सोमवर दिनांक १२ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
‘ पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तकाचे लेखक शेखर बर्वे हे’ पार्किन्सन्सचे आत्मविश्लेषण’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सखोल अभ्यास,अनेक शुभार्थींचे निरीक्षण आणि अनुभव याचा आधार त्यांच्या व्याख्यानाला असल्याने सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
स्मरणिकेसाठी लेखन, अनुभव द्यायचे असतील त्यांनी सभेस येताना आणावेत.सोबत स्वत:चा फोटोही द्यावा.
यानंतर मात्र कोणतेही लेखन स्वीकारले जाणार नाही.
पार्किन्सन्स दिनानिमित्त ९ एप्रिलला मेळावा आयोजित करत आहोत.यावेळी शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन असणार आहे.ज्यांना कलाकृती ठेवायच्या आहेत त्यांनी आत्तापासून तयारीला लागावे.आपण कोणत्या कलाकृती ठेवणार आहात त्याबद्दल.सभेच्यावेळी माहिती द्यावी.
वेळ : दुपारी ४.३०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४