Thursday, November 7, 2024
Homeये हृदयीचे ते हृदयीज्येष्ठांच्या समस्यांवर बोलू काही – ये हृदयीचे ते हृदयी – ८...

ज्येष्ठांच्या समस्यांवर बोलू काही – ये हृदयीचे ते हृदयी – ८ – अंजली महाजन

आता तुम्हाला एका कुटुंबातील एक‌ प्रसंग ‌मला आठवला‌ म्हणून सांगते , सुनबाई भाजी घेऊन घरी‌ येतात‌ ,तेव्हा घरातील पसारा पाहून म्हणतात “एका जागी शांत बसायचे सोडून उगाचच लुडबुड करण्याची मामु़जींची सवय‌ अजून ही गेलेली नाही.हे स्टूल इकडे ठेव,ते टेबल भिंतीला ठेव,ती खुर्ची तिकडे सरकव‌,हे पुस्तक काढ,जुनी वर्तमानपत्र काढ,उगाचच वस्तूंची हालवाहालव करायची , काही काम नाही धाम नाही ,दिलेल्या खोलीत स्वस्थ बसायचे तर ते राहिले बाजूला “

८० वर्षांच्या सासऱ्यांच्या कानावर ‌ सूनबाईंचे हे शब्द पडले आणि त्या क्षणी सासरे बुवांचे विचार चक्र सुरू झाले.” खरचं‌ का आपण आपल्या घरातील माणसांना अडगळ झालोय ? आता आपण इतके निकामी झालो आहोत का ? आपल्याला सूनबाई एका खोलीत स्वस्थ बसायला ‌सांगत आहेत.त्यांना आता घरामध्ये आपला हस्तक्षेप नको आहे असं वाटतंय. सूनबाईंच्या बोलण्याने सासरे बुवांच्या मनाला वेदना झाल्या .”आपण जीवापाड मेहनत करून उभारलेल्या घरातच आपले काही च अस्तित्व नाही का असे त्यांना वाटू लागले .

आता मी मूळ विषयाकडे वळते

नानाविध औषधोपचार, नानाविध शस्त्रक्रिया,यांचा शोध लागल्यामुळे मनुष्याचे आर्युमान दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे ज्येष्ठांची संख्या पण वाढतच आहे.त्यातच विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आल्या आहेत.संगणक युगात तरूणांच्या कामांचा व्याप वाढला आहे त्यामुळे कळत-नकळत आपल्या पालकांकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पालक ,मुले ,नातवंडे यांच्यातील दुरावा वाढत जाऊन संवाद ही हरवत चालला आहे

म्हणून सध्या आकाशवाणी , दूरदर्शन,मालिका, नाटक, चित्रपट या माध्यमातून ज्येष्ठांच्या ‌समस्या दाखवून प्रबोधन करण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांची मानसिक घुसमट होऊ नये म्हणून समाजातील प्रत्येक घटका कडून कसून प्रयत्न केले जात आहेत. वृद्धांच्या समस्यां बद्दल जागृती होत असताना ज्येष्ठांच्या ‌समस्येची दूसरी बाजू ‌ही विचारात घेणे आवश्यक आहे ही दूसरी बाजू ‌म्हणजे , ज्येष्ठ नागरिकांच्या अपरिपक्व तेची ! ज्येष्ठांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार व्हायला हवा.काही‌ ज्येष्ठांचे वागणे पाहिल्यावर “हे परिपक्व कधी‌ होणार ?असा प्रश्न पडतो‌.
एक लक्षात घ्यायला हवे ,वय वाढलं की,म्हातारपण येत नाही तर, ज्येष्ठत्व येत असतं.वय वाढल्यावर समंजस पणा,शांतीप्रियता,संयम, सहकार्य वृत्ती हे गुण अंगी असणे गरजेचे असते.पण काही वेळा काही कुटुंबातील सदस्यांकडून अजिबात ‌सहकार्य मिळत नाही.”आम्ही आतापर्यंत तुमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या खूप कष्ट केले तेव्हा कुठे हे वैभव उभे राहिले आता आमच्या कडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नका, आम्हाला म्हातारपणी सुखाने दोन घास खाऊ द्या. तुमच्या संसाराची जबाबदारी आम्ही घेऊ शकणार नाही.

तेव्हा माझ्या मते ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ झाल्यावर बदलले पाहिजे आपल्या अवगुणांना दूर ठेवले पाहिजे.आपल्या स्वभावाला,सवयींना मुरड घातली पाहिजे.प्रयत्नाने जुन्या वाईट सवयी मोडू शकतात, ज्येष्ठांची वयाबरोबर प्रगल्भता वाढायला हवी, आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर आपला आदर्श कसा राहील याकडे लक्ष दिले पाहिजे,आपला दुराभिमान, अहंकार,मत्सर,सोडायला हवा, कुटुंबातील लोकांना समजून घेत तडजोडी ने रहायला हवे. आता उरलो उपदेशा पुरता असे न म्हणता आता उरलो मदतीपुरता असं म्हटलं पाहिजे ज्येष्ठांच्या अनेक समस्यांना त्यांची विचारसरणी कारणीभूत असते . खरं तर ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा फायदा पुढील पिढीच्या प्रगती करता कसा होईल याकडे लक्ष ज्येष्ठांनी देणे आवश्यक असते.

वृध्दापकाळात काही वेळा ज्येष्ठांना नानाविकार दीर्घ आजार होतात , अशावेळी ज्येष्ठ नागरिकांनी घाबरून न जाता आलेल्या प्रसंगाला धिराने‌ तोंड दिले पाहिजे.घरातील लोकांना योग्य साथ दिली पाहिजे.आपल्या आजारपणाचे भांडवल न करता आपली औषधे,आहार, व्यायाम,पथ्य याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्येष्ठांनी आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्याला ‌झेपेल एवढे सहकार्य ‌सर्व बाबतीत नवीन पिढीला केले तर भा़ंडणतंटे,रूसवेफुगवे, हेवेदावे टळून आनंदी जीवन जगायला निश्चितच मदत होईल. अशाप्रकारे एकमेकांच्या,सहकार्याने,समजूतीने, काही प्रमाणात तडजोडीने जुन्या नव्या पिढीने राहिले तर मला नाही वाटत ‌ज्येष्ठांच्या समस्या समाजात निर्माण होतील.

लेखिका
अंजली महाजन पुणे
०९|१२|२०२१

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क