गुरुवार दिनांक ८ – १० – १५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल आश्विनी येथे सभा आयोजित केली होती.’पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ पुस्तकाचे लेखक श्री.शेखर बर्वे यांचे ‘शरीर,मन आणि आजार ‘या विषयावर व्याख्यान झाले.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.
८० वर्षे ओलांडलेल्या सुमन जोग यांनी ऑर्थरायटीसचा स्वमदत गट सुरु करत असल्याची माहिती दिली.
यानंतर निशिकांत जोशी श्री एकबोटे आणि श्री ताम्हणकर यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व्याख्यानात सुरुवातीला श्री बर्वे यांनी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन असल्याचे आणि WHO ने ‘चला मोकळेपणाने बोलू मानसिक आरोग्याबद्दल.’असे घोषवाक्य जाहीर केल्याचे सांगितले.व्या ख्यानात त्यांनी मेंदुची रचना,कार्य,शरीर व्यवस्थेतील भूमिका,मानसशास्त्रीय द्रष्ट्या,आयुर्वेदानुसार मनाची माहिती,मन, शरीर,आजार यातील परस्पर संबंध,पीडी पेशंटशी या सर्वाचा संबध याविषयी मूलगामी विवेचन केले त्याचा थोडक्यात आढावा घेत आहे.
शरीर आणि मन याचं अतूट अद्वैत असत. मन स्वस्थ असत तेंव्हा प्रकृती उत्तम असते. आजाराबद्दल बोलल जात तेंव्हा,आजाराच्या लक्षणावरून अवस्थेवरून बोलल जात. आपण निरामयतेच्या किती जवळ आहोत याचा बोध होत नाही.निरामयतेची काही लक्षणे म्हणजे पडल्या पडल्या गाढ व अखंड झोप,झोपून उठल्यावर ताजेतवाने वाटणे,नियमित शौच मलमूत्र विसर्जन,उत्साह टिकण,१००% सर्व अवयवांची क्षमता टिकण,रोगप्रतिकारशक्ती,कणखरपणा, प्रसन्न आशावादी वृत्ती.
शरीराच्या या आरशात आजाराला पहायला हव.आजार समजण्याच्या कितीतरी आधी बदल होत असतात.शरीराचे महत्वाचे घटक. मेंदू आणि मन.या दोन्हीच संतुलन असत..संवेदना,जाणीवा,वेदना, विचार,ताणतणाव हे संतुलन बिघडवतात.आजार निर्माण करतात.यासाठी मन मोकळ करण,तणावयुक्त विचार,तणावाची कारणे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाच.रासायनिक बद्लानेही मेंदूत वर्तनात बदल होत्तात.मेंदू हा गुंतागुंतीचा अवघड,क्लिष्ट विषय आहे.मेंदूत सतत संदेशवहन होत असते.मेंदूच्या विविध भागात अब्जावधी पेशी व मज्जापेशी कार्यरत असतात.प्राणवायूचा पुरवठा निट न झाल्यास मज्जापेशी मरतात.श्वसन हे मेंदू,शरीर आणि मन याना जोडणारा सेतू असते.शरीराला लागणार्या प्राणवायुपैकी २० टक्के मेंदूकडे जातो.पीडी पेशंटला यापेक्षा पाचपट अधिक लागतो.यासाठी दिर्घ श्वसन,प्राणायाम,व्यायाम यांची गरज असते.
मनावर अनेक वर्षे शास्त्रज्ञ काम करत आहेत पण त्याचा ठाव लागलेला नाही.मनाची नेमकी व्याख्या करता येत नाही.मग वर्णन केल जात.जीवशास्त्रज्ञांच्या मते मन मेंदूचाच अविभाज्य भाग आहे.मनाचे चेतन आणि अचेतन भाग असतात.भावना,विचार,निर्णय प्रक्रिया चेतन अचेतन दोन्ही भागातून.निरोगी मनाचा विचार करताना विचार,मन आणि मेंदू अलग करता येत नाहीत.मनाच्या सर्व व्यवहारात षड्रिपू लाटा निर्माण करतात.सत्व ,रज,तम यात भर घालतात; विचार,कृती,असंतुलित संकल्प,विकल्प भर घालतात.मन:शक्तीवर परिणाम करतात.मनाचे दोष तपासता येत नाहीत.
