८ जून मासिक सभा वृत्त – डॉ.सौ.शोभना तीर्थळी

Date:

Share post:

स्वमदत गटात एकमेकांच्या विचाराची,अनुभवाची देवाण घेवाण अत्यंत गरजेची असते.गुरुवार दिनांक ८ जुन रोजी हाॅटेल अश्विनी येथे आयोजित सभा यासाठीच होती.पार्किन्सन्सला आपण मित्र बनवु शकला आहात का? असल्यास यासाठी काय केले? नसल्यास कोणत्या अडचणी येतात? याबाबतचे आपले विचार, अनुभव सांगायचे होते.सभेस ४० शुभंकर,शुभार्थी उपस्थित होते.

प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

कमिन्स कॉलेजच्या देवयानी कुलकर्णी,मृगाली भट,शर्वरी इनामदार या इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रकल्पाला शुभार्थिनी मदत केली,विश्वास दाखविला यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या आल्या होत्या.जानेवारी १६ च्या सभेत त्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगण्यासाठी आल्या तेंव्हा शुभार्थिंचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असे त्यांना वाटले नव्हते.पण प्रत्येक शुभार्थिंनी मनापासून त्यांना प्रयोगासाठी हवा तेवढा वेळ दिला.पीडी सारख्या आजाराला झेलत आनंदी राहणाऱ्या शुभार्थिंकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली असेही त्यांनी सांगितले.सर्वांच्या विनंतीवरून आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी कंप मोजणारे App तयार केले आहे.त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शुभार्थिंना कोणताही त्रास न होता कंप मोजता येणार असल्याचे लक्षात आले.त्यांनी सर्व शुभार्थिंसाठी स्वत: तयार केलेली भेटकार्डे आणली होती.

या तिघींनी त्यांना भेटलेल्या शुभार्थिनी पीडीला मित्र बनविल्याचा अनुभव सांगितला आणि विषयाला आपसूकच सुंदर सुरुवात झाली.शोभना तीर्थळी यांनी विषय प्रास्ताविक केले. शरच्चंद्र पटवर्धन हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येवू शकणार नव्हते. त्यांनी Voice मेसेजद्वारे आपले विचार पाठवले होते.त्याची, माहिती सांगितली मधमाशीचा डंख विशिष्ट भागावर चार सेशनमध्ये करून पीडी बरा करता येतो असा दावा पुण्यातील एक व्यक्ती करते. त्याचा अनुभव कोणी घेतला आहे का? असा प्रश्नही पटवर्धन यांनी विचारला होता.

श्रद्धा भावे यांनी विविध व्याख्यानातून मी आपल्याला योग्य ते घेत जाते.सातत्याने व्यायाम करते असे सांगितले.त्या डॉक्टर अरुण दातार यांनी सांगितलेले व्यायाम उठताना गादीवर बसूनच करतात.एक सूर्य नमस्कार घालतात. त्यांमुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात.दिवसभरात सांधे आखडले तर पुन्हा त्या हे व्यायाम करतात.

आर्मी ऑफिसरच्या पत्नी असलेल्या अंजली देवधर यांनी आपल्याला पार्किन्सन्स झाला हे स्वीकारणे महत्वाचे मानले.यासाठी न लपवता सर्वांना सांगते असे सांगितले. त्या घरातली सर्व कामे स्वत: करतात.सही तशीच राहावी म्हणून पानभर सही करतात.अक्षराचा सराव राहण्यासाठी नियमित शुद्धलेखन लिहितात.

Lab टेक्निशियन असलेल्या अरुण सुर्वेना पार्किन्सन्सचे निदान होण्यासच दोन अडीच वर्षे गेली.ते सातत्याने व्यायाम करतात.त्यांच्या जवळ राहणाऱ्या शुभार्थी सौ.देवी यांना त्यांनी गुरु केले आहे. देवी यांनी अंधश्रद्धा वाटणारे अनेक पर्यायी उपचार केले.उपयोग झाला नाही. त्यात मधमाशांचा डंख हा प्रकारही होता.अशा उपचारांच्या वाटेला जायचे नाही हे सुर्वेनी ठरवले.पीडीला मित्र बनवणे,आनंदात राहणे त्यांना महत्वाचे वाटते.

