Sunday, October 6, 2024
Homeवृत्तांत१० ऑगस्ट २०१७ सभा वृत्तांत - डॉ. सौ. शोभना तीर्थळी

१० ऑगस्ट २०१७ सभा वृत्तांत – डॉ. सौ. शोभना तीर्थळी

गुरुवार १० ऑगस्ट २०१७ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने हॉटेल अश्विनी येथे सभा आयोजित केली होती.डॉक्टर अमित करकरे यांनी ‘ केअर ऑफ केअरटेकर ‘ या विषयावर व्याख्यान दिले.सभा आयोजित करताना नेहमीच शुभार्थिंचा विचार केला जातो यापूर्वी एकदाच शुभंकरांच्या प्रश्नावर शेअरिंग झाले होते.आणि सिप्ला तर्फे दिवसभराचे ‘केअरटेकर वर्कशॉप’ आयोजित केले होते.या वेळी हा विषय डॉक्टर करकरे यांनीच सुचविला.

प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.श्यामला शेंडे यांनी डॉक्टर करकरे यांची ओळख करून दिली आणि सभेची सूत्रे त्यांच्याकडे दिली.आधी व्याख्यान आणि नंतर प्रश्नोत्तरे या ऐवजी शुभंकरांनी आपले अनुभव आधी सांगावे असे डॉक्टरांनी सुचविले.

दीपा होनप यांनी आपल्या वडिलांना पीडी झाल्यावर केअरटेकर असलेल्या आईबद्द्ल आलेले अनुभव सांगितले. सोशल असलेल्या आईने आपले सामजिक विश्व थोपवून १३ वर्षे पूर्णपणे पतीच्या सेवेला वाहून घेतले.असे न करण्यास आजूबाजूच्या सर्वांनी सांगूनही ऐकले नाही. त्यांना खाल्लेले काहीच न पचता लूज मोशनचा त्रास सुरु झाला.अनेक तपासण्यानंतर याचे कारण मानसिक ताण असे निघाले शुभंकराने स्वत:ची आणि इतरांनी शुभंकराची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आशा रेवणकर यांना पतीचा इगो हा त्रासदायक वाटतो.यावर मात करून स्वत:ची काळजी घेत शुभार्थीची काळजी घेणे आपल्याला कसे जमणार याची चिंता त्यांना वाटत होती.स्वत:ला विविध कामात गुंतवून,हळुवारपणे पतीला हाताळून त्यांनी यातून मार्ग काढला.तरी पूर्णपणे तणावमुक्त होता येत नसल्याचे सांगितले.

शोभना तीर्थळी यांना इतर शुभंकरांचे फोन येतात. त्यातून इगो हा प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवले..आजाराबद्द्लचे अज्ञान,त्यामुळे वाटणारी भीती,काळजी आणि मन मोकळे करण्यासाठी योग्य व्यक्तीची गरज या समस्या जाणवत असल्याचे सांगितले.

रामचंद्र करमरकर यांनी Cipla cancer center तर्फे शुभंकरांसाठी झालेल्या कार्यशाळेची आठवण सांगितली.अशा तऱ्हेचा कोर्स पार्किन्सन्स मित्रमंडळाने करावा असे सुचविले.

डॉक्टर करकरे यांनी ही सूचना उचलून धरत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.पिडीचे निदान झाल्यापासूनच शुभंकरांच्या समस्यांना सुरुवात होते.धक्का, अस्वीकार,आपल्याला हे झेपेल का? हा विचार अशी नकारात्मकतेची शृंखलाच सुरु होते.शुभंकरांनीही पुढील आयुष्यासाठी काही बेत ठरवलेले असतात ते आता प्रत्यक्षात येणार नाहीत याची चिडचिड,आपल्याला असे वाटते याबद्दलची अपराधीपणाची भावनाही निर्माण होते.शुभार्थीच्या मुळ स्वभावातले काही दोष अशावेळी उफाळून येतात.त्यामुळे चिडचिड होते.या सर्वातून उत्तरे मिळण्यापेक्षा आणखी प्रश्न निर्माण होतात त्यामुळे बिनशर्त स्वीकार महत्वाचा ठरतो.बिनशर्त स्वीकार म्हणजे शरणागती नव्हे.

