“खरंच ह्या स्व मदत गटात सामील झाल्या पासून पार्किन्सन्स आजाराकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला लागले आणि ह्या आजाराला स्विकारायला शिकले.”
शुभंकर सुजाता फणसळकर यांनी फेसबुक वरील माझा एक लेख वरील प्रतिसादासह शेअर केला.ते पाहून आपण करतोय ते काम योग्य ट्रॅकवर आहे असे वाटले. याशिवाय lock down जाहीर झाल्यावर आमचे शुभंकर, शुभार्थी कोणतीच कुरकुर न करता आनंदी कसे याचा उलगडाही झाला. जेव्हा पार्किन्सन कडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा तो फक्त पार्किन्सन्स पुरताच राहत नाही तर एकुण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आलेल्या कोणत्याही प्रसंगाचा बिनशर्त स्वीकार करण्याची मनाची भक्कम तयारी होते. सविता ढमढेरे, अंजली महाजन, आशा रेवणकर, सरोजिनी कुर्तकोटी या सख्यांनी मंडळाच्या सभासदांना फोन केले त्यावेळी कोणत्याच शुभंकर, शुभार्थींची लॉक डाऊन झाले आता काय करायचे अशी भाषा नव्हती. उलट सर्व नेहमीसारखेच आनंदी होते. या अनुभवांनी माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळाली. खरेतर कामवाल्या नसल्याने घरची कामे करून शुभार्थीकडे पाहून असे फोन वगैरेचे काम हातात घेणे म्हणजे लष्करच्या भाकर्या भाजणे. पण या सर्वांनी ते केले.
आणि ग्रुपवर सविस्तर माहितीही दिली.
‘एरवी सभेच्यावेळी बोलायला वेळ नसतो फोनवर प्रत्येकजण मनमोकळ्या गप्पा मारत होते.
हा देखील एक सुंदर अनुभव घेतला मी.’असे आशांनी सांगितले.
सविता म्हणाली, कुणाचीही तक्रार नाही , कुरकुर नाही. बोलून बरे वाटले असेच सर्व म्हणत होते.
अंजली आपल्या बोलण्याने सकारात्मकता पोचविणारी.पण फोनवर बोलतांना आलेल्या प्रतिक्रियांनी तिचं चार्ज
झाली.
सरोजिनी कुर्तकोटीने तर सुंदर अक्षरात आपल्याला आलेले अनुभव लिहून त्याचा फोटो काढून पाठवला
डॉक्टर शरद खरे यांचा अनुभव त्यांना विस्ताराने सांगावासा वाटला. त्यांच्यासाठी तो आनंददायी अनुभव होता. निराशेचा मागमूस नसलेल्या सकारात्मक आनंदी व कृतार्थ अशा त्यांच्या अनुभवाने त्या भारावून गेल्या होत्या. त्यांच्या लिखित अनुभवाचा फोटो दिल्याने येथे विस्ताराने लिहीत नाही परंतु ‘त्यांचा हा उत्साह माझ्या फोन मधून संक्रमित न होता तरच नवल’ ही त्यांची भावना महत्वाची वाटली सुरुवातीचा सुजाताताताईंचा
अनुभव असो किंवा सरोजनीताईंचा
अनुभव असो, स्वमदत गटाची गरज आणि महत्त्व अधोरेखित करणारे असेच आहेत.
आता पुढच्या गप्पातून असे शुभंकर,शुभार्थींचे विविध अनुभव देत आहे.
पार्किन्सन्सविषयक गप्पा – ५५ – शोभनाताई
RELATED ARTICLES