सैलानी परिवार, सांगवी यांच्याकडून देणगी.
सैलानी परिवार, सांगवीच्या अरविंद काशिनाथ भागवतआणि सहकारी यांच्यामार्फत ३ मार्च या त्यांचे गुरु सैलानी यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था निवडून सत्कार केला जातो व देणगी दिली जाते.यावर्षी नाम,स्नेहालय,कामायनी इत्यादी संस्थांबरोबर पार्किन्सन्स मित्रमंडळाचीही निवड केली होती.शरच्चंद्र पटवर्धन,आशा रेवणकर आणि अंजली महाजन यांनी या कार्यक्रमास हजर राहून हा सत्कार स्वीकारला.यावेळी सत्काराबरोबर १११११ रुपयांची देणगी दिली गेली.शुभंकर अंजली महाजन यांनी’ रंगतरंग ‘या दिवाळी अंकात मंडळाची माहिती देणारा लेख दिला होता.तो वाचून ही निवड करण्यात आली.
गुरुवार दि.१० मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने अश्विनी हॉटेल येथे सभा आयोजित केली होती. सभेस ८० सदस्य उपस्थित होते.
प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
डॉक्टर संजीव डोळे आणि भारती विद्यापीठाच्या होमिओपॅथी विभागाच्या प्रमुख प्रो.डॉक्टर अनिता पाटील, त्यांचे सहकारी आणि एमडी करणारे डॉक्टर यांचे स्वागत करण्यात आले.
पार्किन्सन्स आणि होमिओपॅथी उपचार ‘या विषयावर भारती विद्यापीठाने संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.ज्या पार्किन्सन्स शुभार्थीना या संशोधनात स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे त्यांना त्यांच्या आजाराची चिकित्सा करून वर्षभर मोफत औषधे दिली जाणार आहेत.
डॉक्टर डोळे यांनी सुरुवातीला या संशोधनाचे स्वरूप आणि उद्दिष्टे सांगितली. होमिओपॅथीमध्ये’ व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे मानले जाते.पार्किन्सन्स पेशंटच्या बाबतीतही प्रत्येकाची समस्या वेगळी असेल.या संशोधनात एमडी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरकडे एक किंवा दोन पेशंट असतील.वर्षभर ते त्या पेशंटचा फालोअप घेतील.पेशंटना सोयीच्या ठिकाणी तपासले जाईल. बदल पाहण्यासाठी व्हिडीओ शुटींग घेतले जाईल.या सर्वांना डॉक्टर डोळे मार्गदर्शन करतील.औषधेही डॉक्टर डोळे ठरवतील.निघालेले निष्कर्ष प्रकाशित केले जातील.
प्रो.डॉक्टर अनिता पाटील यांनी संशोधन करणारी भारती विद्यापीठ ही संस्था ५० वर्षाचा इतिहास असलेली असून .होमिओपॅथी कॉलेजला २५ वर्षे झाली असल्याचे सांगितले.सोमवार ते शुक्रवार संस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे खेडोपाडी जाऊन मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते असेही सांगितले.हे संशोधनही अशा सामजिक जाणीवेतून केले जात आहे.ही औषधे इतर औषधे चालू असताना घेता येतील.निरोगी माणसांवर प्रयोग करून ती तपासली असल्याने याचे दुष्परिणाम नाहीत.अॅलर्जी नाही.आपल्या न्युरॉलॉजिस्टना याबाबत सांगावे.गरज वाटल्यास डॉक्टर डोळेही त्यांच्याशी संवाद साधतील.डॉ.डोळे यांनी नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय परिषदेत पार्किन्सन्सवर रिसर्च पेपर सदर केला होता त्याचा बेस्ट पेपर म्हणून गौरव झाल्याचेही डॉ.पाटील यांनी सांगितले.
डॉक्टर राजश्री बोंगाळे यांनी आपल्या पीडी पेशंट वडिलांचे अनुभव सांगितले.
शुभार्थी शेखर बर्वे यांनी वसुधा बर्वे यांना २०१२ पासून न्युरॉलॉजिस्ट डॉ.दिवटे यांना विचारून डॉ.डोळे यांचे होमिओपॅथी उपचार चालू केले.आजाराची वाढ झाली नाही. अॅलोपॅथीची औषधे वाढली नाहीत.स्मरणशक्ती चांगली राहिली असे फायदे झाल्याचे सांगितले शंका.मनात न ठेवता विश्वासाने औषधे घ्या असा सल्लाही दिला.दिनेश पुजारी आणि श्री. चौगुले या शुभार्थीनीही आपल्याला होमिओपॅथी औषधाने फायदा झाला असल्याचे सांगितले.
डॉक्टर डोळे यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.गोळ्या गोड असल्याने डायबेटीस पेशंटना त्रासाचे होते हा गैरसमज आहे.याला पथ्यपाणी नाही. काहीच औषधांच्या बाबतीत कांदा आणि कॉफी वर्ज्य करावे लागते.आमची औषधे प्रयोगाने सिद्ध झालेली असल्याने तुम्ही गिनिपिग आहात असा विचार करू नका असे सांगितले.उपचारात आजार वाढू नये,कदाचीत औषधाचे प्रमाण कमी होईल,मानसिक स्वास्थ्य,सर्वसाधारण तब्येत चांगली राहिल्याने आजार बळावणार नाही.हे फायदे होतील.
इच्छ्युक पेशंटनी आपले सर्व रिपोर्ट,चालू असलेल्या गोळ्या प्रथम भेटीत दाखवाव्या.असे डॉ.पाटील यांनी सांगितले.
अनेक शुभार्थीनी संशोधनात सहभागी होण्यासाठी नवे नोंदविली.
चहा बिस्किटांचा खर्च वाढदिवसानिमित्त शरच्चंद्र पटवर्धन यांनी केला.उषा काळे यांनी पेढे दिले
– डॉ. शोभना तीर्थळी