शुभार्थी रेखा आचार्य यांचे ४५ व्या वर्षी पार्किन्सन्सचे निदान झाले.निश्चितपणे पीडीच आहे हे समजण्यात बराच काळ गेला. त्याना फ्रोजन शोल्डरचा त्रास होत होता.चालताना पायात पाय अडकत होते. हालचाली मंद झाल्या होत्या. एक न्यूरॉलॉजिस्टनी पीडी आहे सांगितले तर दुसऱ्यांनी नाही असे सांगितले मुलगा अमेरिकेत होता तो म्हणाला, ‘सरळ येथेच ये’. त्या अमेरिकेला मुलाकडे गेल्या होत्या तिथे त्यांच्याकडून इतर चाचण्यांबरोबर कागदावर काही मजकूर लिहून घेतला गेला अक्षरात खूपच फरक पडला होता ते बारीक बारीक होत गेले होते. याचबरोबर आधी सांगितलेली इतरही लक्षणे होती आणि पार्किन्सन्सचे पक्के निदान झाले. या अक्षराच्या चाचणीमुळे निदान होण्यात महत्वाची भूमिका बजावली होती
.पीडीची विविध लक्षणे आहेत त्याच्यात अक्षरात होणारा बदल हे एक लक्षण आहे याला मायक्रोग्राफिया ( Micrographiya ) म्हणतात..पार्किन्सन्स मधील सुक्ष्म हालचालीच्या मर्यादा( Motor Disorder)मुळे हे होत.बरेच जण माझ सुंदर अक्षर कस बिघडलं याची खंत करत बसतात.लिहीणच सोडून देतात.परंतु इतर लक्षणाप्रमाणे या मर्यादेवरही नियंत्रण आणता येत.आमच्याकडे व्याख्यानाला आलेल्या फिजिओथेरपिस्टनी चार ओळीमध्ये मोठ्ठी अक्षरे लिहिण्याचा सराव केल्यास हळूहळू अक्षर मोठ्ठ होऊ शकत.अस सांगितलं होत.हे नाही केले तरी किमान इतर व्यायामाप्रमाणे लेखन करत राहणे आवश्यक असते..बर्याच जणांनी ते न केल्याने ते लिहिण्याची क्षमता गमाउन बसतात आणि मग हळूहळू सहीसुद्धा करता येत नाही. आणि आर्थिक व्यवहारासाठी अंगठा द्यावा लागतो पण हेच जर तुम्ही थोडं थोडं लिहीत राहिला तर तुमचे अक्षर बदलते पण तुम्हाला लिहिता येऊ शकते. वापरा नाहीतर गमवा असंच याबाबत होतं
सातत्याने लिहिण्याचा सराव करणारे करणारे अनेक शुभार्थी मंडळात आहेत.
आमच्या सुरुवातीच्या काळातील खंदे कार्यकर्ते शुभार्थी जे डी कुलकर्णी यांनी सकाळच्या मुक्तपीठ मध्ये पार्किन्सन्स बाबत लेख दिले होते. स्मरणिकेसाठीही लेख दिला होता. ते नेहमी सांगायचे ‘रोज एक पानभर लिहिलेत, जस येईल तस,तरी तुम्ही वाचता येण्याजोगे लिहू शकता.माझे छापून आलेले लेख माझ्या स्वत:च्या हस्ताक्षरातले आहेत. त्यामुळे तुम्ही लिहित रहा’. मोरेश्वर काशीकरही स्व अक्षरात स्मरणिकेसाठी लेख देतात. गोपाळ तीर्थळी यांनी जागतिक पार्किन्सन दिनाच्या कलाकृतींच्या प्रदर्शनात संपूर्ण हरिपाठ स्व अक्षरात लिहून ठेवला होता.शुभंकर शुभार्थीना वाढदिवसाची पत्रे लिहायचे काम ही ते करायचे. चंद्रशेखर दिवाणे यांची सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरी सभा ठेवली होती त्यांनी सुंदर अक्षरात त्यांच्या घराकडे कसे यायचे याचा नकाशा काढून सर्वांना पत्रे लिहिली होती. डॉक्टर जावडेकर यांनी तर पुस्तक प्रसिद्ध केले आहे त्याचे लेखन स्व अक्षरात केलेले आहे अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.
अर्थात अक्षर पूर्वीसारखे येत नाही हे खरेच आहे आणि ते स्वीकारणे सहज सोपे नाही.पर्किन्सन्स वाढत गेला की इतरही बरेच बदल होतात ते स्वकारणे जड जाते. पण एकदा पार्किन्सन्सला स्वीकारले की बदलही सहज स्वीकारले जातात.मी ह्यांचे चे घरातलेच उदाहरण पाहिले आहे.त्याबाबत पुढील गप्पात.
सोबत’ गोष्ट छोटीशी’ या लेख्ची लिंक देत आहे.ह्यंच्या पत्रलेखनाचा किस्सा त्यात आहे.