Thursday, November 21, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापर्किन्सन्सविषयक गप्पा - ७० - शोभनाताई

पर्किन्सन्सविषयक गप्पा – ७० – शोभनाताई

डॉक्टर पराग ठुसे यांच्या प्राणायाम फालोअप वर्गात त्यांनी नासिबो ( Nocebo ) आणि प्लासिबो ( Placebo ) इफेक्टबद्दल माहिती सांगितली.प्लासिबो हे अनेकवेळा ऐकण्यात आले होते.नासिबो मात्र प्रथमच ऐकत होते.आमच्या शुभंकर शुभार्थीना या संकल्पनांची ओळख करून देणे गरजेचे वाटले.औषधाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांशी या निगडीत आहेत.पार्किन्सन्स शुभार्थीबाबत गोळ्यांची नेमकी निवड हा कळीचा मुद्दा आहे.प्रत्येक शुभार्थीची लक्षणे वेगळी आणि समान लक्षणे असली तरी औषधांचे परिणाम,दुष्परिणाम वेगळे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात शुभार्थीचे निरीक्षण करून शुभंकरानी नोंदी ठेवल्या तर न्यूरॉलॉजिस्टना गोळ्या आणि डोस ठरवणे सोपे जाते.आता येथे नासिबो आणि प्लासिबोचा काय संबंध असे मनात येईल ना? त्यासाठी या संकल्पना आधी समजून घेऊ.

नासिबो इफेक्ट म्हणजे एखाद्या औषधाचे किंवा उपचाराचे दुष्परिणाम पेशंटला या औषधाने मला असे होणार ही तीव्रतेने वाटणारी धारणा, विश्वास असतो आणि त्यामुळे होतात. डॉक्टर ठुसे यांनी यासाठी एखाद्या फुलाची अलर्जी आहे असे वाटणाऱ्याला तेच फुल प्लास्टिकचे समोर आले तरी शिंका येतात.असे उदाहरण दिले होते.मन आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध आहे.अलोपाथीच्या गोळ्यांचे साईडफेक्ट असतात त्या अजिबात घेऊ नयेत असाही अनेकांचा ठाम ग्रह करून दिला गेलेला असतो.अशा चुकीच्या ग्रहांना थारा न देणे हे चांगले..मनोविकार तज्ज्ञ संजय वाटवे यांनी आपल्या व्याख्यानात गोळ्या घेताना त्या आनंदाने घ्या असे सांगितले होते.एक जणांनी मला सांगितले होते.गोळ्या घेण्यापूर्वी ५ मिनिटे ध्यान करा किंवा जप करा. त्यामुळे औषधाचा परिणाम चांगला होतो.येथेही मन शांत होणे.कोणतेही गैर विचार मनात नसताना गोळ्या घेणे हाच विचार असेल.

बरेच जण औषधे दिल्यावर गुगल सर्च करतात प्रत्येक गोळ्यांचे काहीना काही साईड इफेक्ट दिलेले असतात.खरेतर ते काहींनाच होण्याची शक्यता असते पण अशा चिकित्सक मंडळींचा नासिबो इफेक्ट सुरु होण्याची शक्यता राहते.मलाही अशी सवय होती पण आता मी ती बंद केली.पार्किन्सन्सच्या गोळ्यांच्याबाबत एका गोळीचा स्मरण शक्तीवर परिणाम होतो तर एका गोळीने भास होतात असे वाचल्याने माझ्या यजमानांना असे होणार असा मला ताण असायचा ते मात्र कोणताही विचार मनात न ठेवता गोळ्या घेतात. आत्तापर्यंत त्यांना असे कोणते दुष्परिणाम झाले नाहीत.बुद्धी तल्लख आहे. भासही झाले नाहीत.कदाचित माझ्यासारखा सतत विचार केला तर त्याना तसे झाले असते.येथे ज्यांना भास होतात,इतर काही दुष्परिणाम होतात त्यांना नासिबो इफेक्ट असतो असे मला म्हणायचे नाही.औषधांचा अपोआप दुष्परिणामही असू शकतो. पण तो तसा होणार नसल्यास आपल्या विचारामुळे झाला असे होऊ देऊ नये एवढेच सुचवायचे आहे.

