दुसरा टप्पा ११.१५ ला सुरु व्हायचा होता. निसर्ग दर्शनात रमलेल्यांचा ११.३० पर्यंत पत्ताच नव्हता.हळूहळू सर्व येऊ लागले.गोलाकारात सर्व स्थानापन्न झाले.शोभना तीर्थळी यांनी इडली डोसा खेळ घेतला आणि श्रीपाद कुलकर्णी प्रथम,रेखा आचार्य दुसऱ्या आल्या.लगेच श्यामाताईनी त्यांना बक्षिसे दिली आणि परस्पर परिचयाचा कार्यक्रम सुरु झाला.९५ वर्षाचे कलबाग आणि ८६ वर्षाच्या सुमन जोग यांच्या परिचयाने सर्व भारावून गेले.त्यांचे सहलीत असणेच प्रेरणादायी होते.इतरांनी अगदी थोडक्यात ओळख करून दिली. प्रत्येकाची पूर्वपीठीका वेगळी असली तरी सर्वांचाच पीडीसह आनंदी राहण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता.आणि स्वतंत्र लेखाचा विषयही आहे.
यानंतर नोव्हेंबर महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस हास्याचा केक कापून आणि हास्याचाच फुगा फोडून साजरे करण्यात आले.अमेरिकेत राहणारी सून पीएचडी झाल्याबद्दल श्यामलाताईंनी सर्वाना खरे पेढे वाटले.
आता चुलीवरचा गरमागरम स्वयंपाक तयार झाला होता.गरम गरम भाकरी,चपाती,भरले वांगे,मुगाची उसळ,बटाटा भाजी,भजी, पापड,लोणचे,चटणी,वरण भात आणि शिरा असा मेनू होता.वाढण्याची जबाबदारी काही शुभंकर शुभार्थीनी उचलली.जेवताना जवळ बसलेल्यांची गप्पातून अनुभवाची देवाण घेवाण चाललीच होती.
ओळख
चुलीवरचा स्वयंपाक,जेवणाचाआस्वाद
श्यामलाताई सुनेच्या पीएचडीचे पेढे वाटताना
वाढदिवस साजरा करताना
सुभेदार वाढदिवस
बागल वाढदिवस
तीर्थळी वाढदिवस
९५ वर्षाचे कलबाग
रेखा आचार्य बक्षिस स्वीकारताना
इडली डोसा खेळाचे पारितोषिक स्वीकारताना श्रीपाद कुलकर्णी.
Cheerful minds have forgotten their problems and are enjoying
Best moments of the day
Thanks