पार्किन्सन्स मित्रमंडळाने आय.पी.एच.,पुणे येथे सोमवार दिनांक २८ मे रोजी सभा आयोजित केली होती.. यावेळी डॉक्टर विद्या काकडे यानी ‘Meditation specially for Parkinson’s disease’ या विषयावर मार्गदर्शन केले.सभेस २७ सदस्य उपस्थित होते. अॅनिमेशनच्या आधारे तांत्रिक बाबींचे विवरण केल्याने विषय सोपा झाला.श्रोते रंगून गेले.
विद्या काकडे व्याख्यानात म्हणाल्या,भारतीयांना ध्यानधारणा, मेडिटेशन हे शब्द नवीन नाहीत.आत्तापर्यंत त्याचा अध्यात्मिक अंगानेच विचार केला गेला. सामान्य माणूस त्यापासून दूरच राहिला.खरे तर मेडिटेशन हा चांगल्या आरोग्याचा पाया आहे.हे एक जसे हत्यार आहे तसेच तंत्रही आहे की त्याने आपण आजाराची तीव्रता कमी करू शकतो.
पार्किन्सन्स शुभार्थीवरही याचा चांगला परिणाम होऊ शकतो.मेडिटेशन पार्किन्सन्सच्या मूळ कारणावरच काम करते. त्यामुळे पीडीच्या सर्वच लक्षणांची तीव्रता कमी होते.मानसिक स्वास्थ्य सुधारते, फ्रीजिंगसारख्या त्रासदायी लक्षणावरही उपयोग होतो.
Amygdala या मेंदूच्या भागातले भावनिक प्रतिक्रीयांमुळे होणारे बदल बंद होतात.मेडिटेशनच्या प्रक्रियेमुळे बऱ्याच रुग्णांना डोपामीन फ्लो सुधारल्याचे जाणवते. Rosi Goldsmith यांनी हे प्रयोगाने सिद्ध केले आहे. तसेच Grey matter ची घनता वाढते.आठ आठवड्यात Mitochondria वाढतात.Mitochondria चे कार्य सुधारते.त्यामुळे Oxidative stress कमी होतो. Alpha synuclein नावाचे विषारी द्रव्य न्यूरॉनच्या डिसफंक्शनिंगला जबाबदार असते, ते सुद्धा कमी होते,असे विद्या काकडे म्हणाल्या.
विविध कलांत मन रमते तेंव्हा मेडिटेशन होत असते.भूत आणि भविष्याचा विचार न करता क्षणस्थ राहता येणे म्हणजे मेडिटेशनच.या दृष्टीने काकडे यांनी पुढील माहिती दिली.श्वास आणि मन एकमेकात गुंतलेले असतात.मेडिटेशनमुळे सारखा विचार करणाऱ्या मनाचा विचारांचा वेग कमी होतो. मन नियंत्रित करण्यासाठी श्वासही महत्वाचा आहे.पीडी पेशंटबाबत फुफ्फुसात १० टक्केच श्वास भरलेला असतो. यासाठी प्राणायाम गरजेचा.पीडी पेशंटसाठी अनुलोम विलोम महत्वाचा आहे.पेशंटला फ्रीजिंगचा त्रास झाल्यावरही ४/५ वेळा खोल श्वास घेतल्यास फ्रीजिंगमधून सुटका होण्यास मदत होते.
यानंतर काकडे यांनी सर्वांकडून मेडिटेशन करवून घेतले.
सर्वांनाच अनेक प्रश्न होते. त्यांना काकडे यांनी उत्तरे दिली.
आय.पी.एच.चा सुसज्ज वातानुकूलिक हॉल आणि उपयुक्त व्याख्यान यामुळे श्रोते रंगून गेले.
टीप –
वरील सर्व तांत्रिक बाबींचा पडताळा,सत्यासत्यता पाहणे हे वैज्ञानिक करतीलच. प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात मेडिटेशन,प्राणायाम,नृत्य, संगीत, विविध कला यांचा उपयोग शुभार्थींच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी होत आहे हे निश्चित.