Sunday, October 6, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयक गप्पा - ७३ – शोभनाताई

पार्किन्सन्सविषयक गप्पा – ७३ – शोभनाताई


मला एका शुभंकर कन्येचा मेसेज आला.बाबांचा आजार वाढतो आहे. ब्युरोचा माणूस २४ तास ठेवणे परवडत नाही.ते ऐकत नाहीत. सारखे पडतात.हॉस्पिटलमध्ये नेणे आईला झेपत नाही. आईला त्यांना सांभाळणे कठिण होत आहे.त्यामुळे डेकेअर सेंटर मध्ये ठेवत आहे.


आईबाबा दोघच पुण्यात राहतात. दोन मुली विवाहित दुसऱ्या गावाला राहणाऱ्या. तरी आळीपाळीने दोघीही येऊन जात. मला मेसेज पाठवणारी सातत्याने माझ्या संपर्कात आहे. सल्ला घेणे आणि फीडबॅक देणे दोन्ही करते.बाबाना न्यूरॉलॉजिस्टकडे न्यायचे असले तर मुंबईहून आवर्जून पुण्याला येते.तिच्या परीने जास्तीजास्त मदत करते.शुभार्थी पडल्यावर ब्युरोचा माणूस ठेवला पण कायम माणूस ठेवणे परवडणारे नव्हते. आईला एकटीने सांभाळणे झेपत नव्हते. मग आईची चिडचिड व्हायची, तब्येत बिघडायची.करोना मुळे लोकांचे येणे जाणे बंद् झालेले. बाबांशी चर्चा करून त्याना पटल्यावरच डेकेअर सेंटरचा निर्णय घेतला.

तिने व आईने बरीच शोधाशोध केली.बर्याच ठिकाणी ३०/३५ हजार खर्च होता.शेवटी आई अधूनमधून जाऊन येऊ शकेल असा जवळचा आर्थिक दृष्ट्या परवडणारी,जेथे योग्य काळजी घेतली जाते अशी संस्था सापडली. तेथे व्यवस्थित औषधोपचार,बरोबरीची माणसे, लक्ष द्यायला केअरटेकर असे सर्वच असणार होते आयोजक स्वत: डॉक्टर आहेत.
तिथला अनुभव पाहून बाबा रमले तर ठीक नाहीतर परत घरी यायचा पर्याय आहेच.वेगळा, सर्वाना सुखकारक अशा पर्यायाचा प्रयोग तरी करून पाहायला हवा.हा पर्याय तिच्या सख्या बहिणीला, नातेवायीकाना फारसा पटणारा नाही पण लोक काय म्हणतील यापेक्षा आई बाबांसाठी काय योग्य हे ते तीने व्यवहार आणि भावना यांचा योग्य ताळमेळ राखत पाहिले. स्वत:ची जबादारी झटकणे असा विचार येथे अजिबातच नव्हता. मला तिचे कौतुक वाटले.


मी तिच्या आईशीही बोलले अशा वेळी इतर लोक काही बोलत राहिले तर आपण ठेऊन चूक तर केली नाही ना असे गिल्ट फिलिंग येते. कोणाशी तरी बोलून चांगले वाटते.त्यांच्याशी खूप वेळ बोलणे झाले त्या नुकत्याच शुभार्थीला भेटून आल्या होत्या.तेथे तीन तास घालवून सर्व व्यवस्था पाहिली.त्यांचा अनुभव आशादायी होता.सकाळी चहा,बिस्किटे नंतर नाश्ता,दात घासायला, अंघोळ घालायला,त्यांचा माणूस बरोबर असतो.दोन्ही वेळचे जेवण,दुपारी चहा असतो.सकाळी १० ते १२ सर्वाना हॉलमध्ये आणले जाते.विविध खेळ,टीव्ही पाहणे,रेडीओ ऐकणे जे आवडेल ते करु शकतात.तेथले डॉक्टर त्याना म्हणाले तुम्हाला येथे काही गैरव्यवस्था वाटल्यास सांगा आम्ही सुधारणा करू.


तेथे गेल्यावर ते पडले भूवयीच्या वर चार टाके पडले.त्यांच्याकडे Ambulance आहे. स्वत:चे हॉस्पिटल आहे. लगेच उपचार केले जातात. त्यांनी फोन करून सांगितले. शुभंकर पत्नीला लगेच जाणे शक्य नव्हते. तेथल्या संयोजकांनी सांगितले आज्जी तुम्ही यायची गरज नाही. माहिती असावी म्हणून सांगितले.९०० रुपये खर्च आला होता.तो देण्यासाठी येते असे शुभंकराने ने सांगताच ते म्हणाले घाई नाही.पुढच्या महिन्याचे पैसे भरताना द्या.हे सर्व दिलासादायक होते. यापूर्वी शुभार्थी दोनदा पडले होते.त्या घाबरून गेल्या होत्या.हॉस्पिटलमध्ये नेणे त्रासदायक झाले होते.मुलीला फोन केला ती आली आणि खर्च एकदा ३०००रु. तर एकदा ९००० रु. आला.


.या सगळ्यामुळे शुभंकराच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरले होते. इतर लोकानाही याबद्दल माहिती सांगा असे त्या सांगत होत्या.मला शुभंकर मुलीने आई आणि वडिलाना पटवून Out of the box जाऊन असा निर्णय घेतला याचे पुन्हा कौतुक वाटले.
आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या आणि आईची तीन तीन महिने राहण्यासाठी वाटणी करणाऱ्या चौघी बहिणींच्या पार्श्वभूमीवर तर मला तिचा लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता घेतलेला निर्णय अगदी पटला.
पुढच्या गप्पात त्या चौघीं आणि त्यांच्या शुभार्थी आईबद्दल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क