Thursday, November 21, 2024
Homeपार्किन्सन्सविषयी गप्पापार्किन्सन्सविषयक गप्पा - ३३ - शोभनाताई

पार्किन्सन्सविषयक गप्पा – ३३ – शोभनाताई

मागच्या गप्पात रमेश रेवणकर सभेला येत नाहित असे लिहिले होते.असे असले तरी त्यांचा मंडळाशी अप्रत्यक्ष संबंध येतच असतो.आणि मंडळाच्या कामाला हातभार लागत असतो.ते दरवर्षी स्वत: आकाशकंदील बनवतात.प्रत्येकवेळी वेगळे डिझाईन असते.कलाकृतीच्या प्रदर्शनात आशा रेवणकर ते ठेवते..अनेकांना यातून प्रेरणा मिळते.आमच्या कार्यकारिणी सदस्यांची सातत्यने फोनाफोनी चालू असते.निरोप घेणे, देणे हे ते न कंटाळता करतात.त्यांच्या घरी अनेकवेळा मिटिंग होते.त्याबद्दल त्यांची नाराजी नसते घरी असले तर थोड्या गपा मारतात.आशा मंडळाच्या कामात बुडून गेलेली असते.. त्याबद्दलही ते कधी कुरकुर करत नाहीत.

टाटा मोटर्समधून उच्च पदावरून ते निवृत्त झाले.त्यानंतरही सल्लागार म्हणून काम करत राहिले. ते ब्रिजचे राष्ट्रीय पातळीवरचे चॅम्पियन आहेत एवढेच त्यांच्याबद्दल माहित होते. गप्पा – ३२ ला आशाची प्रतिक्रिया आली आणि शुभार्थी रमेश रेवणकर यांच्याविषयी काही गोष्टी नव्याने कळल्या. जेंव्हा १६/१७ वर्षापूर्वी पार्किन्सन्सचे निदान झाले तेंव्हा मित्रांना वाटले आता ते ब्रिज खेळू शकणार नाहीत.पण त्यांची इच्छाशक्ती,जिद्द जबरदस्त आहे.पार्किन्सन्स त्यांच्या क्षमतेवर परिणाम करू शकला नाही.पुण्यात आणि .पुण्याबाहेर ते सातत्याने ब्रिज खेळण्यासाठी जात राहिले.रमेश रेवणकर सहभागी आहेत म्हणजे विजय ठरलेला असेच समीकरण या क्षेत्रात आहे.सध्या ते पुण्याबाहेर जात नाहीत.पण पुण्यातील Tournaments मध्ये सहभागी होतात.ते Tournaments आयोजित करतात.परीक्षक म्हणून काम करतात.यासाठी मुव्हमेंट कार्ड स्वत: तयार करतात.ते जागतिक दर्जाचे असावे म्हणून विशेष अभ्यास करतात.यासाठी त्यांना महिनाभराचा काळ लागतो.हे किचकट काम ते न कंटाळता करतात.प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ते ब्रिज खेळतात. इतर दिवशी रमी खेळतात.हेच खेळ ते ऑनलाईनही खेळतात.हे विस्ताराने लिहायचे कारण पीडी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची ग्रहण क्षमता,आकलन क्षमता,स्मरणशक्ती,जाणीव क्षमता कमी होते असे नाही.

त्यांना फिरण्याची खूप आवड आहे. दरवर्षी एक परदेश पर्यटन, भारतातील एखादे स्थळ दर्शन,पुण्याजवळच फार्महाऊसवर जावून राहणे,गणपती उत्सवासाठी मुळ गाव कारवारला जाणे, Tournaments च्या निमित्ताने गावोगावी जाणे अशी त्यांची विविधांगी भटकंती सुरु असते.बाहेर गेलेल्यावेळी कधीतरी आपल्याला जमणार नाही असे वाटले तर ते हॉटेलवर एकटे राहतात आणि आशाला जाऊ देतात.आशा प्रतिक्रियेत त्यांच्याबद्दल म्हणते,

” Some times I worry about his wellness,but after every problem he rises like a Phoenix.That gives me positivity and stop worrying. ..He is patient but he finds his ways to be happy so our life too runs very smoothly.”

मी या दोघांची पीडीसह वाटचाल जवळून पहिली आहे.पीडीच्या भास,तोल जाणे अशा कारवाया सातत्यने सुरूच असतात.पण आशा खंबीरपणे या कारवायांना परतवायला ढाल बनून उभी असते.पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तिच्यात हा खंबीरपणा आला.आता इतर शुभार्थी शुभंकरांना ती खंबीर बनवत असते.ही प्रक्रिया हळूहळू पण सहजपणे झाली

‘ Let us ask few questions to ourselves ‘ या तिच्या २०१५ च्या स्मरणिकेतील लेखात तिने हे सविस्तर लिहिले आहे. सर्व शुभंकर शुभार्थिनी वाचून अत्मपरीक्षण करावे अशा या लेखाचे फोटो सोबत देत आहे.

अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क