Sunday, October 6, 2024
Homeकाव्यमंजूषामानवता। (अष्टाक्षरी कविता )

मानवता। (अष्टाक्षरी कविता )

देव नाही, देवळात। आहे तुझ्या ह्रदयात
भुकेल्यास देई अन्न। अपंगाला देई हात
देव नाही देवळात।आहे तुझ्या,जाणिवेत
गरजूंना देई साथ,।संकटा वेळी मदत
देव नाही देवळात। आहे तुझ्या समवेत
तान्हेल्याशी देई जल ।निर्धनाशी समाधान
देव नाही देवळात।आहे तुझ्या सुक्रुतात
बेघराशी देई वास ।मार्ग दावी अंधारात
देव नाही देवळात। आहे तुझ्या विवेकात
अनाथास देई साथ ।आळशास दे उल्हास
देव नाही देवळात ।आहे तुझ्या प्रयत्नात
श्रमाची वाढव शान ।मिळेल तुजसी मान
देव नाही देवळात ।आहे तुझ्या ताकदीत
संकटांशी दोनहात ।जिद्दीने तू कर मात
देव नाही देवळात।आहे तुझ्या आदर्शात
ठेव आचरण शुध्द ।जग निकोप जीवन

सौ. अंजली महाजन पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क