमचीच आठवण काढत होतो.सकाळीच गडहिंग्लजहून आलो.’ खर तर प्रवासातून आल्यावर माणूस दमलेला असतो. पण सलगर मात्र अधिक उत्साही असतात.तिथले खाणे,हिरण्यकेशी नदी,निसर्ग, जवळच असलेल्या आजऱ्याचा दौरा इत्यादीबद्दल ते भरभरून सांगत होते.त्यांचा प्रत्येक फोन माझ्यासाठी भारावलेला क्षण असतो.त्यांनी तिथून करवंदे,अननस,हळदीची पाने आणली होती.करवंदाचा मधु,अननसपाक आणि हळदीच्या पानातील पातोळ्या केल्या होत्या.या सर्व रेसिपीचे रसभरीत वर्णनही केले.हे सर्व त्यांना मला खायला घालायचे होते.तुम्ही शेजारी असता तर किती बर झाल असत.अस ते नेहमी म्हणत असतात.दुसरे दिवशी ते नाशिकला आठ दिवसासाठी जाणार होते.मुलासाठी चिवडाही करून ठेवला होता.या महिन्याची सभाही बुडणार याचे त्यांना वाईट वाटत होते.सलगर यांचे कामासाठीचे दौरे हे त्यांच्यासाठी एखाद्या सहलीसारखेच आनंददायी असतात.त्यांच्या अशा सहली आणि रेसिपी यावर त्यांनी खरे तर पुस्तकच लिहायला हवे.

उमेश सलगर यांचा उत्साह आणि दिनचर्या पाहता त्यांना पार्किन्सन्स होऊन सात वर्षे झाली आहेत का? मुळात त्यांना पार्किन्सन्स आहे का याबाबत मला बऱ्याचवेळा शंका येते. पत्नीच्या आकस्मित निधनानंतर ते मुलाची आईही बनले ९.३० ला ऑफिसला जाण्यापूर्वी गृहिणीच्या तत्परतेने घरातील पूजा,नाश्ता,मुलाचा, स्वत:च डबा भरणे अशी विविध कामे करतात.स्कूटरवर ऑफिसला जातात. १० ते ६ ऑफिस,पुन्हा १५ किलोमिटर गाडी चालवून कामे करत घरी.आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक तोही साग्रसंगीत करतात.यात स्वत:साठी योगसाधना,वाचन संगीत असतेच.अगदी परगावी गेले तरी त्यांच्या योग,व्यायाम यात खंड नसतो.

सलगर इन्शुरन्सकंपनीत administrative ऑफिसर म्हणून नोकरी करतात.त्यांनिमित्ताने इंटरनल ऑडिटसाठी त्यांना गावोगावी जावे लागते. बहुतांश पार्किन्सन्स शुभार्थी पीडी झाल्यावर नैराश्याने ग्रासतात. व्हीआरएस घेणे पसंत करतात किंवा आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कशीबशी नोकरी करतात.पण सलगर हे मात्र इमाने इतबारे नोकरी करतात.आजाराचे निमित्त सांगून कोणतीही सवलत घेत नाहीत.मध्यंतरी जमशेटपुरला जावे लागणार होते.इतर कर्मचाऱ्यांनी जाण्यास नकार दिला पण सलगर मात्र यशस्वीरीत्या काम करून आले.ऑफिसच्या निबंधस्पर्धेसारख्या इतर गोष्टीतही ते सह्भाग घेतात.बक्षिसे मिळवतात.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उपक्रमातही ते तेवढ्याच उत्साहानी सहभागी होतात.

जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन असते.एकदा त्यांनी भरल्या मिरच्या ठेवल्या होत्या.वक्ते राजस देशपांडे यांच्यासाठी खास वेगळे पाकीट आणले होते.यावर्षी खारी चंपाकळी ठेवली होती.सकाळच्या पत्रकारानाही आपल्या वृत्तात त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवले नाही.त्यादिवशी प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतही त्यांचा सहभाग होता’.मनाचा विमा ‘ शरीराच्या विम्याइतकाच कसा महत्वाचा आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे त्यांनी आपल्या लेखात सांगितले होते.त्यांचे आयुष्य पाहता त्यांनी नक्कीच स्वत: मनाचा भक्कम विमा उतरवला आहे

अभिरुची फॉर्महाऊसला सहल गेली होती तर त्यांनी सर्वांसाठी रव्याचे लाडू करून आणले होते.विविधगुण दर्शनात आईची महती सांगणारी कविता आणि त्यावरील भाष्य यांनी सर्वांनाच खिळवून ठेवले.तेही भावनावश झाले.त्यादिवशी पहिल्यांदाच थरथरणाऱ्या हातानी त्यांच्या पार्किन्सन्सचे दर्शन दिले.तिथल्या बागेत नीरफणसाचे झाड होते. अनेकांना ते नवीन होते.सलगरनी त्याचे काय पदार्थ करता येतात ते सांगितले.ते विकतही घेतले. बस मध्ये बसता बसता मला एक नीरफणस आणून दिला.सर्वांनाच दिवसभराच्या सहलीची दमणूक होती.सलगरना मात्र नसावी.कारण रात्री त्यांचे whatsapp वर फोटो आले त्यांनी जावून तुळशीचे लग्न यथासांग केले होते.निरफणसाची कापे मुलाला करून घातली. त्या सर्वाचे फोटो त्यानी टाकले होते.मला त्यांनी दिलेल्या फणसाची कापे करण्यास तीन चार दिवस गेले.

२८ मेच्या आय.पी.एच.कार्यक्रमाच्यावेळी तर त्यांनी कमालाच केली.औंधहून ते.स्कूटरवर आले होते.आय.पी.एच. ऑफिस कर्वेनगरला आहे.आल्या आल्या त्यांनी माझ्याकडे पिशवी सुपूर्त केली गेल्या गेल्या फ्रीजमध्ये ठेवण्याची सूचना केली.माझा वाढदिवस लक्षात ठेवून खास पारंपारिक पदार्थ पिकलेल्या आंब्याचे सासम,हळीवाचे लाडू आणि ताज्या कैर्यांचे लोणचे त्यांनी आणले होते.हळीवाचे लाडू मित्राची मुलगी बाळंतीण आहे तिच्यासाठी केले होते म्हणाले.घरी पोचल्या पोचल्या सासम आवडले का? व्यवस्थित गेल का? सांडले नाही ना?उन्हाळ्याचे दिवस खराब तर झाले नाही ना? असे विचारणारा त्यांचा फोन आला.आईच्या मायेने दिलेल्या त्यांच्या भेटीने माझा वाढदिवस अविस्मरणीय झाला होता.

टीप – यापूर्वी वेळोवेळी त्यानी केलेल्या पदार्थांचे फोटो मी टाकले होते.त्यातील त्यांची दिवाळीच्या फराळाची लिंक सोबत देत आहे.

https://parkinson-diary.blogspot.com/20…/…/blog-post_28.html

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा

    अभिनंदन,खूप छान आक्षरक्षा मन भरून आले,स्लगरसाहेब यांचा कृत्यव्य व डॉक्टर तुम्ही लिहलेले याला शतदा सलाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क