Thursday, November 21, 2024
Homeआठवणीतील शुभार्थीआठवणीतील शुभार्थी - यशवंत एकबोटे - शोभनाताई

आठवणीतील शुभार्थी – यशवंत एकबोटे – शोभनाताई

आज १४ ऑक्टोबर.शुभार्थी यशवंत एकबोटे यांचा वाढदिवस.माझ्या मुलीचा वाढदिवसही याच दिवशी असल्याने माझ्या लक्षात राहतो.आज त्यांची प्रकर्षाने आठवण येते कारण शुभेच्छा स्वीकारायला आज ते नाहीत.त्यांच्या प्रेरणादायी आठवणी मात्र भरपूर आहेत.३ ऑक्टोबर ला वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणी जागवून आणि त्यांचे समृद्ध जीवन शुभंकर शुभार्थीपर्यंत पोचवून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहे.

एकबोटे सभांना नियमित येत.त्यावेळी फारसा संवाद होत नसे परंतु सहलीमध्ये मात्र.संवादाला भरपूर वाव असायचा.सहलीत ते दमून कधी बसले नाहीत तर सर्व उपक्रमात सहभागी व्हायचे.आजूबाजूचा निसर्ग,व्यक्ती यांचे ते भरपूर फोटो काढायचे.फॉरेस्ट ऑफीसर पदावरून निवृत्त झालेल्या एकबोटे यांचे पर्यावरण,पाणी प्रश्न,निसर्ग,फोटोग्राफी हे जिव्हाळ्याचे विषय होते.त्यांचा जिव्हाळा कृतीशील होता.पाणी प्रश्नावर अण्णा हजारे, ज्ञानप्रबोधिनी यांच्याबरोबर काम केले होते. या विषयातील तज्ज्ञ म्हणून ते सल्ला मसलतही करत.पार्किन्सन्स मित्रमंडळाचा Whatsapp group सुरु झाल्यावर त्यांचा सातत्याने सहभाग असे.त्यांच्या आवडीच्या विषयावरील सुंदर फोटो आणि माहिती ते शेअर करत.लिहिणे फारसे शक्य नसल्याने त्यांचे अनुभव Voice message स्वरुपात त्यांनी सांगावेत असे आम्ही त्यांना नेहमी म्हणत असू. त्यांच्याशी गप्पा मारत त्याचा ऑडीओ करावा असाही विचार होता पण ते राहूनच गेले.

यशवंत एकबोटे यांना २००९ पासून पार्किन्सन्स होता. आपल्या व्याधीबद्दल विषाद न करता ते आनंदाने जगत होते सभेला ते एकटेच येत तेही चालत.सभेच्यावेळी फोटो काढणे,व्हिडीओ तयार करणे हे चालू असे.एप्रिल १४ सालच्या पार्किन्सन्स दिनाच्यावेळी शुभार्थीच्या नृत्याचा त्यांनी प्रेक्षकात बसून सुंदर व्हिडीओ तयार केला होता.वय आणि पार्किन्सन्स या दोन्हीवर मात करत उत्साहाने ते अनेक गोष्टी करत.

सभेत शेअरींगचे सेशन आहे आणि एकबोटेनी उठून शेअरिंग केले नाही असे कधीच झाले नाही.त्यांच्या शेअरिंग मधून त्यांची सकारात्मकता पोचत असे.ते एकदा म्हणाले,टेबल साफ करणे, भांडी विसळणे, अशी घरातील कामे करतात.यातून समाधान मिळते.हाताला बोटांना व्यायाम होतो. तसेच पत्नीला मदत होते.पत्नीही ८० वर्षांची आहे.औषधे नियमित घेणे,व्यायाम,प्राणायाम करणे, २ किलोमीटर चालणे यामुळे पीडीला आटोक्यात ठेवणे सोपे होते. हल्ली काही दिवसात पार्किन्सन्स आणि वृद्धत्व यांनी शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली होती. सहलीलाही ते मुलीला बरोबर घेऊन आले होते.

एका शेअरिंग मध्ये खुर्चीवरून उठताना, पायऱ्या चढताना त्रास होतो.मागे तोल जातो,गिळताना त्रास होतो.डोळ्यांना दोन दोन गोष्टी दिसतात.झोप येत नाही.या सर्वामुळे नैराश्य येते.अशा काही समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.जावडेकर यांनी आपल्याला झोपेचा त्रास होता,तो झोपण्यापूर्वी काहीतरी क्लिष्ट वाचल्याने कमी झाला असे सांगितले.यावर डोळ्यामुळे वाचता येत नाही असे एकबोटे यांनी सांगताच मी त्याना ऑडीओ बुकचा पर्याय सुचविला.उतारवय आणि १० वर्षाचा पीडी असताना एकबोटे व्यवस्थित बोलू शकतात,चालू शकतात,स्मरणशक्ती चांगली आहे, सुसंबद्ध विचार करू शकतात,हेही खूप आहे, असे स्वत:ला समजावल्यास त्रास कमी वाटेल असे सुचविले.त्याना ते पटले. सभेला आल्याने नैराश्य कमी झाल्याचे ते म्हणाले शेवटी त्यांच्या काही समस्या असल्या तरी इतर शुभार्थीना मात्र या वयात ते इतक्या गोष्टी करतात याचे अप्रूपच वाटत होते.सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

आजच्या सभेत वाढदिवस साजरा करून घ्यायला ते नसतील.त्यांचा उत्साही वावर त्यांचा हसतमुख चेहरा यांच्या आठवणी मात्र सर्वाना नेहमीच प्रेरणा देत राहतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क