नाही दिला जन्म नाही खाल्या खस्ता
परी माझ्या घरी, माझी लाडकी दुहिता
अवती भवती फिरे, माझ्या संगे चाले
हिच्या असण्याने घर भारूनिय गेले
घालीत रांगोळी रंग भारूनिया देई
दिमतीला दोन हात , अंगी बळ येई
होई मैत्रीण जोडीची, गुजगोष्टी करायला
कधी होऊनिया माय देई आधार मनाला
किती नटवू सजवू माझी अप्रुपाची लेक
गोड लाजुनीय पाही किती करू कवतिक
वाचलीस का रे देवा ” एक तरी मुलगी असावी”
सत्वर पुरवीशी इच्छा सुनेच्या रुपात मिळावी
माझी सून – सौ. आशा नाडकर्णी
RELATED ARTICLES