Lock down च्या काळात अनेकांचे सुप्त गुण उफाळून आले काहींचे माहित नसलेले गुण समोर आले.व्हाटसअप वर ते व्यक्त होऊ लागले.
शुभंकर रमेश तीळवे हे पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सातत्याने त्यांनी केलेल्या कलाकृती टाकतात फळे, भाज्या, तयार अन्नपदार्थ यातून अप्रतिम कलाकृती तयार करतात. सींडोपाच्या गोळ्यांचे कव्हरही त्यांच्या कलेला सामग्री पुरवते. त्यांनी पत्नीसाठी यापासून दागिने केले. मोर केला आणि तो मोर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरभर फिरवला.
त्यांची पत्नी शुभार्थी आरतींनेही त्यांची री ओढत सिंडोपा च्या गोळ्यांच्या कव्हर पासून रांगोळी काढली. या क्रिएटिव्हीटी ची लागण अनेक जणांना झाली.
शुभार्थी गीता पुरंदरे त्यांच्या बागेतल्या फुलांच्या विविध कलाकृती टाकू लागल्या. सुरुवातीला रांगोळी स्वरूपाच्या कलाकृतीपासून सुरू झालेली क्रिएटिवीटी नंतर गणपती, देवी, कृष्ण, तबला, सायकल,फ्राक अशा विविध स्वरूपात प्रगट होऊ लागली.
नुकतीच डीबीएस सर्जरी झालेल्या मीनल दशपुत्रने प्रेरणा घेऊन रांगोळी काढली.गणपतींचे स्केचेस काढले.
शुभार्थी ज्योती पाटणकर यांनी तोरण टाकले.
शुभार्थी विजया प्रभुनी हाताने भरतकाम केलेला रूमाल टाकला
मध्यंतरी व्हाट्सअप वर ‘ माझ्या पत्नीने मला कणिक मळायला सांगितली तर मी हे केले’ असे म्हणत एख कणकेची कवटी फिरत होती. तीळवेंना ते लगेच जमले पण त्यांनी कवटी न टाकता सुंदर तरुणी तयार करून टाकली.नंतर त्यांच्या कणिक शिल्पांच्या विविध कलाकृती येऊ लागल्या. त्याच्यात पक्षी, प्राणी, मासे, टीसेट असे विविध प्रकार चालू झाले. मी त्यांना विचारले,’ इतकी सुंदर शिल्पे करून ती मोडून त्याच्या पोळ्या करणे जिवावर येत असेल ना’ ते म्हणले,
‘मी केल्या पण त्याच्या पोळ्या ! कोणतीही गोष्ट चिरंतन नाही , तिच्या बदलानेच आनंद मिळत राहतो. हा तर अटळ निसर्गनियम आहे, आणि निसर्ग नियमाला अपवाद नसतो’
हे त्यांचे तत्वज्ञान क्षणाक्षणाला त्यांच्या बरोबर असल्याने पत्नीच्या पार्किन्समुळे झालेले बदल त्यांना सहज स्विकारता आले.आपल्या उदाहरणाने इतरांना धडा घालून देता आला.
कलाकृतींचा विषय निघाला तर डॉक्टर प्रकाश जावडेकर यांचे नाव विसरून कसे चालेल. ते सातत्याने त्यांची पेंटिंग्ज टाकत असतात. यात lock down चा काही संबंध नाही. ते कोणत्याही काळात कुठेही असले तरी पेंटिंग्ज करतातच.इतर कलाकृती,बागकाम हे चालू असते.lock down च्या काळात त्यांनी स्वतःचा एक पोछा करतानाचा फोटो टाकला. आणि त्याच्या खाली कॅप्शन दिली ‘काम हाच कामाचा गुरू’ परिस्थितीशी कसे ऍडजेस्ट व्हावे हे त्यांच्याकडून शिकावे.Banket काम करणाऱ्या शुभार्थी मोहन पोटेंनी खाद्यपदार्थांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली त्यांनी एकदा शेवयांचा फोटो टाकला आणि या नीट करण्यासाठी काय करायला हवे असा प्रश्न विचारला.
अरुण सुर्वे हे कोणी काही केलं की त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे विविध फोटो घेऊन व्हिडिओ करू लागले.
शुभार्थी उमेश सलगर आणि त्यांच्या विविध ऍक्टिव्हिटी यांच्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल.तो पुढच्या गप्पात.
पार्किन्सन्स विषयक गप्पा – ५६ – शोभनाताई
RELATED ARTICLES