इतर सर्वांचे लक्ष शुभार्थीकडे असते.शुभंकरांच्या मनाची अवस्था कोणाच्या लक्षात येत नाही.पण कोणी विचारेल म्हणून न थांबता स्वत:च कोणाशी तरी बोला.यातून समस्या निराकरणाचा मार्ग मिळू शकतो.सर्वांनी मिळून ऐनवेळी पडणे,चक्कर येणे अशा काही गोष्टी घडल्यास काय निर्णय घ्यायचा याबद्दलचा तक्ता केल्याने ,विविध फोन नंबर लिहून ठेवल्याने अज्ञाताबद्द्लची भीती, काळजी कमी होण्यास मदत होते.

शुभार्थी प्रमाणेच बहुसंख्य शुभंकरही वयोवृद्ध असतात. त्यांचेही काही आजार असतात.अनेक प्रसंगी दोघांचीही चिडचिड होते. अशावेळी रागावर नियंत्रण, रागाचे व्यवस्थापन महत्वाचे ठरते.बऱ्याचवेळा राग परिस्थितीवर असतो.कृती मुद्दाम केली आहे का?हेतू त्रास द्यायचा होता का? असा विचार केल्यास रागावर नियंत्रण सोपे होते.शुभार्थिनीही शुभंकरांची चिडचिड समजून घेतली पाहिजे.

भास ही पीडी शुभार्थीबाबत मोठ्ठी समस्या असते.यासाठी डोस ठरविण्याचे आणि कशामुळे भास होतात हे ठरविण्याचे काम न्यूरॉलॉजीस्टचे असते.औषधांचा परिणाम हवा, तसा दुष्परिणामही स्वीकारावा लागतो. भास होतात तेंव्हा शुभार्थी वेगळ्याच विश्वात असतात.त्यांच्या विश्वात जाऊन त्यांच्याशी वर्तन केल्यास शुभार्थीला हाताळणे सोपे जाते. हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

शुभंकर एकटाच सर्व गोष्टी हाताळू शकत नाही.जे हाताळणे शक्य नाही. त्यासाठी न लाजता,इगो न करता मदत घ्यावी.काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोपवाव्या. स्वत:ची होणारी चिडचिड,भीती,अपराधीपणाची भावना या सर्वामुळे होणारी घुसमट, यातून मन:शांती ढळते. यासाठी आपले मन कोणाशीतरी मोकळे करावे.

समजून घ्यायला सोप्या,कोणताही दुष्परिणाम न होणाऱ्या ३८ पुष्पौषधीपैकी काही यासाठी उपयोगी पडतात.

जबाबदारीचे ओझे वाटत असल्यास – एल्म

विशिष्ट भितीसाठी – मिम्युलस

काळजीसाठी -रेडचेस्टनट

अनामिक भितीसाठी – अस्पेन

स्वत:वर नियंत्रणासाठी – चेरीप्लम इत्यादी.

पुढच्या सभेपर्यंत अशा औषधांची यादी आणि ती कशी घ्यावयाची ही माहिती छापील स्वरुपात देण्याचे डॉक्टरांनी कबुल केले.

यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.डॉक्टरांनी दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास अधिक दिला.पुन्हा येण्याचे कबूल करून डॉक्टरांनी रजा घेतली.

शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.शुभंकर असणे यशस्वीपणे हाताळलेले आणि आम्हा सर्वांचेच शुभंकर असणाऱ्या शरच्चंद्र पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.

रामचंद्र करमरकर यांनी संस्था रजिस्टर झाल्याचे जाहीर केले. आणि समारंभ संपला.

शुभार्थी अश्विनी दोडवाड यांनी वाढदिवसानिमित्त उपमा आणि जिलबी दिली.अश्विनीताईनी स्वत: उपमा बनवला होता.रत्नाकर मोघे यांनी चहा दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क