Thursday, November 7, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयक गप्पा - ८२ - डॉ. शोभना तीर्थळी

पार्किन्सन्सविषयक गप्पा – ८२ – डॉ. शोभना तीर्थळी

जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची एक सभा घेतो. झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा घेऊन काही सुधारणा हव्यात का हेही पहिले जाते.प्रत्येक जण आपापले मत सांगत होते.डॉ. अमित करकरे यांनी या ग्रुपकडून मला काय मिळाले हे सांगताना आमच्या झूम मिटिंगबद्दल सांगितले त्यांनी अनेक ठिकाणी झुमवर व्याख्याने दिली इतरत्र दिसणारा ढिसाळपणा मंडळाच्या सभेत दिसला नाही.प्रत्येकजण शिस्तबद्धपणे ऑडिओ,व्हिडीओ म्युट करून होता.हवे तेंव्हा अनम्युट करत होता.त्यांच्या या निरीक्षणाने आम्ही नक्कीच सुखावलो.हे सहजासहजी झाले नव्हते.सुरु केले तेंव्हा सर्वांनाच हे तंत्र नवीन होते.
लॉकडाऊनच्या काळात अतुल ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स चा प्रस्ताव मांडला.रमेश तिळवे,डॉ.रेखा देशमुख,वनिता सोमण,जोस्ना सुभेदार यांनी कल्पना उचलून धरली. झूम लोड करण्यापासून आमची सुरुवात होती. पहिली ट्रायल ८ एप्रिल २०२० झाली.यानंतर दोन तीन ट्रायल मिटिंग झाल्या.अमेरिकेहून आमच्या अध्यक्ष श्यामला शेंडेही हजर राहिल्या.सभा यशस्वी झाल्या.पहिली ट्रायल व्याख्यानही आपल्यातल्याच कोणाचे तरी ठेवावे म्हणू डॉ. रेखा देशमुख यांचे ‘आनंदी कसे रहावे’ या विषयावर व्याख्यान झाले.


मोफत झूम वापरत असल्याने.४० मिनिटांनी थांबावे लागे.हा एक अडथळाच होता.दुसरा अडथळा झुमच्या विश्वासार्हतेबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या.आपले बँकेतील पैसे जातील इथपर्यंत भीती होती.मग इतर काही app वापरून पाहिली.ती सोयीची वाटत नव्हती.हृषिकेशने १२ मेला झूमवर ऑनलाईन डान्स सुरु केला.PDMDSचे कार्यक्रमही झुमवर होते. या दोन्हीकडे हजर राहणार्यांनी झूमचा आग्रह धरला.बहुमताने झूम सुरु झाले.झुमचे पैसे भरून ४० मिनिटात बंद होण्याच्या अडथळ्यावर मात केली.या सर्व काळात रमेश तिळवे, मयूर श्रोत्रीय आदींनी तंत्रज्ञानविषयक भ्रामक समजुती दूर करण्याचे प्रयत्न केले.अतुल यांनी होस्ट म्हणून आणि गिरीशनी कोहोस्ट म्हणून उत्तम कामगिरी केली.


अतुलने भेटू आनंदेची कल्पना सुचविली तिनेही बस्तान बसवले.यु ट्यूबवरील व्हिडीओ आणि Viewer वाढू लागले.या काळात वेळोवेळी ऑडीओ,व्हिडीओ म्युट कसा करायचा.प्रश्न विचारताना चालू कसा करायचा, काय टाळायचे.याबाबत सूचना Whats app वर दिल्या जाऊ लागल्या.जे करत नाहीत त्याना पर्सनली ते कसे करायचे हे समजाऊन दिले जाऊ लागले.सार्वजण झुमला सराईत झाले.


या काळात आणखी एक काम केले ते म्हणजे सर्व सभासदाना फोन करून झूम मिटिंग चालू झाल्याचे सांगितले.ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्याना आधी घरातील इतरांच्या फोनवरून जॉईन होउन नंतर स्वत:चा फोन घेण्यासाठी प्रवृत्त केले गेले.वैशाली खोपडेनी हे काम चोख केले. स्मार्टफोन हे त्यांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठीचे औषध आहे असे ती सांगे.आता बहुतेक जण स्मार्ट फोन वापरतात.सगळीकडे निराशेचे वातावरण असताना आमचे शुभंकर आणि शुभार्थी मात्र Whatsapp वरील इतरांच्या कलाकृती, कविता. सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मोटीवेट होत होते.एकमेकाना आधार देणारा सुंदर परिवार झाला.परगावचे लोक मंडळाशी जोडले गेले.आता समाजात मिसळायला कोणते बंधन नसले तरी ऑनलाईन सभा चालूच आहेत.
कदाचित ही सर्व जंत्री कंटाळवाणी वाटेल पण डॉ.अमित करकरे यांच्या वाक्याने २० सालापासून चालू झालेली झूम मिटिंग अनेकांच्या सहकार्यातून कशी स्थिरावत गेली याच्या आठवणी जाग्या झाल्या.या प्रक्रियेचीची नोंद व्हायला हवी असे वाटले.एखादा उपक्रम यशस्वी व्हायचा असला तर त्याला सर्वांनी एकत्र येऊन भिडायला लागते हे सांगावेसे वाटले. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क