वसुधा बर्वे यांना .पीडी होऊन १० वर्षे झाली.त्या नियमित व्यायाम करत होत्या,इतरांचे व्यायाम घेत होत्या.तरीही आपल्याला पीडी झाला म्हणून निराश झाल्या होत्या पण डॉक्टरानी समजावून सांगितले.पीडीला स्वीकारता आले.त्यांनी संगीत क्लास सुरु केला. गाण्याच्या दोन परीक्षाही दिल्या.प्रथम श्रेणी मिळवली.

लतिका अवचट एकट्या सभेला येतात.नियमित व्यायाम करत असल्याचे आणि रोज लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.

मोरेश्वर काशीकर हे सभेपूर्वी स्वत: प्रार्थना घेतात.स्मरणिकेतून त्यांनी वेळोवेळी आपण पार्किन्सन्सला हाताळण्यासाठी काय करतो हे सांगितले आहे.त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, त्याला शत्रू म्हणा किंवा मित्र म्हणा त्रास हा सोसावाच लागतो मग मित्र का म्हणायचे नाही? डॉक्टरांना वेळोवेळी भेटणे,नियमित औषधे घेणे,आहार,विहार,व्यायाम,पूरक उपचार या सर्वांच्या आधारे पीडीला हाताळत असल्याचे सांगितले.

रेखा आचार्य एकट्या राहतात.शिक्षिकेची नोकरी करत असतानाच पीडी झाला. पण कार्यकाल पूर्ण केला.घरातील सर्व कामे करतात.मित्रमंडळाचा आधार वाटतो.नियमित व्यायाम करतात.बऱ्याच वेळा रात्री झोप येत नाही.पण काही तरी हालचाली करत राहतात. झोपेची गोळी अजिबात घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले आहे.होमिओपथिच्या औषधांचा त्यांना चांगला उपयोग होतो.

रमेश घुमटकर पाषाणहून सभेला स्कूटरने येतात.नियमित व्यायाम,चालणे करतात.सतत हालचाल करणे त्यांना महत्वाचे वाटते.मोबाईलवर बोलत असतानाही ते एका जागी बसून न बोलता फिरत फिरत बोलतात.

उत्साही शुभार्थी पद्मजा ताम्हणकर यांना वटपोर्णिमा असल्याने वटसावित्री व्रताबद्दल माहिती सांगायची होती. अतिशय सुंदर अक्षरात त्यांनी ती लिहून आणली होती.पण वेळे अभावी सांगता आली नाही.प्रत्येक वेळच्या स्मरणिकेत त्यांनी आपले अनुभव दिलेले आहेत.ते वाचावे असे त्यांनी सांगितले.

राजीव कऱ्हाळे यांच्या आईवडिलांना पीडी होता.पीडीबद्दल माहिती होती.संगीताचा आपल्याला चांगला उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवयानी, मृगाली आणि शर्वरी याना अंजली महाजन यांनी तत्काळ भेटकार्डे तयार करून दिली आणि त्यांचे आभार मानले. या तिघींनी सर्वांसाठी वेफर्स,बर्फी आणली होती, चहाही दिला. अंजलीने वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिली.

शरच्चंद्र पटवर्धन, दीपा,अजित कट्टी,आशा रेवणकर,श्यामाताई,व्ही.बी.जोशी, प्रज्ञा जोशी अशी खंदी कार्यकर्ती मंडळी अपरिहार्य कारणाने अनुपस्थित होती.परंतु फोटोची धुरा अरुंधतीने सांभाळली.इतर कामात वसू,श्रद्धा,अंजली यांना देवयानी मृगाली,शर्वरी यांनी मदत केली आणि कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which...

पार्किन्सन्स मित्रमंडळ स्मरणिका २०२४

येथून डाऊनलोड करता येईल स्मरणिका २०२४Download

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   'झपूर्झा '...

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा...