१३ ऑगस्ट १५ च्या सभेचा वृत्तांत – डॉ.शोभना तीर्थळी

Date:

Share post:

गुरुवार १३ ऑगस्ट रोजी आश्विनी हॉटेल येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.

डॉक्टर नेहा पेलपकर यापार्किन्सन्स आणि फिजिओथेरपीया विषयावर  प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार होत्या. पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचे व्याख्यान होऊ शकले नाही.ते पुन्हा आयोजित केले जाणार आहे.
सभेसाठी चिंचवड,औंध,पाषाण,येरवडा,कोथरूड,हडपसर अशा शहराच्या विविध भागातुन शुभंकर शुभार्थी आले होते.जळगावहून कुलकर्णी पती पत्नी आले होते.ठरलेले व्याख्यान होणार नसल्याने या सर्वांनी निराश होणे साहजिक होते.पण सर्वानीच संयोजकांची अडचण समजून घेऊन.दीड तास आनंदात घालवले.
प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली सुरुवातीला .शोभना तीर्थळी यांनी श्रोत्यांच्या अपेक्षाभंगाबाबत,गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.आणि सहकार्याबद्दल आभार मानले.पुढील सर्व कार्यक्रम अनौपचारिक गप्पा स्वरूपाचा झाला.
रामचंद्र करमरकर यांच्या  निवेदनाने या गप्पांना सुरुवात झाली.शुभार्थी विजय ममदापुरकर याना त्यांच्या क्रीडाविषयक कार्याबद्दल ‘क्रीडा महर्षी बा.प्रे.झंवरसर स्मृती क्रीडा महारथी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.३० ओगस्ट रोजी एस.एम.जोशी फौंडेशन येथे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.याला हजर राहण्याविषयी त्यांनी आवाहन केले.
यानंतर  वाढदिवस साजरे करण्यात आले.विलास जोशी,सुधाकर अनवलीकर,प्रभाकर लोहार,दिलीप कुलकर्णी हे शुभार्थी आणि शकुंतला झेंडे या शुभंकर या उपस्थितांचे हास्याचे फुगे  फोडून आणि हास्याचाच केक कापून वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी या सर्वांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.अनवलिकर हे सद्या डायलेसिसवर आहेत.ते त्यांच्या कार्यकाळात झुंझार पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते.आजाराशीही ते अशीच हसतमुखाने झुंज देत आहेत.पीडी झाल्यावर त्यांचे  ‘सहजी संवादिजे’ हे पुस्तक प्रकाशित झाले.त्यांच्याकडे नुसते पाहूनच इतर शुभार्थीना उर्जा मिळाली असेल.विलास जोशी हे अबोल पण हातात घेतलेले कार्य नेटाने करणारे व्यक्तिमत्व.नृत्योपाचाराच्या प्रयोगात सुरुवातीपासून आजतागायत सहभागी असलेले ते एकमेव आहेत.सहकारनगरमधून बालेवाडीला राहायला गेले तरी .बसनी ते नृत्य वर्ग, मंडळाच्या सभा,कार्यकारिणी सभा याना हजर असतात.या सर्वत्र ते एकटे येतात हे विशेष.दिलीप कुलकर्णी हेही मित्रमंडळात सहभागी झाल्यापासून नृत्यवर्गास जातात. नियमितपणे सभाना हजर राहतात.
प्रभाकर लोहार यांची डीबीएस शस्त्रक्रिया झाली.काही समस्या निर्माण झाल्याने त्याना तीनदा शस्त्रक्रियेला सामोरी जाव लागल.पण कुरकुर न करता  ते आनंदाने जीवन जगतात.सभेलाही ते एकटेच आले होते.
शकुंतला झेंडे यांची शुभंकर म्हणून श्री झेंडेना उत्तम साथ असते.सभा सहली यात त्या उत्साहाने सहभागी होतात. एरवी वाढदिवस असणार्यांची माहिती सांगता येत नाही.पण यावेळी दुसरा कार्यक्रम नसल्याने सांगता आली.
श्री शरच्चंद्र पटवर्धन यांनी यानंतर पार्किन्सन्सग्रस्तानी करावयाच्या व्यायामासंबंधी टीप दिल्या. यानंतर श्रीपाद कुलकर्णी, अंजली महाजन आणि  मोरेश्वर  मोडक यानी काही विनोदी किस्से आणि माहिती सांगितली.
या पूर्वीच्या सभाना व्हीलचेअरवर आलेले अनिल कुलकर्णी यावेळी काठीही न घेता चालत आले होते.सभेला आल्यावर सर्व एकत्र भेटतील म्हणून आपण आलो असल्याच त्यांनी सांगितलं. घरातच पडल्याचे निमित्त होऊन ऑपरेशन,पार्किन्सन्समध्ये झालेली वाढ आणि तब्येतीतले अनेक चढउतार  याना कसे तोंड दिले याबाबतचा अनुभव सांगितला.त्यांचे शाळेपासूनचे २५ मित्र त्यांच्या आजारपणात त्याना मुंबईहून भेटायला आले.हा अनुभव सांगताना त्यांना भरून आले.
रामचंद्र करमरकर यांनी नवीन सभासदाना नृत्यवर्गाविषयी माहिती सांगितली विलास जोशी आणि प्रज्ञा जोशी यांना त्याचे नृत्याविषयी अनुभव सांगावयास सांगितले.
चहापानानंतर  कार्यक्रमाची सांगता झाली.
मोरेश्वर मोडक यांनी बिस्किटे आणली होती.सौ झेंडे यांनी चहाचा खर्च दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which...

पार्किन्सन्स मित्रमंडळ स्मरणिका २०२४

येथून डाऊनलोड करता येईल स्मरणिका २०२४Download

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   'झपूर्झा '...

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा...