मी सौ.छाया फडणीस. माझ्या मिसटराना पार्कीन्सन्सचा त्रास आहे.मी हा ग्रुप जॉइन केल्या मुळे अनेक बाबींमध्ये योग्य सल्ला मिळाला.इतर समदुःखी लोक आहेत,आणि ते आपल्या बरोबर आहेत या बाबी चा खूप आधार वाटला.इतरांचे दुःख समजले त्यामुळे आपल दुःख फार मोठ असल्याची भावना कमी झाली. बर्याच विचारांची देवाणघेवाण झाली. उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांची नावे समजली.शोभना ताईंच्या सभेच्या इतिवृत्त पार्कीन्सन्स बरीच माहिती समजते.आम्ही सभाला हजर राहू शकत नाही. पण हे इतिवृत्त वाचले की हजर असल्या सारखेच वाटते.
पार्कीन्सन्स संबंधी कोणतीही शंका मोकळे पणाने ग्रूपमध्ये विचारता येते.त्या संबंधी योग्य सल्ला मिळतो.व मार्गदर्शन मिळते.हा ग्रूप म्हणजे अगदी जवळचा मित्र आहे.