माझ्याकडे एक खूप वर्षापूर्वी चे जुने तोरण होते ते आता खराब वाटत होते त्यावरील टिकल्या चांगल्या होत्या त्या मी काढून ठेवल्या होत्या तसेच औषधाची रिकामी बाटली जपून ठेवली होती टिकल्या व बाटलीचा वापर मी फुलदाणी करण्यासाठी केला फक्त मला फेवीबाँन्ड ची ट्यूब आणावी लागली टाकाऊतून सुंदर फुलदाणी तयार झाली .
सर्वांना विनंती सुंदर आकाराच्या औषधाच्या टाकून देऊ नका त्याचा असा उपयोग होऊ शकतो या पूर्वी ही मी अशा फुलदाण्या करून मैत्रिणींना दिल्या आहेत हल्ली असे काही करायला वेळ कमी मिळतो आज खूप दिवसांनी मी ही फुलदाणी केली आहे