Thursday, November 21, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्स विषयक गप्पा - १६ - डॉ. शोभना तीर्थळी

पार्किन्सन्स विषयक गप्पा – १६ – डॉ. शोभना तीर्थळी

. ११ जूनच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेत ‘अनुभवांची देवाण घेवाण ‘असा विषय ठेवला होता.या सभेस सुनील क्षीरसागर हे आपले मित्र शुभार्थी अजित सरदेसाई यांच्यासाठी आले होते. ते पतंजली योग शिक्षक आहेत ‘ हा आजार शत्रूला सुद्धा होऊ नये’ असे मत त्यांनी मांडले. पार्किन्सन्सविषयी अशी नकारात्मक विधाने आणि भयंकरीकरण अनेकवेळा अनेकांकडून केले जाते. यात तज्ज्ञही असतात.

२००८ साली प्रतिथयश न्यूरॉलॉजिस्टचे व्याख्यान ठेवले होते. ते म्हणाले, पीडीच्या गोळ्यांचा ५/६ वर्षे चांगला परिणाम होतो. पेशंट खुश असतो. याला आम्ही हनिमून पिरिएड म्हणतो. त्यानंतर उपयोग कमी आणि दुष्परिणाम जास्त होतात. आम्ही गमतीने म्हणतो, ४/५ वर्षानंतर शत्रू डॉक्टरकडे पेशंटला पाठवावे. थोडीफार लक्षणातील वाढ वगळता २५/३० वर्षे पीडीसह आनंदाने जागणाऱ्या आमच्या शुभार्थीनी हे विधानही तपासून पाहण्यास भाग पाडले आहे.

डॉक्टर वाघणणा (Vaghanna ) यांचा वेगवेगळ्या टीव्ही चॅनल वर फोन इन कार्यक्रमात सहभाग असतो. पार्किन्सन्सवरील कार्यक्रमात ते शेवटच्या स्टेजचे वर्णन करत होते. ती भयानकता पेशंटनी ऐकल्यास नक्कीच आजाराचा धसका घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्यांना पार्किन्सन्सचे निदान झाले तेंव्हा मी असाच एक लेख वाचून धसका घेतला होता. ह्यांच्यापासून ते वर्तमानपत्र दडवून ठेवले होते. शेवटची स्टेज अशी असते हे खरे असले तरी सर्वाना ती येतेच असे नाही. ‘मी आठवणीतील शुभार्थी’ मालिका लिहिताना अशी आजाराची भयानकता नवीन पेशंटच्या मनावर न ठसता आजाराचे वास्तव स्वरूप समजून आजारासह आनंदी जगता येते हे दाखवणे हाच उद्देष आहे. येथे एक नमूद करायचे आहे, डॉक्टर vaghnna यांना मी आमच्या स्वमदत गटाबद्दल सांगून या शेवटच्या स्टेजच्या वर्णनाचा शुभार्थीवर कसा परिणाम होतो हे सांगितले. त्यांच्याशी झालेला संवाद दिलासा देणारा होता. यापुढे मी हे लक्षात घेईन असे त्यांनी सांगितले. याबद्दल डॉक्टरना मनापासून धन्यवाद.

सर्व तज्ज्ञांबाद्दल आदर राखून मी सांगू इच्छिते, कृपया अशी नकारात्मक विधाने करून शुभार्थीचे मनोधैर्य खचवू नये. सत्यही सांगताना कोणाला कशा प्रकारे सांगावे याचे तारतम्य हवेच ना?

अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson’s Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist… ) हा युट्युब channel पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क