करोनाच्या आत्ताच्या परिस्थितीत तर नासिबो इफेक्ट होऊ नये यासाठी सावध राहिले पाहिजे.चुकीची माहिती ,ऐकून अनेक गैर गोष्टी मनात ठाण मांडून बसतात.आणि करोना पेक्षा त्याच घातकी ठरतात.तीर्थळी कोविद झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जातानाही हसत हसत गेले.घरी आल्यावर शरीर थकले होते,पार्किन्सन्स थोडा वाढला होता पण शांत आणि आनंदीच होते, कोणताही आफ्टर इफेक्ट न होता लवकर पूर्वीसारखे झाले.मला मात्र गोळ्या घेतानाच मला हे साईड इफेक्ट होणार असा विचार करताच गोळ्या घेतल्याने गोळ्यांचे दुष्परिणाम हमखास व्हायचे. आता मात्र मीहे आवर्जून टाळते. डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवते जास्त चिकित्सा करत नाही सकारात्मक राहते. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामातून मिळणारी ऊर्जाही असतेच.परिणाम म्हणून कॅन्सरसाठी दिलेल्या रेडीएश्न,किमोचा मला त्रास झाला नाही असा माझा समज आहे.पूर्वीची मी असते तर कदचीत तो झाला असता.

याउलट प्लासिबो मध्ये मानसिक धारणेमुळे, विश्वासामुळे आजाराची लक्षणे कमी झाली असे वाटते.क्लिनिकल रिसर्चमध्ये एखाद्या औषधाची ट्रायल घेताना दोन गट केले जातात एका गटाला खरे औषध दिले जाते दुसऱ्या गटाला तशाच दिसणाऱ्या पण खरे औषध नसणाऱ्या गोळ्या दिल्या जातात.अशा गटासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या इंजेक्शन किंवा इतर काही असेल त्याला प्लासिबो म्हणतात.आणि नंतर जो परींणाम होतो तो प्लासिबो इफेक्ट.आजारासाठी जे औषध द्यायचे ते न देताही आजार बरा झाल्यासारखे वाटते. तेंव्हा तो प्लासिबो इफेक्ट असतो.येथे प्लासिबो कधी श्रद्धेने लावलेला अंगारा असेल, आपल्या अराध्याबाबतच विश्वास असेल किंवा एखादी पर्यायी उपचारपद्धती असेल.

पार्किन्सन्सचे निदान झाले की आम्ही पार्किन्सन्स बरा करतो असे सांगणारे अनेक पुढे येतात आणि पार्किन्सन्स बरा न होणारा आजार आहे असे सांगणाऱ्या डॉक्टरपेक्षा हे लोक जवळचे वाटतात.खूप विश्वासाने गेल्याने काही काळ चांगले वाटते.हा प्लासिबो इफेक्ट असतो.तो तात्परता असतो. काही काळाने गुण येत नाही असे दिसल्याने पैसा,शक्ती,वेळ वाया गेल्याचे लक्षात येते.

नासिबो आणि प्लासिबो हा खूप मोठ्ठा विषय आहे.याच्यावर खूप संशोधन झाले आहे.होत आहे. पण याबाबत मला जास्त खोलात शिरायचे नाही. पार्किन्सन्स बद्दलच्या अज्ञातून चुकीचे निर्णय घेणे टाळले जावे गोळ्या आनंदाने घेऊन त्याचा जास्तीजास्त चांगला परिणाम करून घेणे आणि निदान मानसिकते मुळे होणारे दुष्परिणाम टाळणे.एवढेच शुभंकर,शुभार्थीपर्यंत पोचवायचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क