शारीरिक विकृतीने मनाच्या क्षमतेवर परिणाम होतो.त्याचा विचार कृतीवर परिणाम,त्याचे परिणाम आजारावर,जीवनावर आणि ते चेहर्यावर प्रतिबिंबित होतात. संशोधनानुसार प्रथम मन व नंतर शरीर आजारी पडते.ल्युईस यांच्या मते , मनातील आजार शरीरावर.म्हणून मनाच्या जखमा बर्या करा.स्वास्थ्य बाधित झाल्यावर मनाबद्दल काय करायचं हा विचार व्हावा.आयुर्वेदानी याबाबत विचार केला आहे.
ताणताणाव सहनशक्तीपलीकडे गेले की,शारीरिक लक्षणे दिसू लागतात.भूक,पचनावर परिणाम होतो.निद्रनाश अस्वस्थता,थकावट,मेंदू बधीर होण,वैताग,खिन्नता,चिडचिड,वैफल् य शेवटी उदासीनता येते.मध्यम वयापुढे जास्त प्रादुर्भाव होतो.अयोग्य आहार,व्यायामाचा अभाव,विश्रांतीचा अभाव याच्या एकत्र परिणामातून आजार निर्माण होतो.मनात मृत्यूची भीती,मरण्यापुर्वीचे हाल या कल्पनेची भिती,मरण्याच्या क्षणाचा विचार, मागे राहणार्यांची काळजी,अशा भीतीही असतात. याशिवाय स्वप्रतीमेला बसणारा धक्का,वृद्धत्वातील परावलंबित्व,आर्थिक स्तर,कुटुंब चालवताना सहभाग नाही या चिंता वृद्धत्वात मन पोखरतात.याचा परिपाक विचारावर,आजारावर होतो त्यावर विज्ञान नियंत्रण ठेऊ शकत नाही.स्वप्रयत्न महत्वाचे.
स्वप्रयत्नासाठी त्यांनी काही सूचना केल्या.त्या अशा
– हव ते मिळत नाही,नको असलेल स्वीकाराव लागत.या दोन्हीचा मिलाफ म्हणजे वास्तव.वास्तवाचा स्वीकार करा.
– वैचारिक प्रक्रिया नकारात्मक्तेकडे असल्यास कृतीवर परिणाम होतो. यासाठी सत्संग,सत्विचार,श्रद्धा,ध्यान, योग,ग्रंथ पठण,कलेचा आनंद घ्या.त्याचा सुपरिणाम होतो.
– कृतीत तोचतोचपणा व त्यातून कंटाळा,निराशा,उद्वेग निर्माण होतात. यासाठी मानसिक विश्रांती घेण्यासाठी कोणताही विचार न करता स्वस्थ बसून राहा.
– कौटुंबिक गोष्टीत मते इतरांवर लादु नका.ती कालबाह्य..जमल्यास प्रवाही व काळाबरोबर आचार विचार ठेवा.एकटेपणा टाळा.
– परावलंबित्व कमी करा.मन कधीच वृद्ध होत नाही,निवृत्त होत नाही.त्याला.गुंतलेले असु द्या.त्याचे योग्य पोषण,वापर हा मन:शक्तीकडे घेऊन जाण्याच काम करेल.
वैद्यकीय शास्त्रात सहभागातून आरोग्य हा विचार आहे त्यात मन महत्वाचा घटक आहे.स्वमदतगटात सहभागी होणे यासाठी महत्वाचे.
श्री बर्वे यांच्या व्याख्यानाला विचाराबरोबर अनुभवाची जोड असल्याने ते सर्वांनाच भावले. डॉक्टर शशिकांत करंदीकर यांनी श्रीकृष्ण मराठे यांचे ‘माझी आरोग्यगाथा ‘आणि डॉक्टर मनोज भाटवडेकर यांचे’ एका पुनर्जन्माची कथा’ या दोन मनोबल वाढवणार्या पुस्तकांबद्दल माहिती सांगितली.
यानंतर संचेती हॉस्पिटलच्या न्युरो फिजिओथेरपी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रम करणार्या चार विद्यार्थीनिनी त्यांच्या पार्किन्सन्सवरील प्रयोगासाठी सहभाग घेण्याची शुभार्थीना विनंती केली.
प्रार्थनेनी सभेची सांगता झाली.