Tuesday, December 3, 2024
Homeवृत्तांत१३ ऑक्टोबर मासिक सभा वृत्त

१३ ऑक्टोबर मासिक सभा वृत्त

गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने  हॉटेल अश्विनी,येथे सभा आयोजित केली होती. यावेळी डॉक्टर श्रीधर चिपळूणकर यांचे ‘पार्किन्सन्स आणि पोश्चर’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.सभेस ७०/८० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. काहीतरी वेगळे करण्यासाठी औषधाविना आजार बरा  करणे अशी संकल्पना घेऊन डॉक्टर चिपळूणकर यांनी प्रॅक्टीस सुरु केली. जवळजवळ १० हजार विविध आजाराच्या पेशंटनी याचा फायदा घेतला.त्यांच्या दवाखान्यात गेल्या गेल्या ‘Visit before you take medicine’ अशी  पाटी दिसते. त्यांनी आयुर्वेदातील एमडी पदवी मिळवली. त्यानंतर डिप्लोमा इन फिजिओथेरपी,पॅथालॉजीत पोस्ट  ग्रॅज्युएशन केले.स्पोर्ट सायन्स,स्कीन एजिंग आणि रीज्युवेनेशन या विषयातील विविध पदव्या देश परदेशात मिळवल्या.या सर्वातून स्वत:ची वेगळी उपचारपद्धती विकसित केली.
पार्किन्सनन्स बरा होत नाही आणि सतत वाढत जाणारा आजार आहे हा विचार घेऊनच पीडी पेशंट जगत असतो. औषधाव्यतिरिक्त, तुम्हीच तुमचे डॉक्टर बना, यासाठी आजार समजून घ्या असा सल्ला त्यांनी दिला. यासाठी त्यांनी वेदनेचे उदाहरण दिले.बुटात खडा अडकल्यास पटकन समजते, आपण तो काढून टाकतो. झोपेतही काही चावल्यास प्रतिक्षिप्त क्रियेने शरीर मागे घेतो. वेदनेपासून दूर होण्याची इच्छा त्यामागे असते. मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. वेदनेला प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया असते. प्रत्येकजण क्षमतेनुसार सहन करत जातो. वेदना वाढल्यावर भीती,काळजी वाटते. वेदना समजून घेण्यासाठी वेदना कधीपासून हे पहायचं. प्रत्येकांनी आपला उपाय शोधायचा. बरेच जण वेदनाशामक औषधे घेतात यातून अ‍ॅसिडीटी वाढते. वेदना दुसरीकडे फक्त ढकलली जाते. आपण वरून काही चोळतो तेंव्हाही झुमझुमते.त्यामुळे लक्ष वेदनेपासून दुसरीकडे वळवले जाते.
आजारातून  बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती, विचारशक्ती वाढवली तर शरीर स्वत:च औषध तयार करु शकेल.
शरीर करत नसेल तर ते करण्यासाठी काय करायचं? आपल्याच मेंदूला कामाला लावायचं.मेंदूचा ४% भागच आपण वापरतो.आणखी वापरायचा. यासाठी पक्षाघाताचे उदाहरण त्यांनी दिले.डावा हात पॅरलाईज झाला असेल तर उजवा हातही तसाच डाव्याप्रमाणे ठेवायचा. तसेच पाहत राहायचे हे करताना आपण दमतो.घाम येतो.हळूहळू उजव्या हाताची दोन बोटे हलवायची.त्याप्रमाणे डाव्या पॅरलाईज झालेल्या हाताचीही हालचाल होऊ लागते.म्हणजेच विरुद्ध बाजूचा परस्पर संबध पाहून आपण स्नायूवर नियंत्रण आणू शकतो.
व्यायामातही विविधता असावी. दहावेळा हात हलवला की अकराव्यावेळा ती नुसती हालचाल असते. व्यायाम नसतो.चालणे,पोहणे,उठाबशा काढणे अशी विविधता असावी. दमश्वास, ताणणे हे असावे. व्यायामाने ताठरता कमी होते. शरीरावरील लक्षणाचा मनाशी कसा संबंध असतो हे सांगताना त्यांनी परीक्षेचे उदाहरण दिले.घाम येणे, हात कापणे, फटिग ही शारीरिक लक्षणे भीतीने,मानसिक ताणाने दिसतात.हे टाळण्यासाठी ताणावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे ठरते. ऑलिम्पिकमध्ये सिल्वर वरून  गोल्ड मेडलकडे जाण्यासाठी असे ताणावरील नियंत्रण आपण शिकवत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडू बाहेरून स्टेरॉइड घेतात,पकडले जातात.परंतु शरीरात स्वत:चीच स्टेरॉइड तयार करायची क्षमता असते,ती वाढवायची.आजारावरील नियंत्रणासाठीही नकारा ऐवजी शरीरातील लक्षणे स्वीकारून समजून घेणे महत्वाचे.नकारात्मक विचार यायला लागले की लगेच दखल घेऊन आपले ज्यात मन रमते अशा गोष्टी करायच्या.स्वयंपाक,चित्रकला,बागकाम,गाणी ऐकणे,म्हणणे, प्रवास करणे,जे करायचे ते तन्मयतेने केल्यास,आनंदी असल्यास चांगले स्टीरॉइड तयार होते.गोष्टी सहज उपलब्ध झाल्या की त्रास घेणे कमी होते अवलंबित्व येते. यासाठी त्यांनी सर्वांना पटेल असे मोबाइलचे उदाहरण दिले.मोबाईलवर नंबर सेव्ह केल्याने मोबाईल हरवला तर जवळच्या माणसाचा फोन नंबरही आठवत नाही. अशाच आपण नित्याच्या अनेक क्रिया कमी करतो.आवश्यक क्रिया न केल्याने आजाराला निमंत्रण देतो.त्यामुळे नित्याच्या क्रिया कमी करू नका आणि क्रिया करताना मन केंद्रित करा असा सल्ला दिला.याचबरोबर पोटाने श्वास घेण्यासही सांगितले.लहान मुले असाच श्वास घेतात.इगो सोडून खळखळून हसणेही महत्वाचे असल्याचे सांगितले.
यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.फळ्यावर रेखाचित्रे काढून बसणे,उठणे,झोपणे,झोपून उठणे,वाहन चालवणे,स्वयंपाक करणे,रिक्षात बसणे अशा विविध वेळी पोश्चर कसे असावे हे समजावून सांगितले.चहापान झाले,औपचारिक रित्या सभा संपली तरी श्रोत्यांचे प्रश्न विचारणे संपत नव्हते.डॉक्टरांनी न कंटाळता,ठरलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ देऊन सर्वांच्या शंकांचे निरसन केले.सर्वांच्याच मनात सकारात्मक विचार पेरले.
वाढदिवसानिमित्त श्यामलाताई शेंडे यांनी चहा दिला.
– शोभना ताई
Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क