माझे अर्धांग आरती हिला २००६ साली पार्किन्सन असल्याचे कळलं. सुरवातीला औषधासोबत व्यायाम करणेही सुरू केले ज्याला प्रथम नाराजीने पण त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवल्याने आनंदाने तिने नियमित सुरू ठेवले. त्यामुळे औषधांचा डोसही कमी झाला. मी स्वतः माझ्यासाठी आजवर डॉक्टरांची पायरी चढलो नाही.
शुभंकर म्हणून आरतीला योग्य औषधबाह्य उपचार स्वीकारण्यास पटवून देण्यात मी यशस्वी झालो आहे. यात मुख्यतः तिच्या मनाविरुद्ध ना जाता तिचे मनपरिवर्तन करण्यावर जास्त भर दिला. सोबतच समुपदेशाने तिला नेहमीच माझा आधार असल्याची दृढ जाणीवही देत राहिलो.
तिच्या या सर्व मनपरिवर्तनास तिच्या भक्कम मानसिक तयारीचाच सिंहाचा वाटा आहे, फक्त अभिमुखता-परिश्रम (result oriented efforts) माझे आहेत.
सध्या तिला बाह्यातकारी पाहणाऱ्यास पार्किन्सन असल्याची शंकाही येत नाही हे केवळ तिचे यश आहे.
खरे तर आरती सर्व कलागुणी आहे आणि मी “इतर कोणी करत असतील तर मला का येणार नाही” या अतूट आत्मविश्वासाने अनेक कला आत्मसात करू शकलो.
– रमेश तिळवे
(पहिल्या दोन कलाकृती या शुभार्थी आरती तिळवे यांच्या आहेत तर इतर कलाकृती शुभंकर रमेश तिळवे यांच्या आहेत.)
प्रयत्न करीता वाळूचे…….हे सिद्धीस नेण्याचे कसब वाखाणण्याजोगे ठरेल…माणसांमध्ये परिपक्वताचा अभाव नसेल तर वज्रासारखे कठीण असे कण वितळू शकतात व सोम्य अशा जमीनरूपी गुलबाच्या पायघड्यावरून चालून तरूनही जाता येतं ह्याचा सदृश्य ऊदाहरण इतरांना दाघविण्याचं समयोचित पायंडा तूम्ही दोघानंही, मूला-बाळांच्या योग्य साथीनी, घालून दिल्याच्या श्रेयाचे तूम्ही स्वयंघोषीत मानकरी ठरला आहेत…..देवाचे आशिर्वाद असतातच, पण त्याच्या मागे *कर्माची* म्हणजे अंतिरीक प्रयत्नांची जोड लागतेच. सर्वांच्या कौतूकाला पात्र ठरला आहात….मूख्य म्हणजे, स्वकष्टाने केलेल्याचं, समर्पीत रूपात, आरोग्यात समतोल सुधारणा सर्वांना दिसू लागली.
पूढील सूखदायक संसारीक आयूष्ष्यसाठी व अनुकूल आरोग्यासाठी आमच्याकडून भरतांना शूभेच्छा. देव बरे करू!
ऊभयताना असं वाटावं….
वाचावं