ठाण्याच्या विभावरी सहस्त्रबुद्धेचा फोन आला, ‘माझी आई शैलजा जोगळेकरचे नाव तुमच्या whats app group ला add करता का?’ मी लगेचच ते केले.तिच्या या मेसेजमुळे मीच खुश झाले होते.यापूर्वी ती ग्रुपवर आली होती. आणि रमली होती.ओंनलाईन मिटिंगही तिने जॉईन केल्या होत्या.ती ठाण्याला आई पुण्याला. दुसरी बहिण रोह्याला. पार्किन्सन्स झालेल्या वडिलांचे प्राब्लेम वाढत होते. तिला काळजी वाटत होती.आणि आपण तेथे नाही ही अगतिकताही.
तिचे आणि तिच्या आईचे फोनवर बोलणे ऐकल्यावर कोरोनामुळे कोठे जाणेयेणे नाही त्यामुळे ते कंटाळले आहेत, मानसिक समस्याच जास्त आहे असे मला वाटले. मी ऑनलाईन डान्स,व्हिडिओ कॉन्फरन्स इ.ची माहिती सांगितली.ती ग्रुपवर आली. प्रतिक्रिया देवू लागली.आणि पुण्याला मधून मधून जात असते तेंव्हा आईला दाखवीन म्हणाली. आईकडे स्मार्ट फोन नव्हता.आणि आईला तो वापरताही येत नव्हता.मी तिला सुचविले आपण औषधोपचारावर खूप खर्च करतो.तर तू तिला स्मार्टफोन घेऊन दे.आईबाबा ग्रुपवर आल्यावर इतरांच्या कलाकृती, कविता. सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मोटीवेट होतील. स्मार्टफोन हे त्यांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठीचे औषध आहे असे समज.ती स्वत: ग्रुपवर आल्यावर तिला हे पटले.
शैलजाताई मार्च मधील सभेला नर्मदा हॉलमध्ये प्रथमच एकट्या आल्या होत्या.खूप खुश झाल्या होत्या.पुढच्या वेळेला पतीना घेऊन येणार होत्या पण कोरोन सुरु झाला.लॉकडाऊन झाले आणि सभाच झाल्या नाहीत.काही संपर्कही झाला नाही.त्यांचाच एकदा फोन आला आणि त्यानंतर विभावरी जॉईन झाली.आता तिची आईही जॉईन झाली.विभावरीचा मेसेज आला एखादी लहान गोष्ट आपण करायची राहतो.ती केल्याने किती गोष्टी साधतात.तुम्ही स्मार्ट फोनचे सुचविल्यामुळे मी ते केल हे चांगले झाले..शैलजा ताईंचाही फोन आला.तुमचे कार्यक्रम आम्ही दोघेही एकत्र ऐकतो.त्या भरभरून बोलत होत्या.मलाही छान वाटले. एप्रिल मध्ये आमच्या वैशाली खोपाडेने whats app नसलेल्या सर्वाना फोने केले होते.प्रत्येकाशी भरपूर गप्पा मारल्या त्यांची विचारपूस केली आणि महत्वाचे म्हणजे मंडळाच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली.ती शुभंकर, शुभार्थीच्या प्रतिक्रियामुळे भारावून गेली होती.तिने whats app वर येण्यास आणि ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास सुचविले.तिच्या फोनमुळे जवळजवळ ४० जण सामील झाले.शैलजा ताई आमच्या मेलिंग लिस्ट मध्ये अजून आल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यावेळी पोचलो नव्हतो. whats app सुरु झाल्या पासून पुढची पिढीतील अनेकजण आपणहून सामील झाले आपल्या आत्यासाठी सामील झालेले मयूर श्रीत्रीय तर ग्रुपचे admin ही आहेत.
दोडवाड भावंडे हर्शल देशपांडे,प्रसाद कृष्णापूरकर अशी सक्रीय सहभागी असणार्यांची किती तरी नावे सांगता येतील या तरूण पिढीमुळे ग्रुपमध्ये ताजेपणा असतो. आमच्या पिढीचे लोक स्मार्टफोन घेण्यास राजी नसतात. मला शुभार्थींची मुले,सुना नातवंडे याना विनंती आहे.त्यांनी त्यांच्याच मोबाईलवर कार्यक्रम दाखवावेत.जेष्ठांना स्मार्टफोन वापरण्यास प्रवृत्त करावे.whats app विद्यापीठ माहिती म्हणून whats app बद्दल उपरोधाने बोलले जात असले तरी आम्ही आमच्या ग्रुपचा शुभंकर, शुभार्थीना आधार वाटावा असे वातावरण ठेवले आहे.योग्य माहिती कशी पोचेल यावर लक्ष ठेवले आहे.भ्रामक समजुती पसरवणारे काही आले की त्यावर लगेच कोणीतरी आक्षेप घेतो.अनेकांची प्रतिभा येथे फुलली आहे.मी यावर यापूर्वी लिहिले आहे.कोरोना काळात मंडळाला तगून ठेवण्याचे मोट्ठे काम whats app ने केले आहे.