Tuesday, October 1, 2024
Homeसहलसहल - २० डिसेंबर २०२३

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   ‘झपूर्झा ‘ हे ठिकाण सहलीसाठी निश्चित केले. तारीख ठरली २० डिसेंबर २०२३. सहलीचे ठिकाण आणि तारीख व्हाॅट्सॲप गृपवर सर्वांना कळविण्यात आली.

यावर्षी सहलीसाठी शुभार्थींकडून कोणतीही वर्गणी न घेण्याचे ठरले. इतरांकडून रु. ७००/- घेण्याचे ठरले. सर्व सदस्यांचा उदंड प्रतिसाद पाहता एक मोठी बस, एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक कार घेऊन जायचे ठरले.  

अखेर सहलीचा दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवारा येथे सगळे जमायला सुरुवात झाली. तिन्ही वाहनांमध्ये सर्व स्थानापन्न झाल्यावर ” गणपती बाप्पा मोरया ” म्हणत, एका वाहनापुढे नारळ वाढवून, सगळे झपूर्झाच्या दिशेने निघाले.  मग काय  उत्साहात  सगळे गाणी म्हणायला लागले. त्याचबरोबर खाऊवाटपही सुरू झाले. बघता बघता झपूर्झा कधी आले ते कळलेच नाही.

झपूर्झा हे कला आणि संस्कृती संग्रहालय खडकवासल्याच्या जवळ आहे. पु.ना. गाडगीळ आणि सन्स यांचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम.  आपल्या संस्कृतीची आणि पारंपारिक कलांची ओळख व्हावी, त्यांची आवड निर्माण व्हावी, विशेषतः आताच्या नवीन पिढीला, हा त्यामागचा उद्देश. सात एकर जागेवर वसलेल्या या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात एकूण दहा कलादालने आहेत, ज्यातील कलाकृती नेहमी बदलत असतात. भारतातील राजा रविवर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची चित्रे, काही शिल्पकृती, परंपरागत पैठण्या यांसारखी वस्त्रे, सोन्या-चांदीचे असंख्य दागिने, जुन्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, अशा कितीतरी गोष्टी इथे आहेत. झपूर्झाच्या व्यवस्थापनाने सुरुवातीला थोडी माहिती सांगितली. त्यानंतर चहा- बिस्किटे यांची व्यवस्था केली होती. तसेच तिथे पाच-सहा व्हील चेअर्सचीपण सोय केलेली होती. सगळीकडे फिरायला रॅम्प्स, लिफ्ट, प्रशस्त दालने, त्यामुळे शुभार्थींना तिथे फिरणे आणि कलाकृती बघणे खूपच सोयीस्कर झाले.  प्रत्येक दालनामध्ये तिथली माहिती द्यायला स्वयंसेवक होते. ठिकठिकाणी कलाकृतींबद्दलची माहिती लिहिलेली होती. सगळेजण गृप्स करून दालने पाहत असल्यामुळे कुठेही गर्दी झाली नाही. अगदी निवांतपणे सगळी दालने आणि त्यातील कलाकृती बघता आल्या. भरपूर फोटोही काढता आले. 

विशेष म्हणजे ज्यांनी या कलासंग्रहालयाची निर्मिती केली ते श्री. अजित गाडगीळ मुद्दाम वेळ काढून सर्वांना भेटायला आले होते. 

साधारण एक – दीडच्या सुमारास सगळेजण भोजनालयाकडे वळले. साध्या घरगुती बेताबरोबर उकडीचे मोदक हा एक सरप्राईज आयटम होता जेवणामध्ये. जेवल्यानंतर काहीजण आरामात गप्पा मारत बसले, काहीजण खडकवासला बॅकवॉटरच्या बॅकग्राऊंडवर फोटो काढण्यात रमले. काहींनी अजून थोडा फेरफटका मारला जवळपास. तिथे जवळच एक शंकराचे छोटेसे देऊळ आहे. देवळाबाहेरील दीपमाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. आत गाभाऱ्यात खूप शांत वाटत होते.

थोड्या विश्रांतीनंतर चहापान झाले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. 

ही सहल इतर सहलींपेक्षा थोडी वेगळी होती. नेहमीप्रमाणे मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा विविध छोट्या स्पर्धा, खेळ यांचा समावेश जरी यामध्ये नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘ खूप काही छान बघायला मिळाले आज ‘ असाच भाव होता. सहलीनंतरचे काही दिवस तिथले फोटो, अरुण सुर्वेंनी तयार केलेले व्हिडिओज व्हाॅट्सॲप गृपवर सतत येत राहिले आणि प्रत्येकाला पुनःप्रत्ययाचा आनंद देत राहिले, हे मात्र खरे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क