Friday, October 4, 2024
Homeआठवणीतील शुभार्थीआठवणीतील शुभार्थी - प्रकाश कर्णी - शोभनाताई

आठवणीतील शुभार्थी – प्रकाश कर्णी – शोभनाताई

बघता बघता शुभार्थी प्रकाश कर्णी यांना जावून आज म्हणजे ४ जानेवारीला एक वर्ष झाले. त्यांच्या माझ्या मोजक्याच भेटी झाल्या पण त्या ठसा सोडून गेल्या.२०१३ मध्ये शेखर बर्वे यांचे ‘पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ हे पुस्तक त्यांच्या एका हितचिंतकाकडून त्यांच्यापर्यंत पोचले.आणि मंडळात त्यांचे फक्त नाव दाखल झाले.फक्त नाव म्हणायचे कारण मंडळात सभेला किंवा सहलीला ते कधीच आले नाहीत.आमच्या घराजवळ रहात असल्याने आम्हीच घरभेटीला गेलो.आणि भेटीत इतरांप्रमाणे त्याना स्वमदत गटात येण्याचा आग्रह करायची गरज नाही असे लक्षात आले. ते स्वयंभू आहेत पार्किन्सनला मित्र बनवून त्यांनी स्वत:चे एक सुंदर विश्व निर्माण केले आहे.
प्रथम भेटीतच सूर जुळले.ते किर्लोस्कर ब्रदर्समध्ये Hydraulic Pump Manufacturing सारखे रोज नवे आव्हान निर्माण करणारे क्षेत्र सांभाळत होते.आणि आता पार्किन्सन रोज नवे आव्हान उभे करत होता.क्षेत्र बदलले आव्हान आणि ते समर्थपणे पेलणारी व्यक्ती तीच होती. तीर्थळीही किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये काम करत होते.अनेक मित्र कॉमन निघाले.दोघेही आव्हाने पेलणारे आणि हाडाचे इंजिनिअर असल्याने त्यांच्या खूप गप्पा झाल्या.पार्किन्सन्सला त्यांनी मित्र बनवले आहे. हे पहिल्या भेटीतच समजले.मृदुलाही म्हणाली ते ‘पार्किन्सन इज माय फ्रेंड’ असेच सर्वांना सांगतात. पार्किन्सन्सने त्यांच्या शरीरावर केलेल्या खुणा दिसत होत्या.पण मनाच्या उमदेपणाला तो धक्का लावू शकला नव्हता.ते फक्त हाप पँट वर होते. त्यावेळी अंगाला आग होत असल्याने शर्ट घातला नव्हता ते हसतहसत म्हणाले,’एस्क्युज मी मै नंगा फकीर हूँ.’ स्वत:वर विनोद करण हे त्यांनी पीडीला हसत हसत स्वीकारल्याचेच लक्षण होते. एकीकडे त्यांच्या गप्पा रंगल्या. दुसरीकडे मी आणि त्यांची पत्नी मृदुला प्राध्यापक असल्याने आमच्याही बऱ्याच समान ओळखी निघाल्या.आमच्यासारखेच आव जाव घर तुम्हारा असे त्यांचे घर आहे हे लक्षात आले.खरे तर त्यांच्याकडे रत्नागीरीहून मृदुलाची बहिण आणि मेहुणे आले होते.गडबड चालू होती.पण कोणालाही आम्ही आगंतुक वाटलो नाही.उलट तेही आमच्या गप्पात सामील झाले.
दुसऱ्यावेळी स्मरणिका देण्यासाठी गेलो.त्यावेळी आम्ही जवळ राहणाऱ्या सभासदाना घरी जाऊन स्मरणिका द्यायचो. त्यामुळे पोस्टेज वाचायचे आणि घरभेभेटही होई.मिटींगमध्ये कोण कोणाकडे जातात याची चर्चा होऊन बाकीच्या पोस्टाने पाठवल्या जात. कर्णींच्या कडची ही घरभेटही आनंददायी झाली.पहिल्या भेटीत न समजलेल्या अनेक गोष्टी समजल्या.पन्नासी ओलांडल्यावर लगेच त्यांना पीडीने गाठले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी नोकरी केली.पिडीच्या आधी बायपाससर्जरी झाली होती..रक्तदाब आणि मधुमेह हे पाहुणे होतेच.नोकरी सोडली तरी घर बसल्या तांत्रिक सल्ला देणे तोही मोफत चालूच होते.अगदी शेवटपर्यंत त्यांची बुद्धी तल्लख होती.त्यांच्या सल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या सुरळीत चालल्या असतील. काहींनी स्वत:चे उद्योग चालू केले.त्यांचा अकुर्डीच्या एका शिष्याने स्वत:चा उद्योग सुरु केला.तो वेळोवेळी कर्णी यांचे मार्गदर्शन घेऊनच.काही मित्रही सल्ला घेत त्यांच्याशी आव्हानात्मक चर्चा झाली की कर्णीही खुश असायचे.
याशिवाय त्यांनी राहून गेलेल्या एका नव्याच छंदाला उजाळा दिला त्याना जुनी गाणी ऐकण्याची आवड होती.जुनी हिंदी गाणी, म्युझिक यांचे क्लासिक कलेक्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली यासाठी ते कँपमधील एका दुकानात जात.जमा केलेला खजिना त्यांनी कॉम्पवर कॉपी केला. या कामात त्यावेळी त्यांच्याकडे राहत असलेल्या इंजिनिअर असलेल्या मृदुलाच्या भाच्याची मदत झाली.Sad songs आणि Happy songs असे भाग करून त्यांनी सीडी बनवल्या आणि त्या अनेकांना प्रेझेंट दिल्या.याशिवाय ते रोज ५० लोकांना तरी एसेमेस करत. त्यावेळी त्यांची बोटे हे सर्व हाताळू शकत. हा भाचा तसेच इतर भाचेही त्यांच्याकडे खुश असत. कर्णींच्यामुळे त्याना इंजिनीअरींगमध्ये उत्तम गायडन्स मिळत असे.कणींच्या घराला भाचे मंडळी ‘कर्णीकी पाठशाळा’ म्हणायचे कारण मृदुलाकडूनही मार्गदर्शन मिळायचे.कर्णीना पार्किन्सन झाल्यावरही असे मार्गदर्शन चालूच होते.
पार्किन्सन थोडा वाढला आणि २०१० पासून त्यांचे बाहेर जाणे कमी झाले.घर तिसऱ्या मजल्यावर असल्यानेही बाहेर जाण्यात मर्यादा आल्या.मृदुला रयत संस्थेच्या पिंपरी येथील कॉलेजमध्ये नोकरी करत होती जाण्यायेण्यात फार वेळ जाई.सुरुवातीला काही काळ भाचा होता त्याची नाईट ड्युटी असल्याने तो घरी असे.नंतर वाॅचमन गरजेनुसार मदत करे.एक सुतार येई.कर्णी स्वत: .काहीना काही करत त्यात त्याची मदत होई आणि सोबतही.कर्णींचे घर म्हणजे अन्नछत्रच.ही सर्व मंडळी सकाळचा ब्रेकफास्ट,दुपारचे जेवण कर्णीकडेच घेत.घरात स्वत:ला योग्य त्या उंचीवर रॅक,बसवणे बाथरूम संडास व इतरत्र बार लावणे हे सुताराच्य मदतीने केले.घरातील खुर्चीला खाली बोर्ड बसवून,बोर्डला चाके बसवून व्हीलचेअर केली.नंतर या चेअरचे डिझाईन बदलून पुढे पाय ठेवायला बोर्ड केला.हे उदाहरणादाखल सांगितले. त्यांच्या घरी कर्णीनी बनवलेल्या अनेक वस्तू आहेत. हातात घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवा ते स्वस्थ बसत नसत.
