१३ ऑगस्ट २०२३ – ‘Lady with the magic hand’ नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ.सुरभी धनावला यांचे निवारा सभागृहात व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेची सुरुवात झाली.डॉ.सुरभी या न्युरोफिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोथेरपिस्ट आहेत.निसर्गोपचार आणि मसाज थेरपी यांचा पारंपारिक वारसा त्यांच्याकडे असल्याने त्यांनी आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीची सांगड घालून स्वत:ची उपचार पद्धती विकसित केली आहे.या आधारे त्यांनी रीजीडीटी,कंप,भास,फ्रीजिंग अशा पार्किन्सनच्या लक्षणावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.अनेक शुभार्थी प्रात्यक्षिकासाठी मॉडेल म्हणून पुढे आले.आशा रेवणकर यांनी डॉ.सुरभी यांची ओळख करून दिली.उमेश सलगर यांनी आभार मानले.श्री.साठे यांनी कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग केले.कॉफी आणि बिस्किटे यांचा आस्वाद घेत गप्पा झाल्या.आणि कार्यक्रमाची सांगता झाली.