दरवर्षी शुभार्थी रमेश रेवणकर आकाश कंदील स्वत: तयार करतात.यांचा आकाशकंदील तयार झाला.आकाशकंदिलासाठी कागद घराजवळ मिळू शकतात.पण त्यासाठी लागणाऱ्या बांबू काड्यासारख्या इतर साहित्यासाठी मंडईत जावे लागते. दिवाळीत तेथे किती गर्दी असते हे पुणेकरांना माहीतच आहे.रेवणकर एकटे रिक्षानी जाऊन साहित्य आणतात.दर वर्षी वेगळे डिझाईन असते.पार्किन्सन्स शुभार्थी साठी बांबू काड्यांच्या आधारे वेगवेगळ्या नमुन्याचे आकाश कंदील बनवणे हे किचकट वेळखाऊ काम असते.पाठ मान दुखू लागते.यावर्षी त्यांची कंबर आणि मान आधीच दुखत होती. मंडईत जाऊन सामान आणणे शक्य नव्हते.त्यांनी जवळच्याच व्हीनस दुकानातून साहित्य आणून युट्युबवरून पाहून आकाश कंदील केला तो पटकनही झाला.त्यांचे चार वर्षातील आकाश कंदीलांचे फोटो देत आहे.पार्किन्सन्स शुभार्थीनाच नाही तर इतरांनाही यातून प्रेरणा मिळेल.