५ नोव्हेंबर २०२३ – विविध गुणदर्शन यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा होनप,अंजली महाजन यांनी कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी खूप कष्ट घेतले.शुभार्थीनीही भरभरून प्रतिसाद दिला.सविता बोर्डे औरंगाबादहून आणि फडणीस सर तळेगावहुन आले होते.सहभागींची नावे पुढे दिली आहेत.
१. सविता बोर्डे – नृत्य ….शिवपंचाक्षरी
२. सुरेश फडणीस – गाणे ….पुकारता चला हु मै
३. सुनील कर्वे – नकला
४. शुभदा गिजरे – भजन …. पायोजी मैंने
५. उमेश सलगर – कविता
६. अरुण सुर्वे – नृत्य ….फ्युजन
७. जगदीश माहेश्वरी – कविता
८. विजया मोघे – भजन ….राम नाम गा ले
९. मोहन देशमुख – गाणे …. फूलों के रंग से
१०. श्रद्धा भावे – विनोदी उखाणे
११. शैला भागवत आणि शशिकांत भागवत – नृत्य …. मला सांगा
१२. किरण सरदेशपांडे – नाट्यछटा …. ट्रॅफिक पोलीस
१३. प्रणिता नरवाडकर – गाणे …. लग जा गले
१४. रेखा आचार्य – नृत्य ….सूर निरागस हो
१५. सुधाकर माने – नृत्य ….I am a disco dancer
डॉ.अविनाश बिनीवाले आणि अविनाश धर्माधिकारी यांना कार्यक्रम पाहून उत्साह आला आणि स्टेजवर येवून अचानक सादरीकरण केले.शेवटी सैराटमधील गाण्यावर उपस्थितातील जवळजवळ सर्वांनी डान्स केला.हे दृश्य अवर्णनीय होते.’पार्किन्सनसह आनंदाने जगूया’ हे ब्रीद प्रत्यक्षात उतरताना दिसत होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभाराचे काम अंजली महाजननी केले.वसू देसाईनी सूत्र संचालन केले.अंजली महाजननी केशवराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्व सहभागींना भेटवस्तू दिली.गप्पा मारत
अल्पोपहार झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.