मी सौ अंजली महाजन व माझे मिस्टर केशव महाजन पाकिॅन्सन्स सपोटॅ ग्रुप मध्ये गेले 7/8 वर्षे नियमित हजेरी लावतो त्यामुळे झालेले फायदे
1) पाकिॅन्सन्स आजार संबंधी आणि उपचार संबंधी योग्य माहिती अनेक डॉक्टरांनी दिलेल्या व्याख्यानांद्वारे मिळाली
2)आमचे आजार बाबत असणारे गैरसमज दूर झाले
3)सकारात्मक दृष्टिकोन बालगण्यासाठी विचारांना योग्य दिशा मिळाली
4) इतरांचे दुःख समजले आमच्या दुःखाची तीव्रता कमी झाली
5)एकटेपणाची भावना कमी होऊन जगण्यातला उत्साह वाढला
6)समदुःखी भेटत राहिल्याने आत्मविश्वास वाढला आजाराचे भय कमी झाले
7) मंडळाच्या बैठकीत मोकळे पणाने आपल्या व्यथा समस्या मांडता येऊ लागल्या आपले मन व्यक्त करता येऊ लागले
8) अनेक लोकांशी ओळखी झाल्या
9) सभेच्या वेळी अनुभवांची विचारांची उपचार विषयीच्या माहितीची देवाण घेवाण होऊ लागली
10) भेदरलेल्या मनाची अवस्था कमी होण्यास मदत झाली व पाकिॅन्सन्स सह आनंदी जीवन कसे जगावे याचा मंत्र मिळाला
थोडक्यात भावी जीवन सुकर पणे जगण्यासाठी मंडळाचा भक्कम आधार मिळाला
खूप छान उपक्रम आहे.अंजलीताईंनी त्यांचे अनुभव आणि झालेले फायदे वाचून छान वाटले.पार्किन्सन मित्रला खूप खूप शुभेच्छा!!फार मोठे आणि अवघड काम ही संस्था करते आहे.खूप शुभेच्छा!!
खूपच छान लेख आहेत. प्रांजळ अनुभव कथन आणि देखणे कलादालनात दोन्ही लाजवाब!! कवितेसाठी खास पान असेल हे वाचून आनंद झाला.