१ मार्चपासून कोविद लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला.आमच्या whats app group वर लगेच शंका, कुशंका,भीती,शंकांचे निराकरण अशा अनेक पोस्टचा सिलसिला सुरु झाला. या सर्वाबाबत आणि आमच्या अनुभवाबद्दल गप्प्पात सांगणार आहे.आणखी एक महत्वाचे म्हणजे लसीकरणाबद्दल लिखित स्वरुपात ,व्हिडिओ स्वरुपात अनेक पोस्ट येत आहेत.त्यातील काही दिशाभूल करणाऱ्याही असतात. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये.लेखासोबत लसीकरणाबद्दल सर्व तर्हेच्या शंकांचे शास्त्रशुद्ध निराकरण करणारा दिनानाथ हॉस्पिटलचा डॉक्टर धनंजय केळकर यांचा उत्तम व्हिडीओ आहे.त्याची लिंक देत आहे तो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी जरूर ऐकावा लहान वयातले काही शुभार्थी वगळता सर्व पार्किन्सन्स शुभार्थी या टप्प्यात येतात.पार्किन्सन्स हा आजार रक्तदाब,मधुमेह इत्यादी अजाराप्रमाणे कोविदासाठी धोकादायक आजारात येत नसल्याने ४५ वर्षावारचे पीडी पेशंट या टप्प्यात येत नाहीत.आमच्या अनेक शुभंकर शुभार्थीचे vaccination झाले.
औरंगाबादच्या आरती तिळवे आणि डोंबिवलीच्या डॉ.विद्याताई जोशी यांचे vaccination यशस्वीरीत्या पार झाले काहीच त्रास झाला नाही असे पहिले प्रतिसाद आले.त्यानंतर गिजरे पती पत्नी,शीलाताई पागे,श्रद्धा भावे,ज्ञानदा चिटणीस,रेवणकर पती पत्नी यांचे यशस्वीरीत्या vaccination झाल्याचे आणि काही त्रास झाला नाही असे मेसेज आले. सर्व कडे प्रोसिजर सारखे असले तरी काही लोकल फरक असू शकतो.पार्किन्सनन्स आजाराचे प्रमाणपत्र कोणालाच मागितले नाही पण बेळगावच्या आशा नाडकर्णी यांना प्रमाणपत्र मागितले. त्यामुळे सर्व चौकशी करूनच लसीकरण केन्द्रावर जावे. रजिस्ट्रेशन करताना समस्या येते असे काहींनी सांगितले. आमचे नेहमीचे उत्साही सभासद प्रसाद कृष्णापुरकर,हर्षल देशपांडे यांनी लगेच app कसे वापरायचे दाखवणारा व्हिडीओ टाकला. रमेश तिळवे यांनी शंकानिरसन करणारा व्हिडीओ टाकला.आमचा whats app group चा शंकानिरसनासाठी शुभंकर शुभार्थीना नेहमीच आधार वाटतो. इतक्या सर्वांचे प्रतिसाद पाहूनही प्रज्ञा जोशीचा मला फोन आला काकू आमचा दोघांचा सुतार दवाखान्यात ११/१२ नंबर आलाय पण मला खूप भीती वाटते.मी तिला समजावले.लसीकरण झाल्यावर मात्र तिचा काहीच त्रास न झाल्याचा आणि सेंटरवरही कोणाला त्रास झाल्याचे दिसले नाही असा मेसेज आला. आमचा दोघांचाही लसीकरणाचा अनुभव चांगला होता.
प्रथम आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात बराच वेळ घालवला.नंबर लागत नव्हता. आमच्या आजूबाजूच्या बऱ्याच जणांनी थेट सरकारी दवाखान्यात जावून नंबर लावला.रजिस्ट्रेशन करण्याची गरज लागली नाही.आम्हीही हाच मार्ग अनुसरला. आमच्या जवळ असलेल्या आंबेडकर हॉस्पिटलमध्ये जावून आम्ही नंबर लावला.आधारकार्ड बरोबर न्यावे लागले.नंतर अर्धा तास बसावे लागते तो वेळ धरून आम्ही दोन तासात घरी आलो.रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घेता का असे विचारले.आम्ही हो म्हणताच मग काही दिवस बंद केल्या होत्या का असे विचारल्यावर आम्ही नाही सांगितले..त्यांनी डॉक्टरना बोलावले. डॉक्टरनी लस द्यावयास हरकत नाही असे सांगितले.आणि एकदाचे आमचे लसीकरण झाले.हीच शंका ग्रुपवर विचारली गेली होती.डॉक्टर केळकर यांच्या व्हिडिओ मध्ये रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या बंद करायची गरज नाही असे स्पष्ट सांगितले आहे.
आम्हाला दोघांना काही त्रास झाला नाही म्हणून आम्ही खुश होतो.पण रात्री १२ वाजता ह्यांना ताप आला १०० पर्यंत होता.आम्ही ताप येण्याची शक्यता गृहीत धरून क्रोसिनच्या गोळ्या आणून ठेवल्याच होत्या.एक गोली घ्यावी लागली. नंतर पुन्हा ताप आला नाही.पीडी पेशंटबाबत इतर काही झाले तरी पार्किन्सन्स थोडासा तात्पुरता वाढतो.ताप आला की ह्यांना अजिबात हालचाल करता येत नाही आणि ताप उतरला की लगेच नेहमीसारखी हालचाल चालू होते.ह्यांना ताप क्वचितच येतो. कोविदाच्यावेळी तापाने त्यांची हालचाल बंद झाली तेंव्हा मला वाटले होते आता आता हे असेच राहील.पण तसे नव्हते.त्यामुळे आता लसिकरणामुळे ताप आला आणि हालचालीवर परिणाम झाला तरी घाबरून जाऊ नये. लसीकरण घेतलेल्या पार्किन्सन्स पेशंटमध्ये ताप येणारे फक्त एकटेच होते हे ही लक्षात घेऊन न घाबरता लासिकरणास सामोरे जावे.