सौ शुभदा गिजरे (१५ वर्षांपासून शुभार्थी, सध्या वय ७१ वर्ष) व मी विलास गिजरे (शुभंकर) पार्किन्सन्स मित्रमंडळाशी बरेच वर्षांपासून संबंधित आहोत.
सर्व प्रथम या उपक्रमाशी संलग्न सर्वांचे आम्ही खूप आभारी आहोत.
या विषयावर सुरवातीला माहितीचा जवळपास संपूर्ण अभाव होता. माहिती नसल्याने मनात गोंधळ व काय करावं याची समज नव्हती. सुरवातीला मंडळात अन्य सम रूग्ण वेगवेगळ्या अवस्थेत पाहून मन अधिक अधिक बेचैन व सैरभैर झाले.
परंतु माहिती, अनुभवांची देवाणघेवाण, तज्ञांचे मार्गदर्शन, पारकिनसन्स आटोक्यात ठेवण्यासाठी विविध प्रकारचे उपाय व मार्ग, व्यायाम प्रकार, उत्साही व कार्यरत राहाणेची प्रेरणा इ अनेक पर्याय समोर येत गेले. त्यानंतर मासिक व वार्षिक कार्यक्रम, पुस्तके, अहवाल, वॉटस अप ग्रूप व वेबसाईट यामुळे संपर्क व माहिती इ. चा वेग वाढला. या सर्व गोष्टींमुळे आधार मिळाला व या लढाईस सामोरे जाण्यास धीर,मार्ग व दिशा सापडण्यास खूप मदत झाली.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या या सर्व प्रवासाचा अभिमान आहेच व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!