तुझी मखमली सय
हीना अत्तराचा फाया
स्मरते ते तुझे रूप
मूर्त सौजन्याची काया
तुझा मुलायम स्पर्श
त्यात ओतलेली माया
जशी प्रखर दुपारी
दाट वृक्षाची गं छाया
किती सरले उन्हाळे
वय लागले सराया
तुझ्याविना भासे आई
मिथ्या जगाची किमया
आज म्हणे मातृदिन
आईलागी गं स्मराया
जिचा विसर तो नाही
याद तिलाच कराया !!
–डाॅ.क्षमा वळसंगकर
10-5-2020,मातृदिन