सुरुवातीला शुभंकर शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.यानंतर भारती विद्यापीठाच्या ऐश्वर्या मोरे आणि मैत्रेयी कुलकर्णी या विद्यार्थीनिंनी त्यांच्या स्पीच थेरपीवरील प्रकल्पाची माहिती सांगितली आणि यात सहभागी होऊन मदत करावी अशी शुभार्थीना विनंती केली.
विजयालक्ष्मी रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टर पानसरे यांनी संस्था निर्माण करणे आणि जनजागृती या दोन्ही गोष्टी कठीण आहेत असे सांगितले.पार्किन्सन्स मित्रमंडळ या दोन्ही गोष्टी करत असल्याने एक डॉक्टर आणि सामाजिक कर्तव्याची जाण असणारी व्यक्ती म्हणून मला कौतुकास्पद वाटले. ईश्वरापर्यंत पोचण्याचे विविध मार्ग आहेत त्यापैकी एक ओंकार साधना असे सांगून आपल्या व्याख्यानास सुरुवात केली.वेदापासून ते आत्तापर्यंतच्या संत साहित्यात,विवेकानंद आदि आधुनिक विचारवंतांच्या लेखनातही ओंकाराची महती सांगितली आहे.ओंकार हा उपजत,नैसर्गिक,सूक्ष्म,ब्रम्हां
ओंकार साधना करताना सुरुवातीला साधी मांडी,पद्मासन,वज्रासन अशा कोणत्याही आसनात बसावे.ज्यांना शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसले तरी चालेल.पाठीचा कणा,मान ताठ ठेवणे महत्वाचे.तोंडाने स्वच्छ स्वरात, स्वत:ला ऐकू येईल असा ओंकार म्हणावा. मनात अनेक विचार येत राहतील.ते येऊ द्यावेत.पण त्यात गुंतू नये.मन ओंकाराशी जोडलेले असावे.शक्यतो ठराविक वेळ, ठराविक जागा असावी.आसक्ती न ठेवता श्रद्धेने केल्याने फायदा होतो.खर्जात म्हटल्यास अधिक फायदा होतो.सुरुवातीला तीनदा,नंतर ११,२१ असे वाढवत कितीही वेळा म्हटले तरी चालेल.
ओंकार साधनेचा शरीर,मनावर चांगला परिणाम होतो.रक्तदाब,दमा,हृदयविकार अशा विकारावर नक्की उपयोग होतो.यानंतर पुण्यातील कापडे नावाच्या ओंकार शिकवणाऱ्या गृहस्थाना खर्जात ओंकार ऐकवल्यावर विकार बरे होतात असे आढळले.मुंबईतील केईएम हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर के.के. दाते यांनी आपल्या सहाय्यक डॉक्टरांना आपल्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर प्रयोग करून रेकॉर्ड ठेवण्यास सांगितले. आलेल्या अनुभवावरून त्यांना कापडे यांचे म्हणणे पटले.
प्रभात कंपनीच्या शांताराम आठवले यांनीही अशाच प्रकारचे संशोधन मांडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील एका संस्थेने त्याच्या ध्वनिमुद्रिका केल्या आणि अमेरिकेत आपल्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर त्याचा उपयोग केला.यानंतर त्यांनी ओंकारसाधनेने अध्यात्मिक अंगाने कशी प्रगती होते ते मंडोपनिषद,तैतरीय उपनिषद,ज्ञानेश्वरी,स्वामी रामतीर्थ, रमणमहर्षी,यांच्या विचाराच्या आधारे सांगितले.शरीरातील सात चक्रे, त्या त्या चक्रांशी संबंधित अवयवाचे कार्य सुरळीत करतात.याला शरीरशास्त्राचा आधार आहे हे सांगितले. आपल्या पाठीच्या कण्यात फ्लेक्सेसीस असतात त्याचा चक्राशी संबंध आहे.
या नंतर पार्किन्सन्सवर माहिती सांगून त्यावर ओंकाराचा काय उपयोग होईल हे सांगितले.ओंकारातील ‘अ’च्या उच्चाराने हातापायात कंपने पसरतात’,उ ‘च्या उच्चाराने छाती व उदर पोकळीत तर’ म ‘ची मेंदूकडे जातात.व मेंदूचे कार्य सुधारते.ओंकारामुळे मानसिक ताण कमी होतो,शरीराला शैथिल्य आणि एक प्रकारची शांतता मिळते.मेंदूला स्थिरता मिळते.उत्साह निर्माण होतो.पार्किन्सन्समुळे उदासीनता,नकारात्मक विचार येतात ते कमी होतात.मृत पेशी नव्याने तयार होत नाहीत परंतु कार्यान्वित नसलेल्या पेशी कार्यान्वित होतात.पेशींचा मृत्यू कमी होतो.पार्किन्सनन्सच्या पुढच्या अवस्था येण्याचे प्रमाण लांबणीवर पडते.सकारात्मक आयुष्य जगायला शिकतो.
व्याख्यानाबरोबर डॉक्टरनी सर्वांकडून ओंकाराचे प्रात्यक्षिक करून घेतले.खर्ज,मध्य आणि तीव्र स्वरात ओंकार कसा म्हणायचा हे ही दाखवले.मध्य आणि तीव्र स्वरात ओंकार जास्तवेळ म्हणता येतो.खर्जातला जास्त वेळ म्हणता येत नाही. परंतु खर्जात म्हणण्याचा प्रयत्न करावा. त्याचा जास्त उपयोग होतो असे सांगितले.यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.अविनाश धर्माधिकारी आणि विजय ममदापुरकर यांनी आपले अनुभव सांगितले.पद्मजा ताम्हनकर यांनी भक्तीगीत म्हटले. वसू देसाई आणि नारायण कलबाग यांनी वाढदिवसानिमित्त पेढे दिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
(फोटो सौजन्य दीपा होनप)