Tuesday, December 3, 2024
Homeवृत्तांत १४ मे २०१८ सभा वृत्त - शोभनाताई

 १४ मे २०१८ सभा वृत्त – शोभनाताई

सोमवार दिनांक १४ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.

आहारतज्ज्ञ मालविका करकरे यांचे  ‘आरोग्यासाठी आरोग्यदायी आहार ‘या विषयावर व्याख्यान झाले.सभेला ४०/५० सदस्य उपस्थित होते.आता मासिक सभा या कौटुंबिक मेळावा बनत आहेत.नेहमी उपस्थित राहणारे पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरेच दिवस न आलेले शुभार्थी आलेले पाहून सर्वांनाच आनंद होतो.प्रज्ञा जोशी, आठ महिन्यांनंतर आणि नर्मदा हॉल मध्ये प्रथमच येत होती.वसुधा बर्वे यांना पाऊल उचलून टाकता येत नव्हते त्यामुळे त्या  वार्षिक  मेळाव्यालाही हजर राहू शकल्या नव्हत्या.आत शिरतानाच मला म्हणाल्या की  पाहिलंत का मी आता काही आधार न घेता चालू शकतेय. मोरेश्वर काशीकर प्रार्थना सांगायच्या तयारीने आले होते.डॉक्टर अरविंद पाटील आणि संध्या पाटील  सर्वांना भेटण्याच्या इच्छेने खास नाशिकहून आले होते.सभेत व्याख्यानातून ज्ञान मिळते आणि अशा आनंदी वातावरणातून सकारात्मक ऊर्जा मिळते.व्याख्यात्या मालविका करकरे यांनीही व्याख्यानाच्या सुरुवातीला मला येथे येवून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.

    व्याख्यानाच्या आधी एप्रिल आणि मे महिन्यातील जन्म असणाऱ्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.वसुमती  देसाई यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.मालविका करकरे यांनी चार्टच्या आधारे स्लाईड दाखवत,विविध उपयुक्त टीप्स देत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.दर्जा,वेळ,प्रमाण हे आहाराची त्रिसूत्री असल्याचे सांगितले.पार्किन्सन्सची विविध लक्षणे नियंत्रित करण्यासाठी,गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी  जीवनशैली महत्वाची असते.अर्थात हे सर्वांसाठी लागू आहे. यात आहाराला ७०% महत्व आहे. याबरोबर औषधोपचार,व्यायाम,आनंदी राहणे या बाबीही महत्वाच्या आहेत.आहार चांगल्या मनाने, चांगल्या वातावरणात,चांगल्या प्रकारे शिजवला गेला, अन्न हे पूर्ण ब्रम्ह मानले तर त्याचे गुणधर्म लागू पडतील.कुटुंबाचे सहकार्यही महत्वाचे.यानंतर समतोल आहाराचे महत्व आणि समतोल आहार म्हणजे काय हे पिरॅमिडच्या आधाराने त्यांनी सांगितले.महाराष्ट्रीयन आहार हा समतोल असतो असे मतही त्यांनी मांडले.

यानंतर काही महत्वाच्या टीप्स त्यांनी दिल्या.

– लीओडोपा आणि प्रोटीन असलेले अन्न एकत्र घेऊ नये.

– गोळ्या जेवणाआधी किंवा नंतर,गोळ्यांचे प्रमाण,वेळ हे डॉक्टर लिहून देतात ते तंतोतंत पाळावे.

–  अन्न नको होते अशा वेळी कर्बोदके असलेल्या गोष्टी थोड्या थोड्या वेळाने घ्याव्यात.

– बऱ्याचजणांना गिळण्याची समस्या असते.त्यामुळे कमीत कमी १३००  कॅलरीची रोज आवश्यकता असते ती पुरी होत नाही.अशावेळी अॅनिमिया,डी व्हिटॅमीन आणि कॅल्शियम कमतरता होऊ शकते.यासाठी लिक्विड डाएट,सेमी लिक्विड डाएट ३/४ वेळा घेणे गरजेचे.

– शरीराची गरज ऐकावी.भूक लागल्यावर खावे.

– पार्किन्सन्समध्ये क्रॅम्प्सची समस्या असते.यासाठी पोटॅशियम,क्षार असणारे नारळ पाणी, लिंबू पाणी,कोकम सरबत असे पदार्थ घ्यावे.

– लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी काळा गुळ,बाजरी,मूळ्याचा,फ्लॉवरचा पाला,पुदिना यांचा वापर हवा.सी व्हिटॅमीन हे  अन्न पदार्थाचे शोषण होण्यासाठी गरजेचे असते.यासाठी  लिंबू वर्गीय फळे आहारात असावीत.लोखंडी कढई वापरावी.

–  अंगदुखी,पायदुखी हे  कॅल्शियमच्या कमतरतेने होतात.ही  कमतरता भरून काढण्यासाठी दुध,दही ताक,पालेभाज्या ,नाचणीचे विविध पदार्थ खावेत.

–   अॅसिडीटी असल्यास तळलेले,तिखट,मसालेदार पदार्थ टाळावेत.पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरू नये,उपास टाळावेत.पाचक,कोकम सरबत,गुलकंद,तुळशी बी,सब्जा यांचा आहारात समावेश करावा.

– पार्किन्सन्सच्या पेशंटना बध्दकोष्ठ्तेचा त्रास होतो.यासाठी पाणी,फायबरयुक्त पदार्थ आणि व्यायाम आवश्यक.

यानंतर बाहेरचे तयार पदार्थ न खाता त्याला घरगुती पर्यायी पदार्थ काय खावेत याचा तक्ता त्यांनी दाखवला. श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.यात डॉक्टर अमित करकरेही सहभागी झाले.

यानंतर शोभना तीर्थळी यांनी सभा यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. अरुंधती जोशी यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चहा दिला.मोरेश्वर काशीकर यांनी बिस्किटे दिली.

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क