२०१४ मध्ये पूर्ण वेळ केअरटेकर ठेवण्याची गरज निर्माण झाली.रवीसारखा हरहुन्नरी केअरटेकर मिळाला.तो कर्णी यांची क्रिएटिव्हिटी समजू शकत होता.आम्ही घरी गेलेल्यावेळी रविनेच त्यांनी टाकावूतून टिकाऊ अशा तयार केलेल्या अनेक वस्तू हौसेहौसेने दाखवल्या.त्याना वस्तुत कलाकृती दिसायची लसणीच्या पाकळीत बगळा दिसला.खालच्या भागात कावळ्याची छत्री.आईस्क्रिमच्या चमचातुनही कलाकृती करायचे.टाॅर्चचा प्रकाश टाकला की लक्ष्मी दिसते अशी एका कलाकृती आहे..११ एप्रिलच्या पार्किन्सनदिन मेळाव्यात भरवलेल्या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती ठेवल्या होत्या.दिवसभर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना नसायचा. कॉलेजमध्ये.मृदुललाचे नॅक कमिटीचे काम वाढले, घरी यायला उशीर होई. तिने रविला छान तयार केले. कर्णीही गॅसकडे जावून त्याला काहीकाही शिकवत. त्यांच्या पार्किन्सनबद्दलही त्याला नीट समजले होते.सराईतपणे तो पीडी बद्दलच्या संज्ञा वापरतो.’त्यांचा ऑन पिरिएड असला की आपणहून ते टेरेसवर चढून जातात.ऑफ पिरिएड सुरु झाला की गोळी देतो मोसंबीचा ज्यूस देतो’ असे त्यांनी सांगितल्यावर मला कौतूक वाटले.रवीवर कर्णीना सोडून गरजेनुसार ती गावालाही जावू शकायची.हे गावाला जाणे सासर, माहेरच्या नातेवायीकांचे आजारपण,कार्ये यासाठी असायचे.बरेच प्रवास परतीच्या ओढीने पाहटे जाऊन रात्री परत यायचे असायचे.यात खरे तर तिची फरपट होई.
२०१८ मध्ये निवृत्त झाल्यावर मृदुला आमच्यात सामील झाली. कर्णींचा मुळचा झरा खरा असला तरी त्याना आनंदी ठेवण्यात,नैराश्याला त्यांच्यापाशी फिरकू न देण्यात मृदुलाचा .कॅटॅलिस्ट रोल होता हे लक्षात आले.काय केल्याने त्यांना आनंद मिळतो हे ओळखून ती त्या गोष्टी त्यांच्या न कळत करायची. कॉलेज,.कंपनी असे त्यांचे अनेक मित्र होते.कर्णी बाहेर जात नसले तरी त्यांचे गेटटुगेदर कर्णींच्याकडे व्हायचे किंबहुना ते मित्रात रमतात हे माहित असल्याने मृदुलाने घडवलेले असायचे. कॉलेजच्या मित्रांनी’ पुरे पचास’ असे कॉलेज प्रवेशला ५० वर्षे झाल्यावर गेटटुगेदर केले.ते उडपिला होते कर्णीनी त्यांची प्रतिनिधी म्हणून मृदुलाला जायला लावले. केक कापताना व्हिडीओवर कर्णीना सामील करून घेतले.हे सर्व मित्र एकाच वेळी साठीचे झाले.प्रत्येक मित्राची खासियत कर्णींना विचारत तिने सुंदर मानपत्र केले. या प्रक्रियेत कर्णीं खूपच रमले.
कर्णींचे इंग्लिश चांगले होते, कॉलेजच्या Drafting च्या कामात ती त्यांची मदत घ्यायची.लेखनासाठी काही योग्य शब्द हवेत म्हणून शोधुन ठेवा असे सांगत यादी देवून जायची.आवडीचे काम म्हणून ते खुश. त्यांचा आत्मसन्मानही जपला जायचा. कर्णींनी कामाच्या निमिताने जगभर भ्रमंती केली होती.त्यांना प्रवास आवडायचा म्हणून ती टीव्हीवर Travel show लावून द्यायची.
ते जाण्यापूर्वी.५/६ महिन्यापूर्वीच त्यांना नातु झाला होता.लॉकडाऊनमुळे घरून काम करायचे होते त्यामुळे मुलगा आणि सून पुण्यातच होते.नातवाच्या आगमनामुळे कर्णी खूप आनंदात होते.त्यांची एक गोळी कमी झाली होती.त्यांचे मूड स्विंग कमी झाले होते.नातवाला रडवलेले त्यांना आवडत नव्हते.नातवाची छोटी छोटी कामे ते आनंदाने करत होते.आदल्यादिवशी ते स्वतंत्रपणे नातवाला घेऊन बसले होते.ज्योत विझण्यापूर्वी मोठ्ठी व्हावी तसे घडले होते.
शुभंकरांनी आपल्या भोवतीभोवती राहावे अशी इच्छा असणारे शुभार्थी खूप पाहिले पण पत्नींनी पीएचडी करावे अशी इच्छा असणारे,पत्नीला काही करण्यास मुभा देणारे कर्णींसारखे शुभार्थी विरळा आणि अनेक उद्योग करत त्यांच्याही नकळत त्यांच्या भोवतीच असणारी मृदुलासारखी शुभंकरही विरळाच.
कर्णींना स्वमदतगटाची गरज लागली नाही पण त्यांचा आदर्श स्वमदत गटासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क