Wednesday, October 2, 2024
Homeअभिनंदनभाषातज्ञ डॉ अविनाश बिनीवाले हार्दिक अभिनंदन!

भाषातज्ञ डॉ अविनाश बिनीवाले हार्दिक अभिनंदन!

भाषातज्ञ डॉ अविनाश बिनीवाले, आपल्याला मुंबई विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन गौरविले आहे. त्या निमित्ताने पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे आपले हार्दिक अभिनंदन.

डॉ. बिनीवाले यांनी आतापर्यंत कोशकार्यात मूलभूत आणि महत्त्वपूर्ण असे प्रचंड कार्य केलेले आहे. मराठीच्या आणि जर्मनच्या दृष्टीने अपूर्व असलेला जगातला पहिलाच मराठी-जर्मन शब्दकोश त्यांनी लिहिला आहे. या शब्दकोशाच्या निर्मितीसाठीच प्रा. बिनीवाले यांना डी. लिट्. पदवी देण्यात आली आहे.

डॉ अविनाश बिनीवाले यांच्याकडे भाषाशास्त्रीय दृष्टिकोन आहे, भाषेबद्दल कमालीची आस्था आहे आणि अभ्यासाची शास्त्रीय चौकट आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, सिंधी, गुजराती, बंगाली, आसामी या भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी, जर्मन, रशियन, फ्रेंच या युरोपीय भाषांचे अभ्यासक असलेल्या बिनीवाले यांनी या भाषांतील शब्दकोशासाठी केलेले काम मोठे आहे. वयाची सत्तरी उलटल्यानंतरही तितक्याच उत्साहाने ते कार्यरत असून, त्याद्वारे त्यांनी भाषेच्या अभ्यासकांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.

बिनीवाले यांचा जन्म १२ मार्च १९४३चा. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत आणि जर्मन या भाषांतून पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्मन आणि भाषा विज्ञान या विषयांतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ३५ वर्षे त्यांनी जर्मन भाषेचे अध्यापन केले. याखेरीज औद्योगिक भाषांतरकार, दुभाषी म्हणूनही त्यांनी काम केले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात त्यांनी रशियन भाषेचे अध्यापन केले.

अध्यापनाच्या जोडीने त्यांनी ग्रंथलेखनही केले. ‘जर्मन भाषा परिचय’, ‘भाषा- आपली सर्वांचीच’, ‘भाषाकारण’, ‘भाषा घडताना’, ‘जर्मन भाषेतील साहित्य’, ‘नावडतं व्याकरण होईल आवडतं’, ‘सोपे व्याकरण’ ही त्यांची भाषाविषयक पुस्तके. ‘जर्मन शिकू या’, ‘जर्मन शिका’, फ्रेंच भाषेचा श्रीगणेशा’, ‘मराठी-जर्मन व्यवहारोपयोगी शब्दकोश’, हिंदी-मराठी शब्दकोश’, ‘जर्मन-मराठी भाषांतरकोश’ ही त्यांची भाषा शिक्षणाची, तसेच शब्दकोशाची पुस्तके. त्यांच्या बहुतेक पुस्तकांची हिंदी, कन्नड, आसामी या भाषांत अनुवादही झाला आहे. ‘बोमदिला’ ही त्यांची कादंबरी हिंदी, कन्नड, आसामी, गुजराती आणि संस्कृत या भाषांत अनुवादित झाली आहे. ‘गरुडांच्या देशात’, ‘पूर्वांचल’, ‘महाराष्ट्राबाहेरची न्याहारी’ ही त्यांची प्रवासवर्णने.

खालील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे —
“भाषा आपली सर्वांचीच” साठी “कोमसाप”चा पुरस्कार (२००१)
“जय कैलाश” कादंबरीसाठी हिन्दी साहित्य अकादमीचा पुरस्कार (२०१४)
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ’डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक’ पुरस्कार (२०१८)

भाषा आणि साहित्याच्या प्रांतात लीलया संचार करणारे बिनीवाले आजही देशभर भ्रमंती करत असतात. बिनीवाले सर, पार्किन्सन्स मित्रमंडळातील प्रत्येक सदस्याला तुमचा अभिमान आहे. तुमचे कार्य प्रेरणादायी आहे.
(सर्व माहिती इंटरनेटवरुन)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क