मागच्या गप्पात मी whats app group च्या उपयुक्ततेबद्दल लिहिले होते.यातुन शुभंकर, शुभार्थी सर्वांनाच आत्मविश्वास,प्रेरणा,उर्जा,मेंदूला खुराक,माहिती,आधार,मैत्र असे बरेच काही मिळते.शुभार्थींच्या जगण्याची गुणवत्ता सुधारण्यात याचा नक्कीच उपयोग होतो.
मध्यंतरी इंदूरच्या राधिका करमरकर यांनी लिहिले,
‘घरात मी काठी वाचून चालते, पण बाहेर जाण्याचा कॉन्फिडन्स सध्या तरी नाहीये. तसे ह्या आधी ही काठी घेणे सुरू होऊन मग physiotherapy नी सुटले. पुन्हां physiotherapy सुरु केली आहे. .त्यावर लगेच अनेक प्रतिसाद आले.
रेखा देशमुख म्हणाल्या,
घरात फर्निचर भिंती धरायला असतात.म्हणून शक्य होते.
लगेच राधिका म्हणाल्या,’ हो हे माझ्या लक्षातच आले नाही.’
पुढे रेखाने लिहिले,
*काठी आपला तोल सावरण्यास मदत करते*
*एकटे कुठेही जाऊ शकता*
.काठीच्या फायद्यांकडे पहावे .
न पडल्यानी फ्रॅक्चर्स होत नाहीत .
बिछान्यात झोपुन रहायला लागत नाही.
*गरज असतेच तर काठी केव्हाही वापरणेच चांगले*.
डॉक्टर प्रकाश जावडेकर यांनी लिहिले
*त्यात चुकीच किंवा लाज* वाटुन बिलकुल घेऊ नये.
पुर्वी चक्क 60वर्ष झाल्यावर काही होत नसतांना रूबाबासाठी काठी घ्यायचेच / इग्लिश अमेरीकन लोक आनंदानी घेतात काठी.
रेखाला आपला मुद्दा अजून ठासून पटवायचा होता..
तिने पुन्हा लिहिले.
‘ तुम्ही मी वर लिहिलेल परत 3-4 दा वाचा व यापुढे *काठीला मी आधार देतेय म्हणा हवतर* (ऊलट) पण
ऊसका साथ छोडना नही, साथ निभाना”
काठी बऱ्याचदा मानसिक आधार असते. प्रत्यक्षात काठीचा तोल सावरण्यासाठी उपयोग होतोच असे नाही. पण जर हातात काठी असल्याने आत्मविश्वास वाढत असेल तर जरूर काठी बाळगावी.
काठीचे ओझे वाटू नये.ओझ्यापेक्षा तिची मदत जास्त होते.तिच्याशी मैत्री करणे इष्ट!’
चर्चा चालूच राहिली.राधीकाताईंच्या निमित्ताने काठी घेण्याची लाज वाटणाऱ्या अनेकांना या चर्चेचा उपयोग झाला.खरे तर राधिकाताईंचा मुद्दा लाज वाटणे हा नव्हता.त्या काठी जाईल तेथे विसरतात हा होता.
इथे काठीबाबतचा दुसरा एक मुद्दाही मला निदर्शनास आणायचा आहे. शुभार्थीसाठी काठी वापरायची किंवा नाही यासाठी न्यूरॉलॉजिस्ट,फिजिओथेरपिस्ट यांचाही सल्ला घ्यावा.माझ्या यजमानांच्या बाबत ते पाठीत थोडे वाकल्यावर त्यांना काठी द्यावी असा विचार होता परंतु फिजिओथेरपिस्टने काठी घेऊन चालायला लावल्यावर त्यांनी काठी घेऊ नका सांगितले आता त्यांच्यासाठी आणलेली काठी मी वापरते.काही शुभार्थीना चालताना वेग आवरत नाही आणि ते पळल्यासारखे चालतात. अशा वेळी काठी टेकणे आणि चालणे यांचा मेळ (Coordination ) साधणे शक्य होत नाही आणि पडण्याची भीती राहते.अशी Motor disorderअसणाऱ्या शुभार्थीनी काठी घेणे टाळायला हवे.इतरांसाठी काठी वापरणे चांगलेच.प्रत्येक गोष्टीत ती साधी वाटली तरी तज्ञांचा सल्ला घेणे केंव्हाही चांगले.