कोजागिरी निमित्त नीलिमा बोरवणकर यांचे सत्र झाले.त्यांनी मान्यवरांच्या मुलाखती दरम्यान घडलेले किस्से सांगून श्रोत्यांचे रंजन केले.या प्रसंगी शुभार्थी नारायण फडणीस सर यांनी स्वागतपर गीत आणि समारोप गीत सादर केले.डॉ. शोभना तीर्थळी यांनी प्रास्ताविक केले.अंजली महाजन यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि सूत्र संचालन केले.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि मसाला दुध यांचा आस्वाद सर्वांनी घेतला.हा कार्यक्रम झूमवरून लाइव्ह दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.यासाठी अतुल ठाकूर,गिरीश आणि शिरीष कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.