खर सांगू, शुभार्थी येत नसले तरी शुभांकरांनी जरूर यावे. हा गृपच एक शुभंकर, प्राणायाम, एक शवासन आहे जो ऊर्जा देतो. गेल्या शनिवारची गोष्ट सांगते. मी. रेवण कर यांना एका ब्रीज टुर्नामेंट चा रिझल्ट तयार करायचा होता. मला माहित होते की हल्ली त्यांना आकड्यांच्या गणीता चा त्रास होतो पण मान्य करणे त्यांचा पिंड नव्हे.
शनिवारी रात्री एक ते पाच पर्यंत झोपून परत गणितं करायला बसले. मी सहा वाजता उठून कॉम्पुटर वर फिड करायला बसले. अख्खा दिवस दोघं ही तेच काम करत होतो पण हजार चुका. मी मधे मधे उठून नाश्ता, जेवण तयार करून बसल्या जागी त्यांना देत होते.
कित्ती विनवण्या केल्या तरी ते जागचे हलायचे नाही.
रविवारी पहाटे ते फक्त 4 ते 6 झोपले. मला तर सारखे रडू यायचे पण रडले नाही. फक्त एकच विचार चालू असायचा कि यांच्या मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी काय उपाय करावेत?
Result तयार होत नव्हता, खेळाडूंचे , सेक्रेटरी चे फोन येत होते, मला लाज वाटत होती मेल्याहून मेल्यासारखे
वाटत होते पण उपाय सुचत नव्हता.
रिझल्ट बनवता येणाऱ्या मित्रांची मदत घ्या म्हटलं, पण ऐकतील ते रमेश कसले.
पण मी मात्र त्यांना पटवून दिले की पूर्ण झोप झाल्याविना आकडेवारी जमणार नाही. नशीब की ते तरी पटल. सोमवारी रात्री दोघेही 12 वाजता झोपलो . पहाटे 5 ला उठून येरे माझ्या मागल्या.
टुर्नामेंट च्या सेक्रेटरीला यांच्या बद्दल गैर समजूत होणार नाही अशा पद्धतीचा मेसेज पाठवला आणि त्यांची धडपड कळवली.
शेवटी त्यांनी मंगळवारी व्यवस्थित रिझल्ट पाठवला. मी तर हंबरडा फोडायचा बाकी होता. चार दिवस मी काय जगात होते ते मलाच माहित होते.
पण सोमवारी सायंकाळी मात्र मी संपूर्ण वेगळ्या विश्वात होते. आपल्या मासिक सभेने मला १००% वेगळ्या विश्वात नेल होत. ३-८ मी खूप छान जगात होते. त्यात डॉकट रानी माझा उल्लेख आशा काकू असा केला ते मला अनपेक्षित होतं, त्यातूनही खूप ऊर्जा मिळाली. Shobhanatai यांनी मिठीत ही घेतलं होत त्यातूनही खूप ऊर्जा मिळाली.
हे मंडळ माझ्यासाठी काय आहे हे सांगणयासाठी , न कंटाळा करत मी आज इतकं लिहिलंय.
आशा रेवणकर