(आनंदवन सहलीत तेथील मुलाना शिकवताना अंजली महाजन)
ऐका आज कहाणी,डोळ्यात येईल पाणी
स्वानुभव कथन करती केशवांजली काव्यरूपांनी
अनेक आजारांची नावे ऐकली होती लहानपणी
पण पार्किन्सन्स महाभयंकर वाटला नव्हता त्याक्षणी
नानाविध व्याधी होतात पीडीच्या जीवनी
जबर शत्रूलाही न होवो हा भयाण आजार
आजाराच्या लक्षणात विविधता फार
सुरुवातीला फक्त हलू लागली ह्यांच्या पायाची करंगळी
कळत नकळत सार्या शरीराला व्याधी ही जडली.
मेंदू हा शरीराचा कुशल नियंत्रक राजा
त्यानेच शरीरात उछ्याद माजविला
काय करावे कोठे जावे,काहीच कळेना
डोक्यातील विचाराचे चक्रच थांबेना
कुणी म्हणे मजसी हा अर्धांग वायूचा झटका
तर कुणी म्हणे हळूच नव्हे हा लकवा
शरीराचे नियंत्रण यांच्या बिघडले
डोळे माझे खाडकन उघडले
मन माझे मला पुनःपुन्हा सांगू लागले
विज्ञान युगात टेस्ट ट्यूब बेबी सारखे शोध लागले
मग एवढ्याशा आजाराला मी एवढी का घाबरले?
सुचविले आम्हाला एकाने डॉक्टर प्रदीप दिवटे
त्वरित आम्ही गाठले त्यांचे दवाखानारूपी घरटे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व तपासण्या झाल्या.
पार्किन्सन्स आता आमुचा पक्का मित्र झाला.
पती पत्नी और वो त्रिकोण पूर्ण केला.
आजाराची माहिती घेत चालली पाठोपाठ वर्ष
त्यांची काळजी घेण्यातच मनापासुनी हर्ष
कालांतराने मिळाला आम्हाला पार्किन्सन्स आधारगट
तेंव्हापासून मनाला झाला हर्ष उत्कट
समदु:खितांच्या काही वेगळ्याच गप्पागोष्टी
प्रेरणेचा नवा सूर्य उगवतो नक्कीच त्यादिवशी.
सौ अंजली महाजन या मुख्याध्यापिका म्हणून नोकरी करत होत्या.१९ वर्षांच्या मुलीच निधन आणि पतीला लहान वयात झालेला पीडी हे दु:ख पचवून परिस्थितीला धीराने सामोर्या गेल्या.दुसरी मुलगी सासरी गेली.मुख्याध्यापिका म्हणून असलेल्या जबाबदार्या, घरात शंभर वर्षाच्या सासूबाई.शुभार्थी पती हे सर्व सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती.त्यामुळे स्वेछ्यानिवृत्ती घेतली.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारिणीत असलेल्या अंजली महाजन मित्रमंडळाच्या कामात हिरीरीने भाग घेतात.
( सदर कविता ११ एप्रिल २०१० च्या स्मरणिकेत छापून आली होती.)
Very inspiring. Anjali Tai hats off to you and your family.