मी 2 डिसेंबर ला पडल्याने उजवा हात प्लॅस्टर मध्ये आता डाव्या हाताने कामे कशी करायची मला मोठा प्रश्न पडला पण मी क्षणभरात विचार केला डावा कान डावाडोला डावा गाल डावा खांदा डावा पाय वरचा ओठ खालचा ओठ वरचे दात खालचे दात असा फरक आपण करीत नाही मग उजवा हात शुभ त्या हातानेच कामे चांगली होतात अशी आपली भ्रामक कल्पना मी मनातूनच काढून टाकली आणि 5डिसेंबर पासून सर्वाधिक कामे मी डाव्या हातांनी करु लागली सुरवातीला माझे अक्षर डाव्या हाताने पाहिलेल्या मुला सारखे आले माझे वलरण नसलेले अक्षर बघून मी खूप हसले आता जरा सुधारणा झाली आहे खालीलनोंददी मी डाव्या हातांनी केल्या कॅलेंडरमध्ये
तेल डबा सुरू केला
गॅस सिलिंडर किचनमध्ये लावले
गॅसगिझर सिलेंडर लावले
दूध एक लिटर जादा घेतले
आशा प्रकारे लेखन चालू आहे या शिवाय इतर ही साधी कामेही डाव्या हाताने करून उजव्या हाताला विश्रांती देत आहे हातफ्रॅक्चर नंतर एक निश्चित शिकले डावा उजवा असा भेदभाव कधीच कोणी करु नये ईश्वराने फार सुंदर अशा अवयवांचे दान आपल्याला दिले आहे
हा माझा पहिलाच फ्रॅक्चर चा अनुभव मी डाव्या हातांनी टाईप केला आहे
माझे फ्रॅक्चर मधील दिवस – अंजली महाजन
RELATED ARTICLES